Beed Municipal Election : फडणवीस, अजितदादा, पंकजा मुंडेंनी लक्ष घातलं... बीडचा क्षीरसागरांचा बालेकिल्ला जिंकण्यासाठी सर्वपक्षीय धडपड

Beed Municipal Election: Big Leaders Focus : बीड नगरपालिका निवडणुकीत फडणवीस, अजित पवार, पंकजा मुंडे आणि धनुभाऊंचे लक्ष क्षीरसागरांच्या बालेकिल्ल्यावर. विजयासाठी सर्व पक्षांची धडपड.
Beed Municipal Election
Beed Municipal ElectionSarkarnama
Published on
Updated on

Beed : नगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून प्रत्येक नेत्यांनी आता 'जिंकण्यासाठी वाट्टेल ते' भूमिका घेतली आहे. मतदानाची घटिका समीप आल्याने बीडमध्ये थंडीत देखील राजकीय गरमागरमी सुरू आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठ्या बीड नगर पालिकेवर सत्तेचा झेंडा फडकविण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजपने कंबर कसली आहे. या निवडणूक निकालात बाजीगर कोण ठरणार आणि धक्का कोणाला बसणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.


नगराध्यक्षपदासाठी वरील तीन पक्षांसह काँग्रेस, एमआयएम, वंचितसह एकूण 19 उमेदवार रिंगणात आहेत. नागराध्यक्षपदासह आता 52 ऐवजी 51 नगरसेवकांसाठी निवडणूक होत आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठ्या बीड नगर पालिकेसाठी पालकमंत्री असल्याने उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनीही ताकद लावली आहे. तर, राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनीही बीडवर लक्ष केंद्रित केले आहे. विशेष म्हणजे, शेवटच्या टप्प्यात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सभा घेतली आहे. दरम्यान, वरिष्ठ नेत्यांचे लक्ष लागले असले तरी स्थानिक पातळीवर आमदार विजयसिंह पंडित, आमदार संदीप क्षीरसागर आणि डॉ. योगेश क्षीरसागर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

निवडणुकीसाठी या प्रमुख पक्षांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून स्मिता वाघमारे उमेदवार आहेत. त्यांचे पती विष्णू वाघमारे 20 वर्षे नगरसेवक तसेच सभापती तर स्वत: स्मिता वाघमारे 10 वर्षे नगरसेवक आणि सभापती राहीलेल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रेमलता पारवे या उमेदवार आहेत. त्या स्वत: महसूल अधिकारी आहेत. तर, भाजपकडून बधीरीकरण तज्ज्ञ डॉ. ज्योती घुंबरे उमेदवार आहेत. त्यांच्या माध्यमातून भाजपने हिंदू प्रयोग केला आहे. एमआयएम, वंचित, कॉंग्रेससह इतर उमेदवार देखील आपापल्या परीने ताकद लावत आहेत.

Beed Municipal Election
Sanjay Raut : महिन्याच्या ब्रेकनंतर 'मराठी बाणा' पुन्हा मैदानात; संजय राऊतांचा मोठा दावा: शिंदे गटावर शाह यांची 'सर्जिकल स्ट्राईक'?

दरम्यान, निवडणुकीतील उमेदवारी दाखल करण्याच्या प्रक्रीयेदरम्यानच सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बेबनाव झाला. यामुळे आमदार विजयसिंह पंडित यांना बीडमध्ये लक्ष घालावे लागले. पंडित पवार 50 वर्षांपासून बीड शहराच्या राजकारण, समाजकारणात सक्रीय आहे. मात्र, यावेळी प्रथमच ते थेट नेतृत्व करत आहेत. तर, एक सत्तापक्ष सोडला असला तरी डॉ. योगेश क्षीरसागर यांनाही भाजपसारखा दुसरा सत्तापक्ष भेटला आणि पक्षाला बीडमध्ये राजकीय नाव असलेले स्थानिक नेतृत्व भेटले. त्यामुळे त्यांनीही भाजपसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यांच्या साथीला काका जयदत्त क्षीरसागर व पत्नी डॉ. सारिका क्षीरसागरही मैदानात आहेत.

Beed Municipal Election
CM Devendra Fadnavis : आयोगाच्या निवडणूक स्थगिती निर्णयावर देवेंद्र फडणवीसांची तीव्र नाराजी; म्हणाले,'ही मोठी..!'

आमदार संदीप क्षीरसागर यांनाही बीडच्या निवडणुकीचा चांगला अनुभव आहे. मागच्या निवडणुकीत संविधानाकि पदावरही नसताना त्यांनी दोन्ही मातब्बर काकांच्या नाही नऊ आणत त्यांनी पालिकेची अर्धी सत्ता काबीज केली होती. त्यामुळे या खेपेलाही ते ताकद आणि नियोजनाने मैदानात आहेत. दरम्यान, आता मतदानाची घटका जवळ आली आहे. त्यामुळे मत पदरात पाडून घेण्यासह मतदारांत संभ्रम करुन समोरच्या उमेदवारांची मतविभागणी कशी करता येईल, या दृष्टीनेही प्रयत्न सुरु आहेत. एकूणच आता जय - पराजय कोण्याही उमेदवाराचा झाला तरी त्याचे क्रेडीट आणि अपयशाचे खापर मात्र निवडणुकीचे नेतृत्व करणाऱ्यांवरच असेल. त्यामुळे आता विजयसिंह पंडित, संदीप क्षीरसागर व डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यापैकी बाजीगर कोण ठरणार आणि यापैकी धक्का कोणाला बसणार याचा फैसलाही आता लवकरच होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com