Raigad Lok Sabha Exit Poll 2024 : अजितदादांना मोठा धक्का बसणार, तटकरे NCPचं ऑफिसच सांभाळणार?

Sunil Tatkare Vs Anant Geete : अजित पवारांना साथ देणारे शिलेदार सुनील तटकरे 'एक्झिट पोल'च्या अंदाजानुसार डेंजर झोनमध्ये आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरेंना ठाकरे गटाचे आनंत गिते पराभूत करत असल्याचा अंदाज आहे.
Sunil Tatkare, Ajit Pawar
Sunil Tatkare, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बंडात 'आघाडी'वर राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लोकसभा निवडणुकीच्या निकालात मात्र, 'पिछाडी'वर जाणार असल्याची धक्कादायक बाब 'टीव्ही ९ मराठी'च्या एक्झिट पोलने अधोरेखित केली आहे. रायगडमधून ठाकरेंच्या शिवसेनेचे अनंत गीते मशाल घेऊन दिल्ली गाठण्याचा अंदाज आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या तटकरेंचा पराभव झाल्यास अजितदादांना मोठा धक्का बसणार, हे निश्चित आहे.

या निवडणुकीत गीते विजय झाल्यास तटकरेंना Sunil Tatkare मात्र, पुढच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारी पक्षाच्या ऑफिसमध्येच बसावे लागणार आहे. रायगडमधून खरोखरीच गीते बाजी मारणार की तटकरे हरणार, याचा अंतिम फैसला येत्या 4 जूनला होईल. पण एक्झिट पोलने आताच तटकरेंना धडकी भरू शकते.

महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीच्या फूटीत अजित पवारांना Ajit Pawar साथ देणारे शिलेदार सुनील तटकरे 'एक्झिट पोल'च्या अंदाजानुसार डेंजर झोनमध्ये आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरेंना ठाकरे गटाचे आनंद गिते पराभूत करत असल्याचा अंदाज आहे.

सुनील तटकरे हे अजित पवार गटाचे लोकसभेतील एकमेव विद्यमान खासदार आहेत. त्यांच्याकडे 'राष्ट्रवादी'चे प्रदेशाध्यक्ष पद देखील आहे. त्यामुळे जर तटकरेंना पराभवाचा धक्का बसला तर त्यांना महाराष्ट्रातील कार्यालयातून पक्षाचे कामकाज पाहावे लागणार आहे.

2019 च्या निवडणुकीत तटकरेंनी आनंद गिंतेंना पराभूत करत दिल्ली गाठली होती. 2019 च्या मोदी लाटेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला मोठा फटका बसला होता. राष्ट्रवादीकडून दिल्ली पोहोचणाऱ्या मोजक्याच शिलेदारांमध्ये तटकरे होते.

Sunil Tatkare, Ajit Pawar
Maharashtra Exit Poll 2024 : महाराष्ट्रात मोदींचा करिष्मा नाहीच; पवार- ठाकरेंचंच नाणं खणखणीत?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com