MVA protest Mumbai : महायुतीला पैसे मिळाले... महाविकास आघाडीचा जळफळाट; मुंबईच्या रस्त्यांवर उतरणार नेत्यांची फौज

Political News : लवकरच मुंबई महापालिकेतील निधी वाटपावरून महाविकास आघाडी उतरणार रस्त्यावर उतरणार असून निवडणुकीच्या तोंडावर घेरण्याची तयारी सुरु केली आहे.
Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar
Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या सर्वच पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले असतानाच आता मुंबई महापालिकेतील निधी वाटपावरून वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या पाच वर्षांपासून पालिकेवर प्रशासकांचे राज आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना किरकोळ कामासाठी निधी दिला जात नसल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्याचमुळे लवकरच मुंबई महापालिकेतील निधी वाटपावरून महाविकास आघाडी उतरणार रस्त्यावर उतरणार असून निवडणुकीच्या तोंडावर घेरण्याची तयारी सुरु केली आहे.

मुंबई महापालिका विसर्जित झाल्यापासून 227 प्रभागातील विकास कामांना खीळ बसला आहे. तर दुसरीकडे मुंबईतील पालकमंत्र्यांनी महापालिकेतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्ताधारी पक्षांचे आमदार व माजी नगरसेवकांना निधीवाटप करीत आहेत, असा दावा विरोधकांनी केला आहे.

Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar
Balasaheb Thackeray: रामदास कदमांच्या दाव्याप्रमाणे खरंच बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह 2 दिवस घरी होता? त्यांचा मृत्यू कधी झाला होता अन् घोषणा कोणी केली?

त्यांच्या या कृतीमुळे विरोधी पक्षांच्या माजी नगरसेवकाच्या प्रभागावर अन्याय होत आहे. त्यामुळे येत्या काळात महाविकास आघाडीतील काँग्रेस (Congress), उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येत आता आंदोलन करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी येत्या काळात या तीन पक्षांच्या नेत्याची बैठक होणार असून त्यामध्ये आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात येणार आहे.

Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar
Shivsena Dasara Melava: रामदास कदम यांचं दसरा मेळाव्यात धक्कादायक विधान; म्हणाले,'बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह 2 दिवस…'

त्यासोबतच राज्य सरकारकडून पक्षपातीपणाचा निर्णय घेतला जात असल्याने या विरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी केली जात आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून येत्या काळात केवळ महानगरपालिका प्रशासनालाच धारेवर धरले जाणार आहे. त्यासोबतच या मुद्द्यावरून येत्या काळात राज्य सरकारची कोंडी केली जाणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकानी दिली आहे.

Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंकडून लाडक्या बहिणींना नवी उपमा, पगारी मतदार! शेतकऱ्यांचे दु:खही सांगितलं!

मुंबई शहर व उपनगरात महाविकास आघाडीचे 10 ते 12 आमदार आहेत. तर त्यासोबतच 60 पेक्षा अधिक माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे या सर्व मंडळींवर निधी वाटप न करता राज्य सरकारकडून अन्याय केला जात आहे. त्यामुळेच या दुर्लक्ष करीत असलेल्या प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी महाविकास आघाडीकडून केली जात आहे.

Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar
Uddhav Thackeray: 'स्थानिक'च्या निवडणुकीचा अजेंडा ठाकरेंकडून सेट; भाजप, फडणवीसांसाठी चक्रव्यूह !

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com