Corruption Case : सावंतवाडी पालिका भ्रष्टाचार प्रकरणात नवा ट्विस्ट; मुख्याधिकारी दोषी? काँग्रेस नगरसेवकाचा आरोप, पुरावा असल्याचा दावा

Sawantwadi Municipal Water Supply Corruption Case : सावंतवाडी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील भ्रष्टाचार प्रकरणात जोडारी भारत लाखे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान त्याला जामीन देखील मिळाला असून या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.
sawantwadi municipal
sawantwadi municipalsarkarnama
Published on: 
Updated on: 

Sawantwadi Corruption Case News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कथित भ्रष्टाचार प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात भाजपचे नगरसेवक आणि पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. यामुळे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये या प्रकरणावरून राजकीय मतभेद असल्याची चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्याने तळकोकणातील राजकीय वातावरण तापले असतानाच काँग्रेसने थेट मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यावरच आरोप केले आहेत.

जोडारी भारत लाखे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तो खरा आरोप नसून या प्रकरणात मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यावरही जबाबदारी निश्चित करण्याची मागणी काँग्रेसचे नगरसेवक तौकीर शेख यांनी केली आहे. याबाबत आपल्याकडे कॉल रेकॉर्डिंगचा पुरावा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेज आणि त्यांचे कॉल डिटेल्स तपासण्याची मागणी शेख यांनी केली आहे. या मागणीमुळे सावंतवाडीच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

सावंतवाडी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कथित भ्रष्टाचार प्रकरणामुळे नगरसेवक प्रतीक बांदेकर यांनी आपल्या सभापतीपदाचा राजीनामा दोन दिवसांपूर्वी नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांच्याकडे सादर केला होता. तर या कथित भ्रष्टाचारावरून आपल्यावर चुकीचे आरोप होत असून आपल्या प्रतिमेला धक्का बसत असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, नगरसेवक म्हणून आपल्या प्रभागातील कामे सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

sawantwadi municipal
Corruption Case : भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर सव्वादोनशे कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राम खाडे न्यायालयात जाणार!

‘मुख्याधिकाऱ्यांचीही जबाबदारी तपासा’

दरम्यान पाणीपुरवठा विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नगरसेवक तौकीर शेख यांनी या प्रकरणात मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी केली. शेख यांच्या म्हणण्यानुसार, जोडारी भारत लाखे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असला, तरी या प्रकरणातील जबाबदारी केवळ त्याच्यापुरती मर्यादित ठेवता कामा नये. मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही तपासणी झाली पाहिजे.

या प्रकरणासंदर्भात आपल्याकडे काही कॉल रेकॉर्डिंगचा पुरावा असल्याचा दावाही शेख यांनी केला. संबंधित कॉल रेकॉर्डिंगच्या अनुषंगाने चौकशी करावी, तसेच मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्स तपासावेत, अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या या मागणीला आरोग्य सभापती सुधीर आडिवडेकर यांनीही पाठिंबा दिला. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांनी या प्रकरणावरून मुख्याधिकाऱ्यांना प्रश्न विचारले.

मुख्याधिकाऱ्यांनी आरोप फेटाळले

आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पाणीपुरवठा विभागातील कथित भ्रष्टाचारात आपला एक टक्काही सहभाग नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या प्रकरणात आपण कोणालाही फोन केलेला नसल्याचे सांगत, आपल्याविरोधात आरोप करणाऱ्या व्यक्तींनी योग्य व्यासपीठावर तक्रार दाखल करून पारदर्शक चौकशी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. कॉल रेकॉर्डिंगचा पुरावा असल्याचा दावा केला जात असेल, तर संबंधित व्यक्तीने तो जाहीर करावा, असेही औंधकर यांनी म्हटले आहे.

sawantwadi municipal
Corruption Case : अवघ्या 15 हजारांसाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी आपली 'खुर्ची'च लावली पणाला, ऑडिओ क्लिप व्हायरल; प्रशासनात उडाली खळबळ

दरम्यान या कथित भ्रष्टाचारावरून राजकीय वातावरण तापले असून शेख यांनी केलेला दावा आणि मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी दिलेले स्पष्टीकरण यामुळे या प्रकरणातील आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत. आता या प्रकरणात पुढे काय होणार याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com