Bjp Vs Shivsena : भाजपमध्ये अंतर्गत कुरबूरी? महायुतीत संघर्षाची ठिणगी? राणे, सामंत, चव्हाण वादाच्या केंद्रस्थानी

Narayan Rane, Uday Samant, Ravindra Chavan : कोकणातील रायगडमध्ये महायुतीत मिठाचा खडा पडल्याने आता राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच रत्नागिरीतही निधी आणि पद वाटपावरून महायुतीत संघर्ष सुरू झाला आहे.
Narayan Rane, Uday Samant, Ravindra Chavan Political Struggle In Mahayuti
Narayan Rane, Uday Samant, Ravindra Chavan Political Struggle In Mahayuti sarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri : मुज्जफर खान

राज्याच्या महायुतीत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून फुट पडण्याची शक्यता आहे. रायगडमध्ये तर शिवसेनेनं फक्त युतीचाच नारा दिला आहे. यामुळे सध्या रायगड राजकारणाचे हॉटस्पॉट होण्याची शक्यता असतानाच रत्नागिरीचेही राजकारण आता तापण्यास सुरूवात झाली आहे. येथे निधी आणि पद वाटपावरून महायुतीत संघर्ष सुरू झाला असून शिवसेना मंत्री उदय सामंत, खासदार नारायण राणे आणि भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण वादाचे केंद्रस्थान बनत आहेत. तर भाजपमध्ये अंतर्गत कुरबूरीही समोर येत आहे.

राज्यात महायुतीची सत्ता आली असून भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहेत. सध्या आगामीच्या पार्श्वभूमीवर भाजपसह दोन्ही मित्र पक्षात प्रवेश होताना दिसत आहेत. यामुळे कुटुंब वाढत आहे. पण आता भांडी भाड्याला लागताना दिसत असून प्रत्येक पक्षाची महत्वाकांक्षा वाढताना दिसत आहे. हाच अनुभव सध्या रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना-भाजपमधील पदाधिकाऱ्यांना येऊ लागला आहे. पक्षातील पदांचे वाटप असो किंवा निधीचा वाटप असो यावरून महायुतीमध्ये संघर्ष पेटू लागला आहे. याचे पडसाद नुकतेच चिपळूणमध्ये उमटले. भाजप खासदार नारायण राणेंनी थेट रवींद्र चव्हाण यांनाच इशारा दिल्याने महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल नाही, असा संदेश राजकीय क्षेत्रात गेला आहे.

खासदार राणे काँग्रेसमध्ये असताना त्यांनी काँग्रेस वाढवण्याचा प्रयत्न केला; मात्र नेतृत्वाकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील पक्षाला कोकणात राणेंसारखे खमके नेतृत्व मिळवूनही हा पक्ष तालुक्यात फारसा वाढला नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांना राणे समर्थक अशी ओळख शेवटपर्यंत मिळाली. राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी कोकणात भाजप वाढवण्याचा प्रयत्न केला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा जिंकण्यासाठी त्यांनी पक्षासह स्वतःचे नेटवर्क वापरले.

Narayan Rane, Uday Samant, Ravindra Chavan Political Struggle In Mahayuti
Mahayuti alliance : विधानसभेचे विरोधक झाले महायुतीचे भागीदार; मेगाभरतीमुळे मित्रपक्षातच पडणार ठिणगी !

आता पक्ष वाढवत असताना त्यांच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा अशी त्यांची व कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. मात्र भाजपमध्येही राणे समर्थकांना काँग्रेससारखीच वागणूक मिळत असल्याची तक्रार त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाहीर कार्यक्रमात मांडायला सुरवात केली आहे. भाजप शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळखला जातो. इतर पक्षातून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांना कोणतेही पद लगेच दिले जात नाही. असे आजवर चित्र आहे. मात्र ठाकरे गटाचे शहरप्रमुख शशिकांत मोदी एकटेच भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना शहर मंडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले.

यामुळे भाजपमध्ये अंतर्गत कुरबूरी आता समोर आली असून राणे समर्थकांसह एकूण 13 कार्यकर्ते नाराज झाले. विशेष म्हणजे शहरप्रमुखपदासाठी इच्छुकांच्या मुलाखतीसुद्धा घेण्यात आल्या नाहीत, अशी खंतही राणे समर्थक व्यक्त करत आहेत. चिपळूणमध्ये राणे समर्थकांचे वजन वाढू नये किंवा त्यांना मोकळीक मिळू नये म्हणून भाजपमधील दुसरा गट प्रयत्न करत असल्याची चर्चा सध्या सुरू चिपळूणमध्ये सुरू आहे.

याच चर्चा चिपळूण दौऱ्यावर असताना खासदार राणे यांच्या कानावर गेल्या. त्यावेळी त्यांनी संताप व्यक्त करताना पक्षाचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे नाव न घेता थेट आव्हानच दिले. त्यामुळे आता भाजपमध्ये चव्हाण विरूद्ध राणे असे युद्ध सुरू होणार की, राणे समर्थकांना न्याय मिळून हा वाद संपणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

वाद उफाळून येण्याची शक्यता

महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रायगड जिल्ह्यात वादाची ठिणगी पडली असताना रत्नागिरी जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेत वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. कारण, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत भाजप कार्यकर्त्यांना निधी देत नाही, अशीही तक्रार खासदार नारायण राणेंकडे गेली आहे. मात्र राणेंनी तूर्तास या विषयावर भाष्य केलेले नाही; मात्र राणेंनी कार्यकर्त्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. पक्ष वाढवण्याचा आणि त्यातून ओळख निर्माण करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे शिवसेना विरूद्ध भाजप तिढा वाढेल की, राणे कार्यकर्त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Narayan Rane, Uday Samant, Ravindra Chavan Political Struggle In Mahayuti
Mahayuti Government : महायुती सरकारमध्ये मंत्रीच अस्वस्थ, अधिकार मिळेनात? CM फडणवीसांना साकडे!

भाजपच्या चौकटीत राहून काम : मोदी

शिवसेनेतून भाजपमध्ये आल्यानंतर शशिकांत मोदी यांना शहराध्यक्षपद मिळाले. पक्षाच्या या कृतीबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी खासदार नारायण राणेंकडे नाराजी व्यक्त केली. या संदर्भात शहरप्रमुख शशिकांत मोदी यांच्याशी संपर्क केला असता मला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. काम करायचे आहे, असे सांगून भाजपच्या चौकटीत राहून काम करण्याचे संकेत दिले आहेत.

भाजपच्या चौकटीत राहून काम : मोदी

शिवसेनेतून भाजपमध्ये आल्यानंतर शशिकांत मोदी यांना शहराध्यक्षपद मिळाले. पक्षाच्या या कृतीबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी खासदार नारायण राणेंकडे नाराजी व्यक्त केली. या संदर्भात शहरप्रमुख शशिकांत मोदी यांच्याशी संपर्क केला असता मला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. काम करायचे आहे, असे सांगून भाजपच्या चौकटीत राहून काम करण्याचे संकेत दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com