

Naresh Mhaske son wedding : एकनाथ शिंदे शिवसेनेचे ठाणे लोकसभेचे खासदार तथा प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा मुलगा आशुतोष यांच्या विवाह सोहळ्याला कट्टर प्रतिस्पर्धी राजकीय विरोधक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी हजेरी लावली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा खासदार राऊत यांची ही हजेरी लक्षणीय आणि चर्चेचा विषय ठरली. याचवेळी एकनाथ शिंदे शिवसेनेने संजय राऊत यांना ठाण्यात पाय ठेवू देणार नाही, अशी टेंभी नाक्यावर केलेली वल्गना चर्चेत आली.
शिवसेनेत बंडाळी केल्यानंतर दोन्ही बाजूने एकमेकांवर टीकेची संधी सोडली जात नाही. खासदार संजय राऊत यांच्या टीकेच्या धारे वाढतीच आहे. पण खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाचा ठाणे (Thane) इथं रंगलेल्या लग्न सोहळ्याच्या शुभप्रसंगी, दोन्ही शिवसेनेने आपल्या शत्रुत्व बाजुला ठेवत, दोन्हीकडील नेत्यांनी एकमेकांची भेट घेत, दिलेल्या शुभेच्छा चर्चेचा विषय ठरली.
खासदार नरेश म्हस्के यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेची प्रवक्तेपदाची जबाबदारी संभाळताना, नेहमीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षावर तोफ डागत असतात. यातून खासदार म्हस्के अनेकदा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीकेची बाण सोडत असतात. यातच खासदार म्हस्के यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यामध्ये खासदार राऊत यांची एन्ट्री होताच, सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
एकनाथ शिंदे शिवसेना आणि शिवसेना ठाकरे सेना पक्ष, यांच्या राजकीय लढाईत, सर्वाधिक लक्ष्य होतात, ते खासदार संजय राऊत! यातूनच, राऊतांविरोधात एकनाथ शिंदे शिवसेनेने आंदोलन करताना, ठाण्यात पाऊल ठेवू दिले जाणार नाही, असा टेंभी नाक्यावरून वल्गना केली होती.
खासदार म्हस्के यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला खासदार राऊत यांनी ठाणे इथं हजेरी लावल्यानंतर टेंभी नाक्यावरील ही वल्गना पु्न्हा चर्चेत आली. विशेष म्हणजे, या विवाह सोहळ्यात खासदार राऊतांची शिंदे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जोरदार स्वागत केलं. ठाणे विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार यांनी राऊत यांना स्वागत समारंभाच्या व्यासपीठावर आणले.
या दोघा नेत्यांमध्ये आस्थेनं चर्चा करत-करत, गर्दीतून वाट काढत, हेमंत पवार यांनी खासदार राऊत यांना व्यासपीठावर नेले. राजकीय मतभेद कितीही असले तरी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी असून राऊत यांनी अगदी मोकळेपणाने आमच्याशी संवाद साधला, असे हेमंत पवार यांनी राऊत विवाह स्थळावरून पुढे गेल्यानंतर आवर्जून सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.