थकबाकीदार राणे काय बॅंक चालविणार : शिवसेनेचे आमदार केसरकरांचा प्रहार

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची उलाढाल २४०० कोटीवर
Deepak Kesarkar-Nitesh Rane
Deepak Kesarkar-Nitesh RaneSarkarnama
Published on
Updated on

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : ‘‘आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांचं शिक्षण प्रसारक मंडळ हे सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेचे थकबाकीदार आहे. त्यामुळे बँकेच्या मतदानापासून ते वंचित राहिले आहेत. सहकार मंत्री अमित शहा (Amit Saha) यांच्याकडून कर्ज घेऊन ते अजून डिफॉल्टर होतील. बँक ही चांगल्या कर्जदार आणि ठेवीदार यांच्यावर चालते. निवडणुकीवेळी बोलेरो गाडी जिल्हा बँकेकडून घेऊ शकतात, ते लोक काही करू शकतात. वसंत केसरकर यांच्या नावानेसुद्धा बोलेरो गाडी घेतली होती. जे स्वतःच्या संस्थेचे कर्ज फेडू शकले नाहीत. स्वतः कर्जदार आहेत, ते बँक काय चालविणार?’’ अशा शब्दांत शिवसेनेचे (Shivsena) आमदार दीपक केसरकर यांनी नीतेश राणे यांच्यावर प्रहार केला. (Rane's Board of Education is arrears of Sindhudurg District Bank: Deepak Kesarkar)

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून ही निवडणूक महाविकास आघाडी कशाप्रकारे लढविणार आहे, याची माहिती देण्यासाठी सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवनमध्ये आज पत्रकार परिषद घेण्यात आली. त्या वेळी आमदार केसरकर बोलत होते. या वेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, राष्ट्रवादीचे व्हिक्टर डांटस, काँग्रेसचे विद्याप्रसाद बांदेकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, जान्हवी सावंत, नागेंद्र परब, संजय आंग्रे, आर. टी. मर्गज, मनीष पारकर आदी उपस्थित होते.

Deepak Kesarkar-Nitesh Rane
विश्वजित कदमांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी ताकदीने निवडणूक लढवणार

यावेळी बोलताना आमदार केसरकर यांनी महाविकास आघाडीचा जिल्हा बँक जागांबाबत फॉर्म्युला ठरलेला आहे. त्या-त्या पक्षांनी आपले कोणते उमेदवार द्यायचे ? हे ठरविण्याचा अधिकार त्या-त्या पक्षाला आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज छाननीनंतर कोणत्या पक्षाला किती जागा व उमेदवारांची नावे सतीश सावंत जाहीर करतील, असे सांगितले.

Deepak Kesarkar-Nitesh Rane
भाजपने मनाचा मोठेपणा दाखवून चंद्रकांत जाधवांच्या पत्नीला बिनविरोध विधानसभेत पाठवावे

यावेळी त्यांनी हा जिल्हावासीयांसाठी कसोटीचा काळ आहे. (कै.) शिवरामभाऊ जाधव यांनी ही बँक रुजविली आहे. त्यांच्यानंतर हा वारसा कोण चालविणार? असा प्रश्न निर्माण झाला होता; मात्र सावंत यांनी ही जागा भरून काढली आहे. जनतेत जिल्हा बँक आपली असल्याची भावना त्यांनी निर्माण केली आहे. दबाव झुगारून जनतेला सोयीचे निर्णय घेतले आहेत. आतापर्यंत मी सहकार निवडणूक प्रचारासाठी गेलो नव्हतो; परंतु यावेळी सावंत यांच्यासाठी प्रचार करणार आहे. जिल्हा बँक हे जिल्ह्याचे वैभव असून ते टिकविण्याची गरज आहे. यावेळी त्यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर टीका करताना जे स्वतःच्या संस्थेचे कर्ज फेडू शकले नाही. स्वतः कर्जदार आहे ते बँक काय चालविणार? असा प्रश्न केसरकर यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com