Sanjay Kadam-Suryakant Dalvi
Sanjay Kadam-Suryakant Dalvi Sarkarnama

सूत्रे हाती येताच माजी आमदार सूर्यकांत दळवींनी केली मोठी घोषणा

दापोलीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी : या निवडणुकीत शिवसेना ८, तर राष्ट्रवादी ९ जागा लढणार आहेत.

दाभोळ : दापोली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना (shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) आघाडीची घोषणा शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी व राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये गुरुवारी (ता. ९ डिसेंबर) करण्यात आली. (Shiv Sena-NCP alliance in Dapoli: Former MLA Suryakant Dalvi announcement)

या वेळी आघाडीतर्फे समन्वय साधून उमेदवारांचा प्रचार करण्यात येईल, असेही सांगण्यात आले. ही आघाडी वरिष्ठ पातळीवरून जाहीर झाली असल्याने दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात सामील होणार आहेत. या निवडणुकीसाठी शिवसेना ८, तर राष्ट्रवादी ९ जागा दापोलीमध्ये लढणार आहेत. मंडणगडमध्ये आघाडी झाली आहे. या ठिकाणी पाच जागा राष्ट्रवादी, ४ जागा शिवसेना व दोन जागा अपक्ष लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

Sanjay Kadam-Suryakant Dalvi
महाडिकांकडून भरमू पाटलांना निरोप गेल्यास राष्ट्रवादीचे आमदार पाटील होणार बिनविरोध

शिवसेनेच्या वतीने अरिफ मेमन, ममता मोरे, प्रियांका अमृते, शिवानी खानविलकर, सुचिता रेळेकर, रवींद्र क्षीरसागर, अजीम चिपळूणकर, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परवीन शेख, खालीद रखांगे, मेहबूब लांजेकर, विलास शिगवण यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. महाआघाडीला कोणाचाही विरोध नसल्याने सर्व उमेदवार विजयी होतील, असा आशावाद या वेळी व्यक्त करण्यात आला.

Sanjay Kadam-Suryakant Dalvi
खोपोलीत भारतीय जनता पक्षाला धक्का!

वरिष्ठ पातळीवर ठरल्याप्रमाणे दापोली आणि मंडणगड येथे दोन्ही पक्षाच्या वतीने एबी फॉर्म वाटप केले असून त्यानुसार दोन्ही पक्षाच्या विचाराने निवडणुकीला सामोरे जाऊ. आगामी काळात अडीच, अडीच वर्ष नगराध्यक्षपद घेतले जाईल, असे सांगण्यात आले.

आमदार कदमांनी आघाडीत सामील व्हावे

व्यक्तीपेक्षा पक्षसंघटना श्रेष्ठ आहे. त्यामुळे आमदार योगेश कदम यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह या प्रवाहात सामील व्हावे. या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. त्यांना देखील अर्ज मागे घेण्याबाबत विनंती केली जाईल, असे माजी आमदार दळवी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com