Shivsena Vs NCP-SP : शरद पवारांना रत्नागिरीत उदय सामंतांचा दे धक्का! थेट प्रदेश उपाध्यक्षचं फोडला

Ratnagiri Politics : रत्नागिरीत पालकमंत्रिपदाची सुत्रे उदय सामंत यांनी हाती घेतल्यापासून एकनाथ शिंदे यांची शिवसेना जिल्ह्यात मोठी होत आहे. याआधी शिवसेना ठाकरे गटातून अनेक मात्तबरांना आपल्याबरोबर घेतल्यानंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे मोर्चा वळण्यात आला आहे.
Ratnagiri Politics Uday Samant And Sharad Pawar
Ratnagiri Politics Uday Samant And Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाची सुत्रे उदय सामंत यांनी हाती घेताच शिवसेना विस्ताराकडे विशेष लक्ष दिले आहे. त्यांनी जिल्ह्यातील अनेक मात्तबरांना आपल्याबरोबर घेतले आहे. यामुळे सध्या जिल्ह्यात ठाकरे गटाची अवस्था कोणी नेता देता का नेता अशी झाली आहे. अशातच आता उदय सामंत यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे वळवला आहे. त्यांच्या गळाला राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदारच लागल्याने आगामी स्थानिकसाठी मोठी रणनीती आखताना मार्ग सुकर होणार आहे.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार रमेश कदम हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत. याबाबत उदय सामंत यांनीच रविवारी (ता.11) संकेत दिले असून ते लोकमान्य टिळक वाचनालयाच्या रामभाऊ साठे वस्तूसंग्रालयाच्या उद्घाटनासाठी आले होते.

यावेळी उदय सामंत यांच्या हस्ते इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात रमेश कदम यांचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात कदम यांनी सामंत यांनी खुली ऑफर दिली. तर याच कार्यक्रमात सामंत यांनी माझे अगदी जवळचे स्नेही असा कमद यांचा उल्लेख केला. यामुळे सध्या जिल्ह्यात चर्चा सुरू झाल्या आहेत.

Ratnagiri Politics Uday Samant And Sharad Pawar
Uday Samant News : शिंदेच्या दरे गावातील मुक्कामाची तुलना थेट ठाकरेंच्या लंडनवारीशी; सामंत विरोधकांवर बरसले

आपल्या भाषणात सामंत यांनी कदम यांचे कौतुक करताना, कदम जिल्ह्यास्तरावरील मोठे नेते असून त्यांच्यासारखा दूरदृष्टी असणारा नगराध्यक्ष हवा. त्यांच्या शब्दाला मोठी किंमत होती. तेव्हा मी साधा कार्यकर्ता होतो. त्यामुळे त्यांचा राजकीय प्रवास मी जवळून पाहिल्याचेही सामंत यांनी म्हटलं आहे. कदम यांनी आतापर्यंत दुसऱ्याला मोठा करण्यात आपला आनंद शोधला असून त्यात आपणही असल्याचे सामंतस यांनी सांगितले आहे. तर आज जे पालकमंत्री पद मिळाले, त्यात कदम यांचा सिंहाचा वाटा होता. हे आपण कधीही विसरणार नसल्याचेही ते म्हणाले.

यावेळी सामंत यांनी प्रवासादरम्यान झालेल्या चर्चेचा उल्लेख केला. याच चर्चेवरून आता कदम शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सामंत यांनी प्रकाश देशपांडे त्यांच्या गाडीत असताना कदम यांना पुढील वाटचालीचे काय? असा सवाल केला होता. ज्यामुळे कदम थोडे बावचळले. यावेळी हा राजकीय प्रश्न नसून असे विचारल्याचं स्पष्टीकरण सामंत यांनी दिले.

ज्यावर महिनाभरात सांगू असं उत्तर कदम यांनी दिल्याचे कळत आहे. तर हाच धागा पकडत सामंत यांनी देखील महिनाभरात परिणाम दिसेल, असे जाहीर केल्याने आता कदम सेनेत जातील? असे संकेत मिळत आहेत. यामुळे शहरासह जिल्ह्यात आता पक्ष प्रवेशाच्या चर्चांना उत आला आहे.

कदमांचे हसतच उत्तर...

यानंतर कदमांची अनेकांनी भेट घेत सामंत यांच्या संकेतावर विचारणा केली. यावर त्यांनी हसतच तसे काही नाही रे... असे उत्तर देत वेळ मारून नेली. पण त्यांच्या वेळ मारून नेण्याच्या घटनेमुळेच आता तेही शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जातेय.

Ratnagiri Politics Uday Samant And Sharad Pawar
Uday Samant : सामंत भाजपच्या मुळावरच घाव घालणार होते, तयारीही झाली होती... इरादे लक्षात येताच जिल्हाध्यक्षांनी केला भांडाफोड!

कदम यांचा असा आहे राजकीय प्रवास

रमेश कदम हे सुरुवातीला काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर झालेल्या पक्षीय घडामोंडीनंतर ते शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीत आले. त्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. येथून शेकाप, भाजप व पुन्हा एकदा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेससोबत ते सध्या आहेत. सध्या ते पक्षाचे उपप्रदेशाध्यक्ष असून ते आता शिवसेनेच्या वाटेवर आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com