

रत्नागिरी पालिकेच्या प्रभाग 10 मधील निवडणूक अपक्ष उमेदवारांच्या अपिलानंतर राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केली.
सचिन शिंदे आणि संपदा रसाळ यांच्या अर्जांमध्ये त्रुटी असल्याने ते आधी अवैध ठरवले होते.
आयोगाने स्वतंत्र निवडणूक कार्यक्रम जाहीर करून 20 डिसेंबरला मतदान आणि 21 डिसेंबरला निकाल निश्चित केला.
Ratnagiri News : मतदान अवघ्या काही तासांवर आले असताना बारामती, अंबरनाथ, महाबळेश्वर, फलटणसह 10 पालिकांमधील संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच स्थगित करण्यात आली आहे. तसेच साधारण 20 जिल्ह्यातील काही नगरपालिकांच्या प्रभागात निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने (SEC) घेतला आहे. त्यात पुणे, कोल्हापूर, सोलापूरसह कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याचाही समावेश आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील 4 नगर परिषदा व 3 नगरपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणूका होत आहेत. यादरम्यान रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीला वेगळी कलाटणी मिळाली आहे. दोन अपक्ष उमेदवारांनी केलेल्या अपिलानंतर निवडणूक आयोगाने प्रभाग 10 मधील निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याला निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी दुजोरा दिला असून या निवडणुकीचा स्वतंत्र निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या प्रभागात आता 20 डिसेंबरला मतदान तर 21 तारखेला निकाल जाहीर होणार आहे.
नगर पालिकेच्या प्रभाग क्र. 10 मधील अपक्ष उमेदवार संपदा रसाळ-राणा आणि सचिन सदानंद शिंदे यांचे नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवले होते. याविरोधात जिल्हा न्यायालयात त्यांनी धाव घेतली होती. सुनावणीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा नामनिर्देशन पत्र अवैध ठरवण्याचा निर्णय जिल्हा न्यायालयाने कायम ठेवत दोघांची याचिका फेटाळली होती.
तर पालिकेच्या प्रभाग क्र. 10 मधील यांच्या उमेदवारी अर्जातील प्रतिज्ञापत्र नोटरी केलेले नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी दोन्ही उमेदवारांची नामनिर्देशन पत्र अवैध ठरवली होती. या निर्णयाविरुद्ध त्या उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामुळे येथील चिन्ह वाटपाचा कार्यक्रम बाजूला ठेवण्यात आला होता.
पालिकेच्या प्रभाग क्र. १० मधील अपक्ष उमेदवार संपदारसाळ राणा आणि सचिन सदानंद शिंदे यांचे उमेदवारी अर्ज किंवा नामनिर्देशन पत्र निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या नव्या प्रतिज्ञापत्रावर नसल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांचेही अर्ज अवैध ठरवले. उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र नोटरी केलेले नसल्याने दोघांचेही उमेदवारी अर्ज बाद ठरवले गेले. १८ नोव्हेंबर उमेदवारी अर्जांची छाननी झाली. त्यावेळी या दोन्ही अपक्ष उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात दोन्ही अपक्ष उमेदवारांनी महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १५ नुसार न्यायालयात अपील दाखल केले. या अपिलात त्या प्रभागातील उमेदवार श्वेता कोरगावकर, मानसी करमरकर, राजेश तोडणकर आणि राजाराम रहाटे यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
पण आता ही निवडणूक आता 2 डिसेंबर ऐवजी 20 डिसेंबरला होणार आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. तसेच जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीमध्ये ज्या जागेसाठी अपील दाखल होते; परंतु अपिलाचा निकाल संबंधित जिल्हा न्यायालयाकडून 22 नोव्हेंबर 2025 नंतर म्हणजेच 23 नोव्हेंबर 2025 किंवा तद्नंतर दिलेला आहे, अशा नगरपालिका व नगरपंचायतींच्या सदस्य पदाच्या त्या जागेच्या निवडणुका 4 नोव्हेंबर 2025 च्या कार्यक्रमानुसार घेण्यात येऊ नयेत, असे त्या अध्यादेशामध्ये म्हटले आहे. याच आधारे प्रभाग 10 ची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केल्याचे म्हटले आहे.
नवा निवडणूक कार्यक्रम...
प्रभाग 10 साठी नवीन कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची तारीख 10 डिसेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. आवश्यकतेप्रमाणे निवडणूक चिन्ह देऊन, अंतिम लढवणाऱ्या निवडणूक उमेदवारांची यादी 11 डिसेंबरला प्रसिद्ध करायची असून 20 डिसेंबरला सकाळी 7.30 ते 5.30 पर्यत मतदान होईल. तर मतमोजणी 21 डिसेंबरला सकाळी 10 वाजता होणार आहे. तर येथे 4 डिसेंबरपासून प्रभागापुरती आचारसंहिता लागू होणार आहे.
1. प्रभाग १० ची निवडणूक का स्थगित करण्यात आली?
अपक्ष उमेदवारांनी अर्ज अवैध ठरवण्याविरोधात अपील केल्यानंतर आयोगाने तपास करून निवडणुकीला स्थगिती दिली.
2. कोणाचे अर्ज अवैध ठरवण्यात आले होते?
सचिन शिंदे आणि सौ. संपदा रसाळ – राणा यांचे अर्ज काही त्रुटीमुळे अवैध ठरले.
3. नवीन मतदानाची तारीख कोणती आहे?
२० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे.
4. निकाल कधी जाहीर केला जाणार आहे?
मतदानानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २१ डिसेंबरला निकाल जाहीर केला जाईल.
5. निवडणूक स्थगितीची माहिती कोणी दिली?
निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी याची पुष्टि केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.