Konkan News : राष्ट्रवादीला टक्कर देण्यासाठी ठाकरे-शिंदे गटाचा हातात हात

काही महिन्यापूर्वी शिवसेनेत कार्यरत असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्वास सुर्वे राष्ट्रवादीत दाखल झाल्याने येथील निवडणूक दोन्ही गटासाठी आव्हानात्मक बनली आहे.
Shivsena-Shinde Group-Ncp
Shivsena-Shinde Group-NcpSarkarnama

चिपळूण : शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि शिंदे गट (Eknath Shinde बाळासाहेबांची शिवसेना) असे दोन गट कार्यरत झाले. चिपळूण (Chiplun) तालुक्यातील पेढे येथील शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी शिंदे गटाची कास धरली. मात्र, पेढे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हेच ठाकरे व शिंदे गट एकत्र आले आहेत. हे दोन्ही गट एकत्र आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) व शिवसेनेत कॉँटे की टक्कर होत आहे. (Shinde and Thackeray group together in Chiplun against NCP)

पेढे ग्रामपंचायतीवर नेहमीच शिवसेनेचे एकहाती वर्चस्व आहे. मात्र गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत येथील शिवसेनेचा वरचष्मा कमी होत चालला आहे. त्यातच काही महिन्यापूर्वी शिवसेनेत कार्यरत असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्वास सुर्वे राष्ट्रवादीत दाखल झाल्याने येथील निवडणूक दोन्ही गटासाठी आव्हानात्मक बनली आहे.

Shivsena-Shinde Group-Ncp
मोठी बातमी : शिवसेनेला भाजपचा पाठिंबा; शिंदे गटाच्या सामंतांविरोधात एकत्र!

सरपंचपदासाठी शिवसेनेच्या मानसी भोसले व राष्ट्रवादीच्या आरूषी शिंदे यांच्यात सरपंचपदासाठी लढत होत आहे. येथे ११ पैकी ३ जागा बिनविरोध झाल्या असून सदस्यांच्या ८ जागांसाठी १६ उमेदवार रिंगणात आहे. येथे निवडणुकीच्या प्रचारात दिवसागणिक रंगत येत आहे. वाडीनिहाय बैठका घेऊन एकहाती मतदान व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मतदारांच्या वैयक्तीक गाठीभेटीसह सोशल मीडियावरूनही प्रचाराची रणधुमाळी उठवली जात आहे.

Shivsena-Shinde Group-Ncp
Shinde Group-Bjp : भाजपच्या डावपेचामुळे मुख्यमंत्री ‘बॅकफूट’वर : अधिवेशनाच्या तोंडावर शिंदेंची कोंडी

काही गावात शिवसेनेतील शिंदे आणि ठाकरे गट निवडणुकीत भिडले असताना पेढे येथे मात्र दोन्ही गटांनी ग्रामपंचायतीसाठी संयुक्त लढण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत मोठी चुरस आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या विश्वास सुर्वेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. शिवसेनेच्या गावातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोणत्याही स्थितीत पुन्हा ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवण्याचा चंग बांधला आहे. या चुरशीच्या लढतीत कोण सरस ठरणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Shivsena-Shinde Group-Ncp
Ajit Pawar : अजितदादांनी शरद पवारांसमोरच घेतली राष्ट्रवादीच्या नेत्याची हजेरी; म्हणाले, ‘कुणाची बिनपाण्यानं करायची असं..’

शिवसेनेतील सरपंचपदाच्या उमेदवार मानसी भोसले या महिला चळवळीतील कार्यकर्त्या. बचत गटाच्या माध्यमातून गेल्या १५ ते १७ वर्षांच्या कालावधीत सक्रीय सहभाग ठेवला आहे. कोरोना कालावधीतही त्यांनी सामाजिकतेचे योगदान दिले आहे. तसेच आरूषी शिंदे यांनाही ग्रामपंचायत कामकाजाचा अनुभव असून त्यांच्याकडे संघटन कौशल्य आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com