Raigad Controversy : किल्ल्यावर नखरा केला, तर याद राखा! तटकरे-गोगावलेंचा पारा चढला; प्री-वेडिंग शूट करणाऱ्यांची आता सुट्टी नाही

Raigad Fort pre wedding shoot viral video: किल्ले रायगडावरील श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळ परिसरात झालेल्या प्री-वेडिंग शूटमुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे.
Raigad Fort pre wedding shoot Controversy; Bharat Gogawale, Aditi Tatkare and Sunil Tatkare
Raigad Fort pre wedding shoot Controversy; Bharat Gogawale, Aditi Tatkare and Sunil Tatkaresarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. किल्ले रायगडावर शिवरायांच्या समाधीस्थळी प्री-वेडिंग शूट केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप उसळला आहे.

  2. मंत्री आदिती तटकरे यांनी दोषींवर कारवाईचे आदेश दिले असून सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली.

  3. गोगावले यांनी संबंधितांना इशारा देत गडावर अशा प्रकारांना सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट केले.

Raigad News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्मृतींनी ओळखला जाणारा किल्ले रायगड पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळ परिसरात प्री-वेडिंग शूट झाल्याचे समोर आले आहे. तर या प्री-वेडिंग शूटचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता राज्यात संतापाची लाट उसळली आहे.

तर शिवप्रेमींकडून हा प्रकार करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी असतानाच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या प्रकरणात दोषींवर कडक कारवाईची आदेश दिले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांनी देखील संताप व्यक्त केला आहे.

किल्ले रायगड हे केवळ पर्यटनस्थळ नसून ते महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे. तर अख्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान मानले जाते. अशा पवित्र ठिकाणी एका जोडप्याने प्री-वेडिंग शूट केले. ज्याचे आता व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत असून असे प्री-वेडिंग शूट करणे अत्यंत अयोग्य असून किल्ले रायगडावरील संवेदनशील भागांमध्ये अशा प्रकारच्या शूटिंगवर बंदी घालावी, अशी मागणी केली जात आहे.

Raigad Fort pre wedding shoot Controversy; Bharat Gogawale, Aditi Tatkare and Sunil Tatkare
Aditi Tatkare : महिला व बालविकास मंत्री ‘बेपत्ता’! जबाबदारी नसेल, तर राजीनामा द्या; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

तसेच केंद्रिय पुरातत्व विभाग आणि संबंधित प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधीत व्यक्तींवर कारवाई करावी. किल्ले रायगडावर कडक नियमावली लागू करावी, अशी मागणी होताना 'रायगडाची पवित्रता जपा' अशा हॅशटॅगद्वारे मोहिम राबवली जात असून शिवप्रेमींकडून निषेध नोंदवला जात आहे.

दरम्यान मंत्री आदिती तटकरे यांनी याप्रकरणाची दखल घेऊन कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुरातत्व सर्वेक्षण विभागाला रायगडावर प्री वेडिंग शूट, फोटो शूट, वैयक्तिक कार्यक्रम करू नयेत असे फलक लावावेत असेही बजावले आहे.

यावेळी आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे. तसेच त्या म्हणाल्या, किल्ले रायगड येथे प्री-वेडिंग फोटोशूट केल्याचा प्रकार निंदनीय आहे. या घटनेबद्दल मी स्वतः रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे व पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांना दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे अशा सूचना दिल्या आहेत. तसेच पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी डॉ. अभिजित आंबेकर यांच्यासोबतही संवाद साधला आहे.

किल्ले रायगडाचे पावित्र्य जपण्यासाठी पुरातत्व सर्वेक्षण विभागाने तातडीने मार्गदर्शक सूचनांची रचना करावी, अशा सूचना विभागाला केल्या आहेत. तसेच रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबतही याप्रकरणी चर्चा केल्याचे तटकरे यांनी सांगितले आहे.

दरम्यान आता या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. तटकरे यांनी घडलेल्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी यात सहभागी असणाऱ्यांवर भारतीय पुरातत्व विभागाने कठोर कारवाई करायला हवी. त्याच बरोबर असे प्रकार पुन्हा घडणार नाही याची दक्षता घ्यायला हवी असे म्हटले आहे.

तर गोगावले यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत असून असे कदापी खपवून घेतलं जाणार नाही. हवं तर त्यांच्या चरणी लग्नाची पत्रिका ठेवा, समाधीच्या बाजूला उभारून फोटो काढा, पण हे असलं प्री-वेडिंग- फ्रि वेडिंग गडावर चालणार नाही. तसेच जर सीसीटीव्हीत ज्यांनी हा पराक्रम केला आहे त्यांचे फोटो चेहरे आले असतील तर आम्ही त्यांचा कार्यक्रम लावतो, अशी धमकी वजा इशारा गोगावले यांनी दिला आहे.

Raigad Fort pre wedding shoot Controversy; Bharat Gogawale, Aditi Tatkare and Sunil Tatkare
Bharat Gogawale : गोगावलेंच्या कुटुंबातील आणखी एका सदस्य राजकारणात प्रवेश! नव्या एन्ट्रीमुळे स्थानिक राजकारणात पकड आणखी मजबूत

FAQs :

1. हा वाद कशामुळे निर्माण झाला?
रायगड किल्ल्यावर प्री-वेडिंग शूट केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे वाद निर्माण झाला.

2. कोणत्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली?
आदिती तटकरे, सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली.

3. सरकारने काय कारवाई केली?
दोषींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

4. गोगावले यांनी काय इशारा दिला?
अशा प्रकारांना सहन केले जाणार नाही आणि संबंधितांवर कठोर कारवाई होईल, असा इशारा दिला.

5. पुढे काय होऊ शकते?
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com