Ratnagiri Assembly bogus voters : ठाकरेंच्या शिलेदारांनं फोडला 'पेन ड्राईव्ह बॉम्ब'; बोगस मतदारांची माहिती विधानसभेलाच होती, पण...

ShivsenaUBT Bal Mane alleges 23000 bogus voters in Ratnagiri : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे उपनेते माजी आमदार बाळ माने यांनी बोगस मतदारांबाबत दावा करत खळबळ उडवून दिली.
ShivsenaUBT Bal Mane
ShivsenaUBT Bal ManeSarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri voter fraud allegation : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा मुद्दा देशभर गाजत असताना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधी पक्ष खूपच सावध झाला आहे. मतदार याद्यांवर काम करत, निवडणूक आयोगाला धारेवर धरत आहेत.

यातून बोगस मतदार शोधून विरोधकांकडून निवडणूक आयोगावर हल्ले चढवले जात आहे. अशीच बोगस मतदारांच्या मुद्यावर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे उपनेते माजी आमदार बाळ माने आक्रमक झाले आहेत.

उपनेते माजी आमदार बाळ माने यांनी पत्रकार परिषद घेऊन, रत्नागिरी विधानसभा मतदार संघात तब्बल 23 हजार बोगस मतदार असल्याचा दावा केला. तशा याद्याच त्यांनी पत्रकार परिषदेत मांडल्या. या बोगस मतदारांचा पेन ड्राईव्ह करत, ही नावे निवडणूक आयोगाला (Election Commission) पाठवून ती रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. आता यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेतो, बाळ माने यांच्या बोगस मतदारांच्या याद्याची चौकशी करणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, शहरसंघटक प्रसाद सावंत आणि माजी नगरसेविका रशीदा गोदड या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

बाळ माने म्हणाले, बोगस मतदारांची माहिती विधानसभा निवडणुकीच्या वेळीच आम्हाला मिळाली होती. यावर आम्ही आक्षेप पण घेतला होता. निवडणूक अधिकाऱ्यांकडे आणि निवडणूक निरीक्षकांकडे या बोगस मतदारांविषयी (Voter) तक्रार केली होती. यामध्ये दुबार मतदार नावांचा समावेश होता. निवडणूक निरीक्षकांनी आमची बाजू ऐकूनच घेतली नाही, असा गंभीर आरोप बाळ माने यांनी केला.

ShivsenaUBT Bal Mane
Simranjit Kaur: ट्रक ड्रायव्हरची मुलगी न्यायाधीश बनली अन् बापाची 56 इंच छाती अभिमानानं फुगली

एकनाथ शिंदेंवर गैरप्रकाराचा आरोप

बाळ माने यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केला. मुख्यमंत्री असल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्रादत उमेद अधिकाऱ्यांचा निवडणुकीच्या काळात वापर करून बचत गटांना आमिष दाखवण्याचे काम केले. रत्नागिरीतही एक अधिकारी उदय सामंत यांच्या प्रचाराचे काम करत होत्या, असा खळबळजनक आरोप केला.

ShivsenaUBT Bal Mane
MVA protest Mumbai : महायुतीला पैसे मिळाले... महाविकास आघाडीचा जळफळाट; मुंबईच्या रस्त्यांवर उतरणार नेत्यांची फौज

उदय सामंत यांचा निवडणुकीपूर्वीचा सर्व्हे...

उदय सामंत यांच्यावर आरोप करताना, बाळ माने यांनी निवडणूकीपूर्वीच्या सर्व्हेकडे लक्ष वेधले. सर्व्हेमध्ये उदय सामंत यांचा टांगा पलटी होणार, असा अहवाल असताना अचानक बदल कसा झाला? यातूनच बोगस मतदारांचा त्यांनी आधार घेतला. हाच धोका आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्भवू शकतो, याकडे बाळ माने यांनी लक्ष वेधले. यासाठी भावी उमेदवारांनी जागृत राहावे. मतदार याद्यांवर काम करावे, असे आवाहन बाळ माने यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com