Konkan Politics : ‘रायगड’वरून मंत्री चव्हाणांनी महायुतीत वात पेटवली; धैर्यशील पाटलांचे नाव आणले चर्चेत

BJP Vs NCP : निर्णय कोणाला पटला नसेल तर वरच्या कोर्टात दाद मागता येते, असा सल्ला रवींद्र चव्हाण यांनी ठाकरे सेनेला दिला आहे.
Ravindra Chavan-Sunil Tatkare
Ravindra Chavan-Sunil TatkareSarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड-रत्नागिरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील पाटील यांचे नाव चर्चेत आहे, असे सांगून पाटील यांचे नाव राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुढे आणले आहे. वास्तविक, हा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे निवडून आले आहेत, त्यामुळे चव्हाण यांनी महायुतीमध्ये रायगडवरून वादाची ठिणगी टाकली आहे. आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून यावर काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. (Dhairyasheel Patil from BJP wants from Raigad LokSabha Constituency)

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाच्या निकालावर राजकीय नेत्यांकडून टीकाटिप्पणी सुरू आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण हे रत्नागिरी दौऱ्यावर असताना त्यांनी या निर्णयावर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सगळ्या कायदेशीर बाजू तपासून निर्णय दिला आहे. हा निर्णय कोणाला पटला नसेल तर वरच्या कोर्टात दाद मागता येते. वरच्या कोर्टात जाण्याचा कायदेशीर मार्ग आहे, असा सल्ला चव्हाण यांनी ठाकरे सेनेला दिला आहे. तसेच, सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात भाजपने निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचे सांगून त्यांनी एकनाथ शिंदे गटालाही इशाराही दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ravindra Chavan-Sunil Tatkare
Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘दादा’ : अजित पवार

कायदेशीर निर्णयाच्याविरोधात बोलणं किंवा त्याच्या समर्थनार्थ बोलणं, हे काही योग्य नाही, असे सांगत विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांनी अतिशय सविस्तरपणे सर्वांचे जबाब, शिवसेनेची घटना या सगळ्यांचा आधार घेत निर्णय दिला आहे. तो निर्णय योग्य असल्याचं सर्वसामान्यपणे तज्ज्ञांचंसुद्धा मत आहे, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीसाठी तुमचं नाव चर्चेत असल्याचे प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, कोणी निवडणूक लढवायची, याचा निर्णय भाजपमध्ये केंद्रीय नेतृत्व घेते. रत्नागिरी सिंधुदुर्ग व रायगड-रत्नागिरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांनी निवडणूक लढवावी, असं सगळ्याच कार्यकर्त्यांचे मत आहे. या दोन्हीही मतदारसंघांमध्ये भाजपला वाढता पाठिंबा आहे.

Ravindra Chavan-Sunil Tatkare
Santosh Bangar News : मिशी, फाशी अन् रडारड; बहुरूपी आमदार संतोष बांगर...

रायगड लोकसभेमध्ये धैर्यशील पाटील यांचा असलेला प्रवास, संपर्क यामुळे आता लोकही विचार करायला लागले आहेत, की कोणाला तरी नवीन चांगल्या उमेदीच्या कार्यकर्त्याला या रायगड-रत्नागिरी लोकसभेमधून प्रतिनिधित्व करता आलं पाहिजे. हा वाढता पाठिंबा लक्षात घेता सर्वच स्तरावर धैर्यशील पाटील यांचे नाव चर्चेत असल्याचे स्पष्ट मत मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलं.

Ravindra Chavan-Sunil Tatkare
Ayodhya Ram Mandir : कर्नाटक काँग्रेस सरकारचा रामभक्तांसाठी मोठा निर्णय; अयोध्येत उभारणार यात्री निवास

कोकणामध्ये 1800 कोटी रुपयांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरू आहेत. सर्व विषय हे प्राधान्याने घेण्यात आले आहेत. आंबा गावात पुलाची दुरुस्ती करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त बजेटमध्येसुद्धा मंत्री झाल्यानंतर कमीत कमी दोनशे आणि जास्तीत जास्त तीनशे कोटी रुपयांची कामे अनेक ठिकाणी केली आहेत. त्यातील काही कामे प्रगतिपथावर असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Edited By : Vijay Dudhale

R...

Ravindra Chavan-Sunil Tatkare
Raver Loksabha : एकनाथ खडसेंच्या खासदारकीला काँग्रेसचा अपशकुन...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com