BMC election : '...तरीही मुंबईवर भगवा फडकणारच'; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Ramdas Kadam on Raj-Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकीय वर्तुळात ठाकरे बंधू आणि शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार अशा चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान मनसे - शिवसेना (उबाठा) एकत्र येण्याच्या चर्चांवर रामदास कदम यांनी निशाना साधत टीका केली आहे.
Ramdas Kadam on Raj-Uddhav Thackeray
Ramdas Kadam on Raj-Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : राज्यात सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसह शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर गुऱ्हाळ धुमसं लागली आहेत. दरम्यान मनसे - शिवसेना (उबाठा) एकत्र येण्याच्या चर्चांवर शिवसेना नेते रामदास कदम यांनी निशाना साधत टीका केली आहे. त्यांनी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागत विधानसभा निवडणुकीचा किस्सा सांगत उद्धव ठाकरेंनी दगाबाजी केली मात्र राज ठाकरे कोणतीच गोष्ट विसरलेले नाहीत, असे म्हणत खडे बोल सुनावले आहेत. ते साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

कदम यांनी यांनी, आदित्य ठाकरे यांच्या वेळी राज ठाकरे यांनी वरळीतून उमेदवार दिला नाही. मात्र उद्धव ठाकरे यांनी काय केलं? त्यांनी अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार दिला आणि आता महाराष्ट्राच्या मनात आहे, तसंच होईल असे सकारात्मक संकेत देत आहेत. 'उद्धवजी तुम्ही आज भावनेच्या भरात, आमचे कुटुंब आहे मग ज्या वेळेस नाती कुठं गेली होती? असा बोचरा सवाल केला आहे.

तसेच रामदार कदम यांनी, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काहीच सांगायची गरज नाही. हे गेल्या विधानसभेलाच स्पष्ट झालं असून जनतेने महायुतीवर विश्वास दाखवला आहे. यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र आले तरी किंवा मनसे-शिवसेना युती झाली तरिही काहीही फरक पडणार नाही. महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबईवर भगवा फडकणारच असा दावा केला आहे.

Ramdas Kadam on Raj-Uddhav Thackeray
Ramdas Kadam : स्थानिकच्या रणागंणावर 'कदम-कदम बढाये जा'चा नारा! सामंताच्या ऑफरमुळे रामदासभाईंना ताकद

यावेळी महायुतीत रंगलेल्या मोठा-भाऊ छोटा भाऊच्या प्रश्नावर कदम यांनी, आमच्याच कोण मोठं कोण छोटं हा प्रश्न नाही. आम्ही सगळे एकत्र आहोत. मुंबई मराठी माणसाची असून 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे. यामुळे मुंबई महानगरपालिकेवर भगवाच फडकायला हवा. यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे या दोघांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा, असेही आवाहन कदम यांनी यावेळी केले आहे.

'एक म्यान मे दो तलवार'

कदम पुढे म्हणाले की, उद्धव यांनी बाळासाहेबांच्या विचारांची पायमल्ली केली असून ते काँग्रेस बरोबर गेले आहेत. जे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात नव्हते. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळी राज ठाकरेंनी हात पुढे केला होता. त्याचा मी साक्षीदार असून बाळा नांदगावकर हे देखील साक्षीदार आहेत. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी रामदासभाई 'एक म्यान मे दो तलवार नही रहती है.' त्यामुळे राज ठाकरे यांना सोबत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. मग आता कसे एकत्र राहणार असाही सवाल कदम यांनी उपस्थित केला आहे.

Ramdas Kadam on Raj-Uddhav Thackeray
Ramdas Kadam On Thackeray: रामदास कदमांनी दिशा सालियन प्रकरणावरुन ठाकरेंवर हल्ला चढवलाच; म्हणाले,'शिवसेनाप्रमुखांच्या नातवावर बलात्काराचा...'

आताची भूमिका राजकीय स्वार्थापोटी

सध्या उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका ही राजकीय स्वार्थापोटी आहे. त्यांना कुठेही राज ठाकरे यांच्याबद्दल आस्था, प्रेम, जिव्हाळा, ओलावा असं काही नाही. राज ठाकरेंची भूमिका ही सडेतोड असून त्यांच्या जे पोटात आहे तेच ओठावर असते. पण याच्याबरोबर उलटे उद्धव ठाकरे आहेत. राज ठाकरे उद्धव ठाकरेंना जवळून ओळखतात. आता उद्धव हात पुढे करत आहेत. पण राज ठाकरे टाळी देतील असं वाटतं नसल्याचा दावाही कदम यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com