Sunil Tatkare Anant Gite : हार के जीतने वाले को बाजीगर कहते है! रायगडचा 'बाजीगर' कोण?

raigad lok sabha constituency Sunil Tatkare Anant Gite : बाजीगर म्हणजे पराजय होऊनही जिंकणार. बाजीगरचे कितीही गोडवे गायले तरी आज मात्र आपण बाजीगर व्हायचे नाही हे तटकरे आणि गितेंनी मनोमन पक्के केले असले.
Sunil Tatkare, Anant Gite
Sunil Tatkare, Anant GiteSarkarnama

Lok Sabha Election : रायगडचा 'गड'सुनील तटकरे की आनंत गिते सर करणार हे अवघ्या चार पाच तासांत कळेल. पण राजगडची निवडणूक मागील दहा वर्षांत एकतर्फी झालेली नाही. डमी उमेदवार खेळ बिघडवणार की असलीची हुकूमत चालणार या विचाराने कार्यकर्त्यांची धडधड वाढली आहे.

बाजीगर म्हणजे पराजय होऊनही जिंकणार. बाजीगरचे कितीही गोडवे गायले तरी आज मात्र आपण बाजीगर व्हायचे नाही हे तटकरे Sunil Tatkare आणि गितेंनी मनोमन पक्के केले असले. 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेत अवघ्या दोन हजार मतांनी तटकरेंचा पराभव गितेंनी केला. त्यावेळी गितेंच्या विजयापेक्षा दोन हजारांनी 'बाजीगर' ठरलेल्या तटकरेंचीच चर्चा जास्त झाली.

तटकरेंनी 2019 ला बाजी पलटवली. तेव्हाही मोदी लाट असताना गितेंना तटकरेंनी घरी बसवले. आता पुन्हा गिते-तटकरे आमने सामने आहेत. त्यामुळे हिशेब चुकता करण्याची संधी गितेंना आहे. कुणबी मतदारांची साथ आणि ठाकरेंना असणारी मुस्लिम मतदारांची सहानूभुती गितेंना तारणार का? याचाच फैसला आज लागणार

Sunil Tatkare, Anant Gite
Lok Sabha Election Results : शिव्या-शापाची मशीन 'ऑन'; राऊतांनी मोदी सरकारचा पाडाव करून टाकला...

शिवसेनेच्या बालेकिल्याला 2019 मध्ये तटकरेंनी खिंडार पाडले. या निवडणुकीत तटकरे यांना 4 लाख 86 हजार 968, तर गीते यांना 4 लाख 55 हजार 530 मते मिळाली होती. त्यामुळे जय पराजयात कुणाची मतं कमी होणार आणि कुणाची वाढणार यावरच विजयाचे गणित आज ठरणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com