Vaibhav Naik-Yogesh Kadam : बीड पॅटर्नने सिंधुदुर्ग हादरला, बिडवलकर हत्याप्रकरणावर वैभव नाईकांचा गंभीर आरोप; कदमांचंही प्रत्युत्तर

Sindhudurg Crime News : कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर अपहरण व खून प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापलं आहे. यावरून कोकणात दोन्ही शिवसेना आमने-सामने आल्या आहेत.
Yogesh Kadam-Vaibhav Naik On Sindhudurg Crime
Yogesh Kadam-Vaibhav Naik On Sindhudurg Crimesarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावातील नाईकनगर येथील सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकरच्या हत्येनं राज्यात एकच खळबळ उडवून दिली आहे. सिंधुदुर्गातही बीड पॅटर्न आल्याचा दावा आता करण्यात आला असून बिडवलकरची दोन वर्षापूर्वी अपहरण करून त्याला जबर मारहाण करण्यात आली होती. यातच त्याचा मृत्यू झाल्याचे आता उघडकीस आले आहे. यावरून ठाकरे शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आमने-सामने आली आहे. माजी आमदार वैभव नाईक यांनी यावरून गंभीर आरोप केले आहेत. तर या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले आहे.

सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर याची दोन वर्षापूर्वी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. बिडवलकर याची कुडाळमध्ये लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण हत्या करण्यात आली होती. यानंतर त्याचा मृतदेह सातार्डा-सावंतवाडी येथील स्मशानभूमीत जाळून त्याची विल्हेवाट लावण्यात आल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. यावरून आता ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी हल्लाबोल करताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

वैभव नाईक यांनी बिडवलकरची फक्त 22 हजार रूपयांच्या व्यवहारातून हत्या करण्यात आल्याचा, आरोप केला आहे. याबाबत त्यांनी, एक्सवर एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी या प्रकरणातील संबंधित तरुणाचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ वैभव नाईक यांनी फेसबुक पेजवरून शेअर केला आहे. हत्या करणारा आरोपी हा शिंदे गटाचा पदाधिकारी असून त्याला स्थानिक आमदार वाचवत आहेत. तसा ते प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तर आरोपीचा शिंदे गटातील तो आका कोण? असा सवाल करताना पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी केलीय.

Yogesh Kadam-Vaibhav Naik On Sindhudurg Crime
Vaibhav Naik : 'ठाकरेंनी कोकणाला काय दिलं?', वैभव नाईकांनी कोंबड्या परिचीत नेता म्हणत, राणेंना आव्हानचं दिलं

जिल्ह्यातील निवती पोलिस ठाण्यात याबाबत 9 एप्रिल 2025 रोजी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्यात बिडवलकर याचं दोन वर्षांपूर्वी अपहरण करून हत्या करण्यात आल्याची तक्रार देण्यात आली आहे. यानंतर कुडाळमधून चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी न्यायालयाने आरोपींना पोलिस कोठडी सुनावली असून सध्या ते पोलिस कस्टडीत असल्याचेही नाईक यांनी म्हटलं आहे.

तसेच बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था भयानक झाली असून फक्त 22 हजारांसाठी सिद्धीविनायक उर्फ बिडवलकरची हत्या करण्यात आलीय. त्याला नग्न करून अमानुष मारहाण करण्यात आली. या मागे असणाऱ्या सिद्धेश शिरसाटचा आका कोण? असाही सवाल नाईक यांनी उपस्थित केला आहे.

Yogesh Kadam-Vaibhav Naik On Sindhudurg Crime
Vaibhav Naik : वनमंत्र्यांच्या आदेशावर वैभव नाईक बरसले? म्हणाले, 'तो आदेश म्हणजे थट्टाच, विधानसभेत प्रश्न मांडण्यासाठी...'

कोकणाला बदनाम करू नका

यावरून कोकणातील राजकीय वातावरण तापलं असून योगेश कदम यांनी पलटवार केला आहे. योगेश कदम यांनी, वैभव नाईक यांना उद्देशून, ते आता विरोधी पक्षात असून पराभूत उमेदवार आहेत. यामुळे चर्चेमध्ये राहण्याकरता ते अशी वक्तव्य करत आहेत. पण संपूर्ण महाराष्ट्र काय तर देशामध्ये देखील सर्वात शांत विभाग हा कोकण आहे. त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका. वस्तुस्थिती जी आहे त्यावर त्यांनी बोलावं, असं आवाहन देखील कदम यांनी वैभव नाईक यांना केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com