Amit Shah: उद्धवजी, 'या' महान व्यक्तींबाबत काँग्रेस नेत्यांना दोन शब्द बोलायला सांगा! शहांचे ठाकरेंना चॅलेंज

Maharashtra vidhansabha election 2024 Amit Shah on BJP Manifesto: तुम्ही आम्हाला पहिल्यांदा आम्हाला जनादेश दिला. नंतर २०१९मध्ये आम्हाला कौल दिला. पण काही लोकांनी सत्तेसाठी धोका दिला. पण ते जास्त काळ टिकू शकले नाही.
Amit Shah on BJP Manifesto
Amit Shah on BJP ManifestoSarkarnama
Published on
Updated on

महायुतीतील 'मोठा भाऊ'असलेल्या भाजपने विधानसभा निवडणुकीसाठीचा आपला जाहीरनामा भाजपचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज प्रसिद्ध करण्यात आला. अमित शाह यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

मी उद्धव ठाकरे यांना विचारतोय की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबच राहुल गांधी यांना दोन शब्द चांगले बोलायला सांगणार का, काँग्रेसच्या नेत्यांना बाळासाहेब ठाकरेंबद्दल दोन शब्द बोलायला सांगणार का? असं खुलं चॅलेंज अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.

महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत मतभेद आहेत. तुम्ही आम्हाला पहिल्यांदा आम्हाला जनादेश दिला. नंतर २०१९मध्ये आम्हाला कौल दिला. पण काही लोकांनी सत्तेसाठी धोका दिला. पण ते जास्त काळ टिकू शकले नाही. आम्ही मोदींच्या नेतृत्वात लढत आहोत.तुम्ही तिसऱ्यांदा आम्हाला कौल द्या, असे शाह म्हणाले.

Amit Shah on BJP Manifesto
Manoj Jarange Patil : निवडणुकीसाठी जरांगेंचा फायनल निर्णय जाहीर ; कुणाला निवडून आणायचे, कुणाला पाडायचे VIDEO पाहा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही अमित शाह यांनी जोरदार निशाणा साधला. "यावेळी महाराष्ट्राची जनता आमच्यासोबत आहे. मी शरद पवारांना विचारतो दहा वर्ष तुम्ही केंद्रात मंत्री होता. २००४ ते २०१४ पर्यंत महाराष्ट्राच्या विकासासाठी काय केले? तुमच्या सरकारमध्ये दहा वर्षात महाराष्ट्रावर किती अन्याय झाला ते सांगा," असा सवाल शहांनी उपस्थित केला.

शरद पवार ज्या पद्धतीने आश्वासन देतात, ज्या पद्धतीने मुद्दे उपस्थित करतात त्याचा वास्तवाशी किलोमीटरपर्यंतही संबंध नसतो. ते खोटे आरोप करून नरेटिव्ह तयार करतात. नकली जनादेश घेण्याचं काम करतात. यावेळी ते होणार नाही, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.

Amit Shah on BJP Manifesto
Maval Politics: बापू भेगडे- सुनील शेळके यांचे कार्यकर्ते भिडले; लोणावळ्यात राडा

शरद पवार ज्या पद्धतीने आश्वासन देतात, ज्या पद्धतीने मुद्दे उपस्थित करतात त्याचा वास्तवाशी किलोमीटरपर्यंतही संबंध नसतो. ते खोटे आरोप करून नरेटिव्ह तयार करतात. नकली जनादेश घेण्याचं काम करतात. यावेळी ते होणार नाही, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.

हे संकल्प पत्र राज्यातील सर्व लोकांचे आहे. जनतेच्या आशा-आकांशांचे प्रतिबिंब या संकल्पपत्रात आहे. मजबूत आणि सुरक्षित महाराष्ट्र कसा असेल याचा उल्लेख यात करण्यात आला आहे.

संकल्पपत्राचे प्रकाशन कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बावनकुळे, आशिष शेलार, सुधीर मुनंटीवार, रावसाहेब दानवे, विनोद तावडे आणि पीयूष गोयल उपस्थित होते. सरकार स्थापनेनंतर व्हीजन महाराष्ट्र @२०२९ हे १०० दिवसांच्या आत सादर करण्याचे वचन भाजपने दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com