Bjp Politcs: अजित पवारांना रोखण्यासाठी भाजपने उतरवले पाच मातब्बर मैदानात! सोपवल्या 'या' महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

Bjp Politcs: प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्थानिक स्वराज संस्था जिल्हा निवडणुक प्रमुख व जिल्हा निवडणुक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.
Devendra Fadnavis, Ajit Pawar
Devendra Fadnavis, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल आता वाजला आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जाहीर होताच आचारसंहिता लागू झाली आहे. आचार संहिता लागू झाल्यानंतर आता भाजपकडून राज्यामध्ये काही नियुक्ती करण्यात आल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्थानिक स्वराज संस्था जिल्हा निवडणुक प्रमुख व जिल्हा निवडणुक प्रभारी यांच्या नियुक्तिची घोषणा केली आहे. भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एक मोठी टीम मैदानात उतरवली असून जवळपास 109 नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडनुकीच्या निमित्ताने महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आले आहेत. यामध्ये आजी माजी आमदार वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांना मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

Devendra Fadnavis, Ajit Pawar
Top 10 News: नागपूर महापालिकेसाठी ठाकरेंच्या सेनेनं टाकला डाव ते सुरेश धस यांनी रान उठविलेल्या कृषि घोटाळ्याचा होणार पर्दाफाश

पुण्यात स्वबळावर लढणार

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पुण्यामध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं जवळपास निश्चित मानले जात आहे. अशा परिस्थितीत पुणे जिल्ह्यामध्ये भाजप समोर सर्वात मोठं आव्हान हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा राहणार आहे. पुणे हा राष्ट्रवादीचा गड राहिला आहे. त्यामुळे भाजपला पुणे जिल्ह्यामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी अजित पवारांच्या पक्षासोबत दोन हात करावे लागणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये पुणे महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी भाजपने माजी सभागृह नेते असलेल्या गणेश बिडकर यांच्यावर सोपवली आहे. महापालिकेची चांगली जाण आणि सभागृहामध्ये वरिष्ठ असल्याने बिडकर यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी बिडकर यांची पुणे महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.

Devendra Fadnavis, Ajit Pawar
Nagpur Election: नागपूर महापालिकेसाठी ठाकरेंच्या सेनेनं टाकला डाव! 'इतक्या' जागांवर केला दावा; काँग्रेस मान्यता देणार का?

बिडकर, लांडगे, कुल, मोहोळ यांच्यावर जबाबदारी

बिडकर यांच्यासोबतच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जबाबदारी आमदार शंकर जगताप यांच्याकडे सोपवण्यात आली असून पुणे उत्तर यामध्ये मावळचा भाग येतो त्या भागाची जबाबदारी आमदार महेश लांडगे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या भागाचे निवडणूक प्रमुख म्हणून लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच दक्षिण पुणे म्हणजे ज्यामध्ये पवारांची बारामती येथे त्या भागाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जाणारे आमदार राहुल कुल यांच्या वर सोपवण्यात आली आहे. तसेच या पूर्ण पुणे जिल्ह्याची जबाबदारी निवडणूक प्रभारी म्हणून खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर असणार आहे.

एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारच्या विरोधात हे पाच मोहरे उतरवले असल्याचे बोलले जात आहे. आगामी काळामध्ये या नेत्यांच्या माध्यमातूनच निवडणुकीचे रणनीती आपली जाणार आहे त्यामुळे या नियुक्त्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com