Rajapur News : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर कोकणात उद्धव ठाकरे गट व शिंदे गट नेहमीच आमने सामने आले आहेत. त्यामुळे या दोन गटातील वाद आता कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यातच आता कोकणात ठाकरे गटाचे नेते राजन साळवी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत समोरासमोर आले आहेत.
राजापूर तालुक्यातील वाटुळ या गावी मुंबई गोवा हायवे लगत सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची उभारणी केली जाणार आहे. दरम्यान या हॉस्पिटलची उभारणी होण्यासाठी सुरुवातीला लागणारा काही निधी उपलब्ध करून देत असल्याचे उदय सामंत यांनी म्हटलं. त्यानंतर राजन साळवी यांनी उदय सामंत यांना आव्हान दिले आहे. (Rajan Salavi News)
राजपुरातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी थेट उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samnat) यांना राजकीय संन्यास घेण्याचं आव्हान दिलं आहे. राजन साळवी म्हणाले, रुग्णालयाच्या उभारणीसाठी पाठपुरावा केल्याचं उदय सामंत यांनी सिद्ध करावं अन्यथा राजकीत संन्यास घ्यावा, मी पाठपुरावा केल्याचं सिद्ध न केल्यास मी स्वतः राजकीय संन्यास घेईन.
सामंत यांच्या मतदारसंघातील जिल्हा रुग्णालयाच्या दुरावस्तेकडे सामंत यांनी लक्ष द्यावं. रुग्णालयासाठी लागणारी जमीन मिळवण्यापासून ते मंजुरीपर्यंत पाठपुरावा केल्याचं मी कागदपत्रांसह सिद्ध करेन, अन्यथा राजकीय संन्यास घेईन. पुढे बोलताना राजन साळवी (Rajan Salavi)म्हणाले, राजापूर - लांजा - साखरपा या विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून या रुग्णालयासाठी मी पाठपुरावा केला. त्याची कागदपत्र देखील माझ्याकडे उपलब्ध आहेत.
त्यानंतर उदय सामंत त्याचं श्रेय घेऊ पाहत आहेत. त्यांचे थोरले बंधू किरण सामंत यांनी पाठपुरावा केल्याचं सांगत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रयत्न केल्याचं देखील म्हणणं उदय सामंत यांचा आहे. पण उदय सामंत यांनी या रुग्णालयासाठी पाठपुरावा केल्याचं सिद्ध करावं. त्यांनी हे सिद्ध न केल्यास राजकीय संन्यास घ्यावा अन्यथा मी राजकीय संन्यास घेईन, असे थेट आव्हान साळवी यांनी सामंत यांना दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.