Rural Election : कोकणात भाजपला थेट टक्कर जयंत पाटलांच्या पक्षांशी, 64 उमेदवार रिंगणात; रणधुमाळीही अंतिम टप्प्यात

Zilla Parishad Panchayat Samiti Election: पनवेल तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत बहुसंख्य ठिकाणी भाजपचे कमळ विरुद्ध शेकापचा खटारा अशी थेट टक्कर पाहायला मिळणार आहे.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत बहुकोनी लढती रंगतदार झाल्या आहेत.

  2. भाजप आणि शेकाप यांच्यात अनेक ठिकाणी थेट सामना होत असून राजकीय समीकरणे गुंतागुंतीची झाली आहेत.

  3. शहरी मतदारसंख्या वाढ आणि ग्रामीण प्रश्नांचा प्रभाव निकालावर निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

वसंत जाधव

Raigad/Panvel News: पनवेल तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली असून अनेक गट व गणांमध्ये दुरंगी, तिरंगी तसेच चौरंगी लढती होत असल्याने राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची झाली आहेत.

अर्ज माघारीनंतर जिल्हा परिषदेच्या आठ जागांसाठी 18 तर पंचायत समितीच्या 16 जागांसाठी 46 असे एकूण 64 उमेदवार निवडणूक मैदानात उतरले आहेत. बहुसंख्य ठिकाणी भाजपचे कमळ विरुद्ध शेकापचा खटारा अशी थेट टक्कर पाहायला मिळत आहे. मतदारसंख्येत झालेली वाढ आणि ग्रामीण प्रश्नांचा कौल या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

रायगड जिल्हा परिषदेत पनवेल तालुक्यातील जागांची संख्या अधिक असल्याने जिल्ह्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. येथे भाजपसह शेतकरी कामगार पक्षाने शर्थीचे प्रयत्न सुरू केले असून उलवा, करंजाडे व सुकापूर येथील नव्या वसाहतींमधील मतदारांसह पारंपरिक ग्रामीण मतदारसंख्या निर्णायक ठरणार आहे. बहुसंख्य ठिकाणी भाजपचे कमळ विरुद्ध शेकापचा खटारा अशी थेट टक्कर पाहायला मिळत आहे. शहरी मतदारसंख्येत झालेली वाढ आणि ग्रामीण प्रश्नांचा कौल या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेच्या वावंजे, नेरे, पाली देवद, पळस्पे, वडघर व केळवणे या सहा गटांमध्ये भाजप व शेकाप यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. वावेघर गटात भाजप विरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात थेट सामना रंगणार आहे. गव्हाण गटात महाविकास आघाडीतील बिघाडी स्पष्ट दिसून येत असून मनसेने उमेदवार दिल्याने येथे भाजप, शेकाप, मनसे व अपक्ष असे चार उमेदवार रिंगणात आहेत.

BJP
Zilla Parishad Election : ZP निवडणुकीत महिला मतदारांना आमिष? साड्या वाटपाचा धक्कादायक प्रकार, भरारी पथकाची पाठलाग करत मोठी कारवाई

शेकापने जिल्हा परिषदेच्या आठ पैकी सहा जागांवर उमेदवार उभे केले असून भाजपने महायुतीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषदेच्या गटात एकही जागा न दिल्याचे चित्र आहे.

मात्र पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने (शिंदे गट) आपटा, वहाळ, करंजाडे व पळस्पे या चार गणांमध्ये उमेदवार देत मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत दिले आहेत. पळस्पे पंचायत समिती गणामध्ये महाविकास आघाडीने शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवाराला संधी दिल्याने तेथे महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

करंजाडे गणामध्ये शेकाप व काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार दिल्याने शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार नशीब आजमावत आहेत. वहाळ गणात महायुतीतील तिन्ही पक्ष आमनेसामने असल्याने महायुतीच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे.

पंचायत समितीच्या एकूण 16 गणांपैकी नेरे, आदई, विचुंबे, कोन, वावेघर, वडघर व केळवणे या सात गणांमध्ये दुरंगी लढत होत आहे. आपटा, गव्हाण, करंजाडे, पोयंजे, पळस्पे व चिंध्रण या सहा गणांमध्ये तिरंगी लढत असून पाली देवद येथे चौरंगी सामना होणार आहे. वावंजे व वहाळ या दोन गणांमध्ये प्रत्येकी पाच उमेदवार एका जागेसाठी रिंगणात आहेत.

BJP
Pune Zilla Parishad Elections: पुण्यात 'मिनी मंत्रालयाच्या' निवडणुकीत बड्या नेत्यांच्या वारसदारांची एन्ट्री! ZP चा आखाडा राजकीय जॅकपॉट ठरणार?

FAQs :

Q1. पनवेल तालुक्यात किती उमेदवार निवडणूक लढवत आहेत?
👉 जिल्हा परिषदेसाठी 18 आणि पंचायत समितीसाठी 46 असे एकूण 64 उमेदवार मैदानात आहेत.

Q2. पनवेल निवडणुकीत प्रमुख लढत कोणामध्ये आहे?
👉 बहुसंख्य ठिकाणी भाजप आणि शेकाप यांच्यात थेट लढत पाहायला मिळते.

Q3. निवडणुकीत बहुकोनी लढती का होत आहेत?
👉 अनेक पक्ष व अपक्ष उमेदवार मैदानात उतरल्यामुळे दुरंगी, तिरंगी व चौरंगी लढती होत आहेत.

Q4. निकालावर कोणते घटक प्रभाव टाकू शकतात?
👉 शहरी मतदारसंख्या वाढ आणि ग्रामीण प्रश्नांचा कौल निकालासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

Q5. पनवेल निवडणूक राजकीयदृष्ट्या किती महत्त्वाची आहे?
👉 ही निवडणूक जिल्हास्तरीय राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाची असून भविष्यातील सत्ता समीकरणे ठरवू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com