नीतेश राणे टायगर नसून भालू : सतीश सावंत यांची खरमरीत टीका

सुपारी देऊन हल्ला करणं आणि दहशत माजवणं एवढंच नीतेश राणेंकडे व्हिजन : सतीश सावंत
Nitesh Rane-Satish Sawant
Nitesh Rane-Satish SawantSarkarnama

सिंधुदुर्ग : आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांना दुसऱ्यांना डिवचण्यापलीकडे दुसरे काम नाही. पर्यटन मंत्री तथा युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणारे नीतेश राणे टायगर नसून ओरड मारणारे भालू आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी ‘टायगर इज बॅक’ असे बॅनर लावण्यापेक्षा ‘भालू इज बॅक’ असे बॅनर लावले पाहिजेत, अशा खरमरीत शब्दांत सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत (Satish Sawant) यांनी आमदार राणे यांच्यावर टीका केली आहे. (Satish Sawant's criticism on Nitesh Rane)

आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांची फैरी झडत आहेत. ठाकरे यांच्यावर नीतेश राणे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना सतीश सावंत बोलत होते. ते म्हणाले की, आदित्य ठाकरे हे कॅबिनेट मंत्री असून ते पर्यटनदृष्ट्या हे राज्य विकसीत करण्याचे व्हिजन घेऊन काम करत आहेत. त्याचं स्वागत कोकणातील जनतेने केलेले आहे. पर्यटनदृष्ट्या राज्य, कोकण विकसित होण्यासाठी आदित्य ठाकरे हे राज्यभर दौरा करीत आहेत. मात्र, नीतेश राणे यांच्याकडे एकच व्हिजन आहे, ते म्हणजे सुपारी देऊन हल्ला करणं आणि दहशत माजवणं. या पलीकडे नीतेश राणेंचं दुसर व्हिजन नाही, अशी जोरदार टीका सतीश सावंत यांनी राणे यांच्यावर केली.

Nitesh Rane-Satish Sawant
भरणेंकडून हर्षवर्धन पाटलांना धक्क्यावर धक्के : आक्रमक युवा नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश!

नीतेश राणे यांना संतोष परब हल्लाप्रकरणी न्यायालयाने कणकवली तालुक्यात प्रवेशासाठी घातलेली बंदी उठल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. मात्र, जनतेच्या हितासाठी झालेल्या डंपर आंदोलनात दोषमुक्त झाल्यानंतर स्वागत झाले नाही. यावरून लक्षात येते की, चुकीच्या पद्धतीने कार्यकर्त्यांकडून आपले स्वागत करून घेतले जात आहे. ही पद्धतच मुळात चुकीची आहे. हा पायंडा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणासाठी घातक असल्याची टीकाही सतीश सावंत यांनी केली.

Nitesh Rane-Satish Sawant
'...तर राज्यातील जनता ॲड. गुणरत्न सदावर्तेंना डोक्यावर घेऊन नाचेल'

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शासकीय निधीतून मंजूर झालेल्या कामांची भूमिपूजने केली आहेत. मात्र, केंद्रात भाजपचे सरकार असताना नीतेश राणे हे केंद्राकडून एक रुपयाचा निधी आणू शकलेले नाहीत. ते केवळ दुसऱ्यांवर टीका करत आहेत. देवगडबाबतचे नीतेश राणे यांचे व्हिजन काय ते जाहीर करावे. याउलट पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी किनारपट्टीच्या पर्यटन विकासासाठी नव्या योजना आणल्या आहेत. राणेंनी केवळ दुसऱ्यावर टीका करणे, ज्या पक्षात जातील त्या पक्षाच्या विरोधातील पक्षाच्या नेत्यावर बोलणे असे सोयीस्करपणे ते वागत आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी नीतेश राणे हे आपली भूमिका बदलत राहिले आहेत. त्यांना दुसऱ्यांवर बोलण्याचा अधिकार राहिलेला नाही, असा टोमणाही सावंतांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com