Thane Loksabha Constituancy : चोरलेली शिवसेना असूनही फोडलेली राष्ट्रवादी का लागते...केदार दिघे यांचा मोदींना सवाल

Udhav Thackeray प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी जाहीर सभेत ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करताना ही शिवसेना नकली असल्याचे म्हटले होते. याचे पडसाद आता शिवसैनिकांमधून उमटू लागले आहेत.
Kedar Dighe, Amit Shah, Narendra Modi
Kedar Dighe, Amit Shah, Narendra Modisarkarnama

Thane News : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा उल्लेख नकली शिवसेना केल्यानंतर आता शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख तथा दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

जेव्हा ओरिजनल शिवसेना भाजपसोबत होती. तेव्हा भाजपला पक्ष फोडावे आणि चोरावे लागत नव्हते. आता चोरलेली शिवसेना सोबत असतानाही तुम्हाला फोडलेली राष्ट्रवादी का लागते? असा सवालच केदार दिघे यांनी भाजपला ट्विटच्या (x) माध्यमातून केला आहे.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभा सुरू आहे. याचदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी जाहीर सभेत ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करताना ही शिवसेना नकली असल्याचे म्हटले होते. याचे पडसाद आता शिवसैनिकांमधून उमटू लागले असून, ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी भाजपच्या केंद्रातील नेत्यांचा चांगला समाचार घेतला आहे.

Kedar Dighe, Amit Shah, Narendra Modi
Thane Loksabha Constituancy : भाजपचा पुन्हा ठाणे लोकसभेवर दावा; केळकर म्हणाले, संधी दिल्यास लढणार...

याबाबत त्यांनी खरमरीत केले असून, जर ठाकरेंच्या शिवसेनेला मोदी आणि शाह नकली शिवसेना म्हणतात, तर मग आता चोरलेली शिवसेना सोबत असताना भाजपला फोडलेली राष्ट्रवादी का लागते जेव्हा ओरिजनल शिवसेना तुमच्या सोबत होती. तेव्हा तुम्हाला अशा फोडलेल्या पक्षांची गरज कधीच भासत नव्हती, यातच सर्व स्पष्ट होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ओरिजनल शिवसेना ठाकरेंची शिवसेना अशा आशयाचे ट्विट ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे Kedar Dighe यांनी सोशल मीडिया एक्सवर केले आहे. शिवसेना पक्ष फोडून गद्दारांना भाजपने सोबत घेतले आणि त्यांना शिवसेना नाव आणि चिन्ह दिले. मात्र, ओरिजनल शिवसैनिक हे मातोश्री सोबत एकनिष्ठ असल्याचे केदार दिघे यांनी म्हटले आहे. जे डुुप्लिकेट आणि चोरलेला माल होता तो आता भाजपच्या दावणीला बांधला गेला आहे, असाही हल्लाबोल केदार दिघे यांनी केला आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Kedar Dighe, Amit Shah, Narendra Modi
Thane Loksabha Election : प्रचाराचा धुरळा उडविण्यासाठी ठाण्यात नऊ हेलिपॅड; निवडणूक विभागाची परवानगी घ्यावी लागणार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com