शिवसेना आमदार वैभव नाईकांचे टेन्शन वाढले : भाजपची वाढलेली ताकद ठरणार त्रासदायक

कुडाळ तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींचा निकाल पाहता शिवसेनेला पंचायत समिती, जिल्हा परिषदसह इतर होणाऱ्या सर्वच निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी करावी लागणार आहे.
Vaibhav Naik
Vaibhav NaikSarkarnama
Published on
Updated on

कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) : कुडाळ (Kudal) तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ५४ ग्रामपंचायतींचा निकाल पाहता शिवसेनेला (shivsena उद्धव बाळासाहेब ठाकरे) पंचायत समिती, जिल्हा परिषदसह इतर होणाऱ्या सर्वच निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी करावी लागणार आहे. नुकत्याच्या झालेल्या निवडणुकीत महत्त्वाच्या ग्रामपंचायती शिवसेनेच्या हातून निसटल्या आहेत. कुडाळ हा पूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला होता, त्याला सुरुंग लावण्याचे काम भाजपने (BJP) हाती घेतले आहे, हे ग्रामपंचायत निवडणुकीतून दिसून येते. दुसरीकडे शिवसेनेसोबत असलेल्या काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीची (NCP) तालुक्यात पुरती वाट लागल्याचे चित्र आहे. (Shiv Sena MLA Vaibhav Naik's tension increased: BJP's increased strength will be troublesome)

कुडाळ तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींपैकी मुळदे व आंबडपाल या दोन ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या. कडावल, मांडकुली, रांगणा तुळसुली, आंबडपाल या ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध झाल्याने ४८ सरपंचपद व ३६४ सदस्यांसाठी निवडणुका झाल्या. या निकालानंतर तालुक्यात भाजपने सर्वाधिक २८ ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकावला. भाजपला ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये प्रथमच मोठे यश मिळाले. यामागे केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार नीलेश राणे यांचे भक्कम संघटनात्मक नेटवर्क असल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे आमदारकीच्या दुसऱ्या टर्ममध्ये असलेले ठाकरे गटाचे वैभव नाईक यांनी सध्याच्या राजकीय स्थित्यंतरात आपली ताकद कायम ठेवल्याचे दिसून येत असले तरी भविष्यात त्यांना संघटनात्मक ताकद अधिक वाढविणे क्रमप्राप्त असल्याचे चित्र आहे.

Vaibhav Naik
मी ना राष्ट्रवादीचा ना शिवसेनेचा; मी सरपंच ‘गावविकास’चा!

वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद हा शिवसेनेचा मतदारसंघ होता. या ठिकाणी आताच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने ८ पैकी रांगणा तुळसुली, निरुखे व नारूर क. नारूर या तीन ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला. शिवसेनेने निवजे, हिर्लोक, वेताळ बांबर्डे या तीन ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या. तर आवळेगाव व कडावल या दोन ग्रामपंचायती गावविकास पॅनलकडे आहेत. एकूणच शिवसेनेच्या बालेकिल्यात भाजपची ताकद वाढल्याचे दिसून येते. राजकीय स्थित्यंतरात शिवसेनेचे नेटवर्क काहीसे कमी झाल्याचे बोलले जात आहे.

Vaibhav Naik
अजितदादांच्या निकटवर्तीय नेत्याने घेतली भाजपच्या विखे पाटलांची भेट

पावशी जिल्हा परिषद मतदार संघात आंबडपाल ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने सात ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यामध्ये अणाव, डिगस, पावशी व बांव या चार ग्रामपंचायतींवर शिवसेनेने आपला झेंडा फडकावला. तर बांबुळी व सोनवडे तर्फ हवेली या ग्रामपंचायतींवर भाजपने झेंडा फडकावित या मतदारसंघात चंचूप्रवेश केला. तर पणदूर व आंबडपाल या दोन ग्रामपंचायतींवर गावविकास पॅनलची सत्ता आली आहे.

Vaibhav Naik
Satyajeet Tambe News: ‘आमदार होणारच; पण मामांच्या मतदारसंघातून नाही...’

आंब्रडमध्ये भाजपचे वर्चस्व

आंब्रड जिल्हा परिषद मतदार संघात ६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यामध्ये सोनवडे तर्फ कळसुली, घोडगे, भरणी, जांभवडे या ग्रामपंचायतींवर भाजपाने झेंडा फडकावला. आंब्रड ग्रामपंचायतीवर गाव पॅनेल, तर कुंदे ग्रामपंचायतीवर शिवसेनेने गड राखला. या जिल्हा परिषदेत भाजपने आपला दबदबा कायम ठेवल्याचे दिसून आले. घावनळे जिल्हा परिषद मतदार संघात ६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यामध्ये कालेली, घावनळे, पुळास या तीन ग्रामपंचायतींवर शिवसेनेने झेंडा फडकावला, तर शिवसेनेच्या ताब्यातील केरवडे कर्याद नारूर, नेरूर कर्याद नारूर व शिवापूर या तीन ग्रामपंचायती भाजपने आपल्या ताब्यात घेऊन शिवसेनेला धक्का दिला. एकूणच या मतदार संघात प्रस्थापितांना मतदारांनी दूर केल्याचे दिसून आले.

Vaibhav Naik
Devendra Fadnavis News: फडणवीस नागपूरऐवजी तातडीने दिल्लीसाठी रवाना : राज्यात चर्चेला उधाण

प्रस्तापितांना धक्के

कुडाळ तालुक्यात ५४ ग्रामपंचायतींमधील महत्त्वाच्या माणगाव, पिंगुळी, घावनळे, ओरोस या नेरूरमध्ये मतदारांनी प्रस्थापितांना धक्के देत त्यांची सत्ता संस्थाने खालसा केली. त्यामुळे या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींमध्ये नवीन चेहर्‍यांना संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे राज्यातील सत्तातरानंतर स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी प्रतिकुल परिस्थितीत कुडाळ तालुक्यात आपल्या पक्षाची ताकद राखण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नांना मतदारांनी अपेक्षित साथ दिल्याचे दिसून येते. दुसरीकडे सत्तेतील पक्ष, शिंदे गटाची साथ व राणेंचे भक्कम नेटवर्क असल्यामुळे कुडाळ तालुक्यात भाजपने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकावला. तर शिवसेनेची साथ असूनही राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षांची वाताहात झाल्याचे या निवडणुकीत प्रकर्षाने दिसून आले.

Vaibhav Naik
Disha Salian Case : आदित्य ठाकरेंनी प्रथमच सांगितले ‘त्या’ हॉस्पिटलमध्ये उपस्थित असण्याचे कारण....

पिंगुळीत भाजपचे कमबॅक

पिंगुळी जिल्हा परिषद मतदार संघात ६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यामध्ये पिंगुळी, मुळदे, मांडकुली, तुळसुली तर्फ माणगाव येथे शिवसेनेची सत्ता आली. तर पिंगुळी ही महत्त्वाची व मोठी शिवसेनेकडील ग्रामपंचायत भाजपने हिसकावून घेत सेनेला धक्का दिला. साळगाव ग्रामपंचायतीवर सुध्दा भाजपने आपली सत्ता कायम राखली. केरवडे तर्फ माणगाव ग्रामपंचायतीवर भाजप-मनसे युतीने दावा केला आहे. या मतदार संघात प्रस्थापितांना मतदारांनी धक्के दिल्याचे दिसुन आले.

Vaibhav Naik
जयंत पाटलांच्या निलंबनाबाबत शरद पवारांचा अजितदादांना फोन

प्रस्थापितांना माणगावात धक्के

माणगाव जिल्हा परिषद मतदार संघामध्ये ५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यामध्ये भाजपने तेर्सेबांबर्डे, हुमरस व नानेली या तीन ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकावला. शिवसेनेच्या ताब्यातील हुमरस ग्रामपंचायत भाजपने आपल्याकडे घेतली, तर भाजपच्या ताब्यातील माणगाव ही महत्त्वाची मोठी ग्रामपंचायत शिवसेनेने आपल्याकडे घेतली. झाराप ग्रामपंचायतीवर शिवसेनेने झेंडा कायम राखला. माणगावमध्ये मतदारांनी प्रस्थापितांना धक्के देत नवोदितांना संधी दिली असल्याचे दिसून आले.

गावराईत भाजपला धक्का

जिल्हा मुख्यालय असलेल्या ओरोस जिल्हा परिषद मतदार संघ हा भाजपचा अभेद्य गड म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये ओरोस व रानबांबुळी या दोन ग्रामपंचायतींवर भाजपने झेंडा फडकाला. कसाल ही महत्त्वाची ग्रामपंचायत अपक्षांकडे गेली आहे. तर गावराई ही एकमेव ग्रामपंचायत भाजपकडून सेनेकडे आली आहे.

तेंडोलीत शिवसेना बॅकफुटवर

तेंडोली जिल्हा परिषद मतदार संघात ५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यामध्ये पाट-परबवाडा व आंदुर्ले या दोन ग्रामपंचायतींवर भाजपने झेंडा फडकावला. वाडीवरवडे व बिबवणे येथे गाव विकास पॅनेलची सत्ता आली, तर तेंडोली ग्रामपंचायतीवर शिवसेना पुरस्कृत महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. या ठिकाणी शिवसेना बॅकफुटवर गेल्याचे दिसून येते.

आमदार नाईकांची एकाकी झुंज

या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार वैभव नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकाकी झुंज देत ५४ ग्रामपंचायतींमध्ये २१ ग्रामपंचायती आपल्या ताब्यात आणल्या. इतर वरिष्ठ नेते या निवडणुकीत प्रचाराच्या किंवा बैठका घेण्याच्या दृष्टीने कुठे दिसले नाहीत. असाच दुर्लक्ष होत राहिल्यास भविष्यातील निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने खूपच मेहनत घ्यावी लागणार आहे.

नेरूरमध्ये भाजपचे वर्चस्व

नेरूर जिल्हा परिषद मतदार संघात ४ पैकी कवठी, चेंदवण व सरंबळ या ३ ग्रामपंचायतींवर भाजपने आपला झेंडा फडकावला, तर नेरूर-देऊळवाडा या एकमेव ग्रामपंचायतीवर शिवसेनेने झेंडा कायम राखला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com