Ratnagiri Politics : परबांपाठोपाठ जाधवही कदमांचा काटा काढणार?

Ramdas Kadam Vs Bhaskar Jadhav : गेल्या काही दिवसांपासून कोकणात पुन्हा शिवसेना विरूद्ध शिवसेना असा सामना सुरू झाला आहे. येथे सत्तेत असणाऱ्या कदम पिता-पुत्राला घेरण्याचे काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार करताना दिसत आहेत. आमदार भास्कर जाधव आणि आमदार अनिल परब यांनी शिवसेनेविरोधात दंड थोपाटले आहेत.
Bhaskar Jadhav On Ramdas Kadam And yogesh Kadam
Bhaskar Jadhav On Ramdas Kadam And yogesh Kadamsarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. कोकणात पुन्हा शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

  2. उद्धव ठाकरे गटाचे भास्कर जाधव आणि अनिल परब यांनी सत्ताधारी कदम पिता-पुत्र यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

  3. या संघर्षामुळे कोकणातील राजकीय वातावरण तापले असून स्थानिक राजकारणात तणाव निर्माण झाला आहे.

Ratnagiri politics : पावसाळी अधिवेशनात अनिल परब यांनी रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांच्याविरोधात गंभीर आरोप केले होते. तसेच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे कारवाईची मागणी केली होती. यामुळे योगेश कदम अडचणीत आले होते. हे प्रकरण कसंतरी शांत होतंय तोवर मुंबईत पोलिसांनी सावली बारवर कारवाई केली आणि पुन्हा एकदा योगेश कदम अडचणीत सापडले.

अनिल परबांना पुन्हा एकदा आयतं कोलित मिळालं. त्यांनी हा बार कदम यांच्या आईच्या नावे असून मुली नाचवल्या जात असल्याचा आरोप केला आणि राज्यात खळबळ उडाली. त्यांचा राजीनामा मागितला. यात दस्तुरखूद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच सभागृहात निवेदन करावे लागले. कदमांविरोधात पुरावेही मुख्यमंत्र्यांना दिले.

Bhaskar Jadhav On Ramdas Kadam And yogesh Kadam
Ratnagiri Political News : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नवा 'ट्विस्ट'

एकीकडे परबांचे वार सुरू असतानाच योगेश कदम यांनी गुहागरला जाऊन आमदार भास्कर जाधवांना छेडण्याचे काम केले. माजी मंत्री रामदास कदम यांनीही यात साथ दिली. आता चिपळूण आणि गुहागरवरही भगवा फडकवू असा दावा केला. गत विधानसभेला माझ्या सभा लागल्या नाही, अन्यथा भास्कर जाधव 20 हजारांनी आडवा झाला असता असं कदम म्हणाले.

यामुळे चिडलेल्या भास्कर जाधव यांनी जोरदार पलटवार करताना, रामदार कदम हे बामदास कदम असून ते छमछमदास आहेत. तो ठार वेडा असल्याची टीका केली. तर ज्या योगेश कदम यांनी मतदारसंघात पेरणी करून भगवा फडकवू असा दावा केला, त्यांच्याविरोधात भास्कर जाधव यांनी थेट उमेदवारच जाहीर करून टाकला यामुळे गुहागरसह रत्नागिरीतील राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे.

भास्कर जाधव यांनी योगेश कदम यांच्या विरोधात भर सभेत उमेदवारच जाहीर करताना, जेवढा निधी आमदार म्हणून दापोली विधानसभा मतदारसंघात कदमांनी आणला नाही, त्यापेक्षा जास्त निधी यापुढे गुहागर मतदार खेचून आणू असे म्हटले. तर कुणबी कार्ड काढत योगेश कदमांच्या विरोधात सहदेव बेटकरांना आपण बळ देऊ असे जाहीर केले. तसेच सहदेव बेटकर आता आमदार व्हायच्याच कामाला लागा, तुम्ही आमदार झालात असं समजा असेही सांगितले. यामुळे आता कदम पिता पुत्रांच्याविरोधत सध्यातरी शिवसेनेते दोन आक्रमक आमदारांनी भुमिका घेतल्याचे दिसत आहे. ज्याचा परिणाम आगामी स्थानिकमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

Bhaskar Jadhav On Ramdas Kadam And yogesh Kadam
Ratnagiri Politics : रत्नागिरी-सिंधुदुर्ग आमचाच; कार्यकर्त्यांनी किरण सामंत यांचे स्टेटस ठेवल्याने चर्चांना उधाण

FAQs :

प्र.१: कोकणातील शिवसेना संघर्षात कोण सहभागी आहेत?
उ: उद्धव ठाकरे गटातील भास्कर जाधव आणि अनिल परब यांनी कदम पिता-पुत्र यांच्यावर राजकीय हल्ला केला आहे.

प्र.२: संघर्षाचे कारण काय आहे?
उ: स्थानिक नेतृत्व आणि सत्तेवर पकड या मुद्द्यांवरून गटांमध्ये वाद निर्माण झाला आहे.

प्र.३: याचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
उ: संघर्षामुळे कोकणातील राजकीय समीकरणे बदलू शकतात आणि आगामी निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com