Loksabha Election 2024 : रायगडमध्ये गिते + तटकरे Vs तटकरे यांच्यात कडवी लढत; पवारांची खेळी यशस्वी होणार?

Sunil Tatkare Vs Anil Tatkare : सुनील तटकरेंचे बंधू अनिल तटकरे यांना शरद पवारांनी आपलेसे केल्यामुळे रायगडच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष
Sunil Tatkare, Anant Gite, Anil Tatkare
Sunil Tatkare, Anant Gite, Anil TatkareSarkarnama
Published on
Updated on

Raigad Loksabha Constituency News :

रायगड जिल्ह्यात सध्या राजकारण जोरात सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिल तटकरे यांना शरद पवारांनी पंखाखाली घेऊन त्यांना राज्य उपाध्यक्ष केल्यामुळे 'तटकरे विरुद्ध तटकरे' असा घरगुती सामना पाहायला मिळणार आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात (Raigad Loksabha Constituency) ठाकरे गटाचे अनंत गिते (Anand Gite) यांची उमेदवारी नक्की आहे. महाविकास आघाडीकडून गिते आणि महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे (Sunil Tatkare) अशी लढत होणार असून, त्यांच्यात कडवी झुंज होणार आहे. अशातच सुनील तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे (Anil Tatkare) शरद पवारांसोबत गेल्यामुळे तटकरे विरुद्ध गिते लढाईत अनिल तटकरेंची भूमिका किती निर्णायकी ठरणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Sunil Tatkare, Anant Gite, Anil Tatkare
Raigad Politics : शरद पवारांची पॉवरफुल खेळी; सुनील तटकरेंच्या विरोधात भावाला ताकद देत दिली मोठी जबाबदारी

अनिल तटकरे पाच-सहा वर्षांपासून राजकारणात फारसे सक्रिय नाहीत. तरीही ते यापूर्वी विधान परिषदेचे सदस्य राहिल्याने तसेच रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य असल्यानं त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. नेमकी हीच बाब ओळखून अजित पवारांसोबत (Ajit Pawar) गेलेल्या सुनील तटकरेंच्या विरोधात अनिल तटकरेंना पक्षांत घेण्याची संधी शरद पवारांनी साधली आहे.

त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या सुनील तटकरेंविरोधात ठाकरे गटाचे अनंत गिते आणि त्यांना तटकरेंच्या घरातून अनिल तटकरेंची ताकद मिळणार आहे. त्यामुळे ही निवडणूक फार अटीतटीची होण्याची शक्यता आहे.

राजकीय प्रवास

अनिल तटकरे यांचे पुत्र अवधूत रोह्याचे माजी नगराध्यक्ष असून, 2014 ते 2019 या कालावधीत ते श्रीवर्धनचे आमदार होते. आधी राष्ट्रवादी काँग्रेस, त्यानंतर अनिल तटकरे आणि अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर ऑक्टोबर 2022 मध्ये अवधूत तटकरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

आता अनिल तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षात सक्रिय झाले आहेत. अनिल तटकरे यांनी पवारांना साथ दिल्यामुळे सुनील तटकरेंना किती शह मिळणार आणि रायगडचा खासदार कोण होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Loksabha Election)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बळ महायुतीचं

रायगड लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील चार (पेण, अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड) आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दोन (दापोली आणि गुहागर) या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. सध्या पेणमध्ये भाजपचे आमदार आहेत. अलिबाग, महाड आणि दापोलीत शिवसेनेचे आमदार आहेत. गुहागरमध्ये ठाकरे गट, तर श्रीवर्धनच्या आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे आहेत. सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघांत सध्यातरी महायुतीचा प्रभाव आहे. त्यामुळेच अनिल तटकरे यांच्यामुळे सुनील तटकरेंना किती झळ पोहोचणार, याची सर्वांना उत्कंठा लागली आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

Sunil Tatkare, Anant Gite, Anil Tatkare
Chiplun Rane Jadhav Clash : अटक झालेल्या कार्यकर्त्यांच्या घरी भास्कर जाधव; 'शेठ तुम्ही असताना...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com