Yogesh Kadam : युतीच्या चर्चेत शिंदेंच्या शिलेदाराचा राज ठाकरेंना मोलाचा सल्ला, 'उद्या हे तुमचेच...'

Raj Thackeray-Uddhav Thackeray Yuti : मनसे आणि शिवसेना (शिंदे) यांच्यात युती होण्याचे चित्र निर्माण झाले असतानाच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या टाळीने राजकीय रंगत वाढली आहे.
Yogesh Kadam, Raj Thackeray-Uddhav Thackeray Yuti
Yogesh Kadam, Raj Thackeray-Uddhav Thackeray Yutisarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : राज्याच्या राजकारणात सध्या नव्या युतीच्या दिशेने पावले पडताना दिसत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे सेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांचा जोरद धरला आहे. आता मुंबईतही ते एकत्र यावेत यासाठी बॅनर लावून उद्धव ठाकरे यांनाच साद घातली जातेय. अशातच शिंदेंच्या शिंवसेनेतील नेत्यांकडून यावर तिखट आणि बोचरी टीका केली जातेय. आताही शिवसेना नेते तथा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी युतीच्या चर्चेवर जोरदार टीका करताना राज ठाकरेंना सल्ला दिला आहे. सध्या त्यांच्या या सल्ल्याचीच चर्चा सुरू झाली आहे.

राज ठाकरे यांनी महाराष्ट्र धर्मासाठी आपण सर्व गोष्टी विसरायला तयार असून उद्धव ठाकरे तयार असतील तर एकत्र यायला तयार असल्याचे म्हटलं होतं. तर उद्धव ठाकरे यांनी देखील राजकीय युतीच्या दिशेने आणखी एक मोठं पाऊल टाकतानाही आपलीही कोणतीच हरकत नसल्याचे म्हटलं होतं. तर मनसेतून होणाऱ्या टीकेवर राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांना युतीवर माध्यमांशी 29 एप्रिलपर्यंत कोणताच संवाद नको अशा सूचना केल्या आहेत. यामुळे आता मनसे-शिवसेनेत युती होणारच अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान मंत्री योगेश कदम यांनी यावर भाष्य करताना, शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षप्रमुखांची नीती ही वापरा आणि फेकून द्या अशी आहे. आपण मनापासून महाराष्ट्रासाठी हात पुढे कराल, पण भविष्यात तुमचेच पाय हे उबाठावाले खेचतील. त्यामुळे जरा जपूनच! असा सल्ला त्यांनी दिला आहे.

Yogesh Kadam, Raj Thackeray-Uddhav Thackeray Yuti
Vaibhav Naik-Yogesh Kadam : बीड पॅटर्नने सिंधुदुर्ग हादरला, बिडवलकर हत्याप्रकरणावर वैभव नाईकांचा गंभीर आरोप; कदमांचंही प्रत्युत्तर

यावेळी कदम यांनी उद्धव ठाकरेंवर देखील हल्लाबोल करताना, स्वत:चा स्वार्थ साधून झाल्यावर आता उद्धव ठाकरे यांना रक्ताची नाती आठवत आहेत. पण याधी तीच रक्ताची नाती त्यांना नकोशी होती. याचा अनुभव राज ठाकरे यांनी देखील याआधीच घेतला आहे.

Yogesh Kadam, Raj Thackeray-Uddhav Thackeray Yuti
Yogesh Kadam mobile missing : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना 'बीड'चा झटका; मोबाईल 'मिसिंग' की?

याआधी ठाकरेंनी शिवसेनेच्या पहिल्या फळीतील दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नारायण राणे, दिवाकर रावते, लीलाधर डाके, रामदास कदम यांच्याबरोबर काय केलं हे अख्या राज्याने पाहिलं आहे. तर ठाकरेंची गत ही 'गरज सरो, वैद्य मरो' याप्रमाणे आहे. त्यांनी आपली गरज संपल्यावर या नेत्यांना डावलं गेल्याचे वेगळं सांगायला नको. त्यामुळे राज ठाकरेंनी कोणताही विचार करण्याआधी जरा..., अशी भावना व्यक्त केलीय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com