Kokan Politics : सावंतवाडीत 'संशयकल्लोळ' सुरु; बंडखोर कुणाची मते पळविणार? केसरकर, तेलींना टेन्शन

Sawantwadi Assembly Constituency election 2024 Deepak Kesarkar Vs Rajan Teli:अर्चना घारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तर विशाल परब यांनी भाजपकडून या मतदारसंघात केले आहे. चारही उमेदवारांमध्ये मत विभागणी होणार असल्याचे चित्र आहे.
 Deepak Kesarkar Vs Rajan Teli news
Deepak Kesarkar Vs Rajan Teli newsSarkarnama
Published on
Updated on

Sawantwadi News: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी व महायुतीमध्ये झालेल्या बंडखोरीचा फटका कुणाला बसणार, याबाबत मतदारसंघात चर्चा सुरु आहे. बंडखोरीमुळे कोणाची मते कोण पळवणार, याकडे सावंतवाडीकरांचे लक्ष लागले आहे. काही पदाधिकारी अंतर्गत बंडखोरांचे काम करत असल्याच्या छुप्या चर्चांमुळे अंतर्गत 'संशयकल्लोळ'सुरु आहे.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये (Sawantwadi Assembly Constituency election 2024) विद्यमान आमदार दीपक केसरकर आणि राजन तेली यांच्यात सामना होत आहे. मागच्या तीन टर्मचा विचार करता केसरकर व तेली या दोन चेहऱ्यांव्यतिरिक्त यावेळी विशाल परब आणि अर्चना घारे हे दोन नवीन चेहरे मैदानात उतरले आहे. (Deepak Kesarkar Vs Rajan Teli)

अर्चना घारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तर विशाल परब यांनी भाजपकडून या मतदारसंघात केले आहे.सावंतवाडी मतदारसंघाची सद्यस्थिती पाहता चारही उमेदवारांमध्ये मत विभागणी होणार असल्याचे चित्र आहे. महायुतीमध्ये भाजपची मते छुप्या पद्धतीने विशाल परब यांच्याकडे वळण्याच्या शक्यता नाकारता येत नाही.

 Deepak Kesarkar Vs Rajan Teli news
Amit Shah: उद्धवजी, 'या' महान व्यक्तींबाबत काँग्रेस नेत्यांना दोन शब्द बोलायला सांगा! शहांचे ठाकरेंना चॅलेंज

काही भाजपमधल्या पदाधिकाऱ्यांनी परब यांचे काम सुरु केले आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी परब यांच्या निलंबनाबरोबरच संबंधित पदाधिकाऱ्यांना अल्टीमेटम दिला आहे. केसरकर यांच्यावर असलेली भाजपातील लोकांची नाराजी यामागचे मूळ कारण आहे. ही नाराजी दूर करणे भाजपातील नेत्यांसमोर आव्हान आहे.

 Deepak Kesarkar Vs Rajan Teli news
Manoj Jarange Patil : निवडणुकीसाठी जरांगेंचा फायनल निर्णय जाहीर ; कुणाला निवडून आणायचे, कुणाला पाडायचे VIDEO पाहा

अर्चना घारे आणि विशाल परब यांनी आपल्या कामाच्या जोरावरच विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपामध्ये दोघांचीही पक्षाकडून निराशा झाली. पक्षाने निराश केले तरी स्वतः केलेल्या कामाच्या जोरावर या दोघांनी निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारी अर्ज भरून केसरकर आणि तेली यांच्यासमोर काहीसे आव्हान निर्माण केले आहे. परब वघारे या निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले आहेत. आता दोघांनी जोरदार प्रचारास सुरवात केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com