Ratnagiri News : शेतकऱ्यांना दिलासा! कृषी समृद्ध योजनेतून रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यास मिळणार 74 कोटींचा निधी

Krushi Samrudhhi Yojana : कृषी यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी, “नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या” धर्तीवर राज्यात “कृषि समृद्धी योजना” सुरू करण्यात आली आहे.
Krushi Samrudhhi Yojana
Krushi Samrudhhi Yojanasarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. कृषी समृद्धी योजनेतून रत्नागिरी जिल्ह्यासाठी 17 कोटी 68 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

  2. हा निधी शेतकऱ्यांच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी वापरला जाणार आहे.

  3. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी आर्थिक मदत ठरणार आहे.

Chiplun News : राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवणं, पायाभूत सुविधा निर्माण करणं, उत्पादन खर्च कमी करणं, उत्पादकता वाढवणं, पिकांमध्ये विविधता आणणं, मूल्यसाखळी बळकट करणं, तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणं, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी “नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या” धर्तीवर कृषी समृध्दी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याला 74 कोटींचा निधी मिळणार आहे. त्यापैकी 17 कोटी 68 लाख निधीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे.

एकीकडे जिल्ह्यासह राज्यात अतिवृष्टीने हाहाकार माजवला असून विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे विरोधकांकडून शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची मागणी केली जातेय.

अशा वेळी कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी जिल्ह्याला जिल्ह्यासाठी 17 कोटी 68 लाख निधी मंजुर झाला आहे. या योजनेसाठी दरवर्षी 5 हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक केली जातेय. या योजनेचा उद्देश हा कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढवणे आणि पिकांमध्ये विविधता आणणे, असा आहे.

Krushi Samrudhhi Yojana
Ratnagiri Politics : तळ कोकणात मनसेला डबल धक्का! खेडेकरांनंतर राज ठाकरेंचा मोठा शिलेदारही भाजपच्या वाटेवर?

रत्नागिरी जिल्ह्याला यातील निधी मिळाल्यानंतर प्रत्येक कृषी सजातील सहाय्यक कृषी अधिकारी यांना जवळपास 50 लाखांचा निधी शेतकऱ्‍यांच्या कृषी योजनांसाठी दिला जाणार आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर या योजनेची माहिती मिळणार आहे.

राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना, त्यामध्ये ब्रशकटर, पॉवरटिलर, ट्रॅक्टर, फवारणी पंप मिळणार आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, मुख्यमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना या योजनांचा समावेश या योजनेत असणार आहे.

कृषी समृद्धी योजनेतून शेतकरी खऱ्या अर्थाने समृद्ध होईल. योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅक नोंदणी असणे आवश्यक आहे. या योजनेत शेतकऱ्‍यांना 40 आणि महिला शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान असणार आहे. या योजनेतून चिपळूण तालुक्याला नक्की किती निधी प्राप्त होईल, हे अजून निश्चित नाही. ते जिल्हास्तरावर ठरेल. प्रशासकीय मंजुरीचा एक भाग असेल. जास्तीत जास्त निधी चिपळूणला प्राप्त व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न राहतील.

- शत्रुघ्न म्हेत्रे, तालुका कृषी अधिकारी, चिपळूण

Krushi Samrudhhi Yojana
Ratnagiri Politics : परबांपाठोपाठ जाधवही कदमांचा काटा काढणार?

FAQs :

प्र.१: रत्नागिरी जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर झाला आहे?
उ: 17 कोटी 68 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

प्र.२: हा निधी कोणत्या योजनेतून देण्यात आला आहे?
उ: कृषी समृद्धी योजनेतून हा निधी देण्यात आला आहे.

प्र.३: या निधीचा उद्देश काय आहे?
उ: शेतकऱ्यांच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी हा निधी आहे.

प्र.४: कोणत्या जिल्ह्यासाठी हा निधी मंजूर झाला आहे?
उ: रत्नागिरी जिल्ह्यासाठी.

प्र.५: शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ कसा मिळेल?
उ: शेतकरी कृषी विभागाच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com