

रायगडातील दहा नगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी न्यायालयाने पुढे ढकलली असून आता ती 21 डिसेंबरला होणार आहे.
राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुती म्हणून न लढता, भाजपसोबतच राहण्याचे संकेत दिले आहेत.
यामुळे शिवसेनेला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये युतीत स्थान मिळणार नाही, अशी शक्यता अधिक बळावली आहे.
Maharashtra Politics : रायगडातील दहा नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (2 डिसेंबर) मतदान झाले. मात्र,न्यायालयीन आदेशाने मतमोजणी पुढे ढकलली गेली असून ती आता 21 डिसेंबरला होणार आहे. यामुळे सध्या येथे उमेदवारांसह नेत्यांची धाकधूक वाढली असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शिवसेनेच्या पोटात गोळा येण्याची शक्यता आहे. तटकरे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आपण महायुती म्हणून लढणार नसल्याचे संकेत दिले असून भाजपसोबत राहू असे म्हटले आहे. यामुळे येथे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही शिवसेनेला युतीत स्थान नसल्याचेच आता स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून सुरू झालेला वाद क्षमण्याऐवजी दिवसेदिवस उग्ररूप धारण करताना दिसत आहे. जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, रोहा, पेण, श्रीवर्धन, महाड, उरण, कर्जत, खोपोली आणि माथेरान नगरपरिषदांच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या. यावेळी अनेक ठिकाणी महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे दिसून आले. जिल्ह्यात काही ठिकाणी राष्ट्रवादी-भाजप तर काही ठिकाणी राष्ट्रवादीने ठाकरेंच्या शिवसेनेसह विरोधकांशी हात मिळवला.
पण शिंदेंच्या शिवसेनेला युतीत घेतले नाही. यामुळेच येथे विरोधाची अधिकच धारधार झाली. दरम्यान मतदानादिवशीच महाड येथे नवेनगर परिसरात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. गाड्या फोडण्यासह बंदूक रोखणे यासारखे प्रकारही झाले. त्यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्त्यांसह मंत्री भरत गोगावलेंच्या मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे हा वाद नव्या वळणावर पोहचला असून जिल्ह्याचे राजकारण चांगलचं तापलं आहे.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत जिल्ह्यात महायुती म्हणून लढणार नाही असे स्पष्ट संकेत सुनील तटकरे यांनी दिले आहेत. तसेच त्यांनी यावेळी बोलताना, राष्ट्रवादीशी युती नको असं म्हणणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांच्या वक्तव्याची आठवणच करून दिली. तर आपल्यासाठी स्वबळासह भाजपसोबतचा युतीचा मार्ग मोकळा असल्याचे संकेत दिले.
तटकरे यांनी, शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांनी 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आम्ही जाणार नाही, त्यांच्याबरोबर लढणार नाही, तर त्यांच्याबरोबर युती नकोच, अशी भूमिका घेतली होती. भरत गोगावले असोत की आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी तर खालच्या थरावर जावून टीका करत युतीबाबत भाष्य केलं होतं. त्यामुळे आता आमच्यासाठी भाजपसोबत युतीचे दरवाजे उघडे आहेत. तर काही ठिकाणी आम्ही स्वतंत्रपणे लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपलाही इशारा
एकीकडे तटकरे यांनी भाजपसोबत काही ठिकाणी जावू पण तडजोड करण्याची तयारी नसल्याचे म्हटल्याने आता संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांनी येथील स्थानिक राजकीय परिस्थिती आणि राष्ट्रवादीची संघटनात्मक ताकद लक्षात घेता पक्ष स्वतंत्र लढाईस तयार आहे. आगामी निवडणुकांसाठी भाजपसोबत तडजोड करण्याची मानसिकता नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
तटकरे यांच्या या सूचक इशाऱ्यानंतर जिल्ह्यातील पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला स्पष्ट दिशा मिळाली असून निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय अंतिम झाल्याचे दिसत आहे. यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत जिल्ह्यात महायुती दिसणार नाही, हेच आता उघड झाले आहे. यामुळे येथे आगामी निवडणुकीत अधिक चुरस निर्माण होण्याची शक्यता आतापासूनच वर्तवली जातेय.
FAQs in Marathi
1. रायगडमधील मतमोजणी पुढे का ढकलली?
– न्यायालयीन आदेशामुळे मतमोजणी 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
2. सुनील तटकरे यांनी कोणता निर्णय घेतला?
– जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुती म्हणून न लढता, भाजपसोबतच राहण्याचे त्यांनी संकेत दिले.
3. शिवसेनेचे यावर काय परिणाम होऊ शकतात?
– शिवसेनेला आगामी निवडणुकांमध्ये युतीत स्थान न मिळण्याची शक्यता वाढली आहे.
4. हा निर्णय कोणत्या निवडणुकांना लागू आहे?
– जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांना.
5. या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकारणावर काय परिणाम होईल?
– महायुतीतील अंतर्गत समीकरणे बदलू शकतात आणि स्थानिक पातळीवर मोठे राजकीय फेरबदल दिसू शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.