शिवसेनेचे पालकमंत्री आपल्या जिल्हाध्यक्षांनाही विचारत नाहीत : काँग्रेस कार्यकर्त्यांचे गाऱ्हाणे

काँग्रेस संपलेली नाही; संपणारही नाही.
SatejPatil
SatejPatilSarkarnama

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : काँग्रेस संपलेली नाही; संपणारही नाही. काँग्रेसला प्राधान्य देऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्याला दोन किंवा तीन क्रमांकाचे पद मिळते. पक्ष पायरी आहे. या पायरीचा पाया डळमळीत असल्यास इमारत उभी राहणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने जोमाने कामाला लागले पाहिजे. २०२४ मध्ये जिल्ह्यात किमान एक आमदार निवडून येईल, असे एकच लक्ष्य ठेवून सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन गृह राज्यमंत्री व काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्कमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे केले. त्यांनी बैठकीत पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. (Shiv Sena's Guardian Minister does not respect us : Complaint of Congress workers)

शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली. जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे, जिल्हा प्रभारी घोरपडे, विकास सावंत, साईनाथ चव्हाण, इरशाद शेख, नीता राणे, विद्याप्रसाद बांदेकर, अरविंद मोंडकर, बाळू अंधारी, दादा परब यांच्यासह राज्य, जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, की पक्षात व्यक्ती म्हणून विचार न करता पक्ष म्हणून विचार करा. भविष्यात नगरपरिषदा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या स्वबळावर किंवा आघाडी करून लढायच्या, याचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्या. पक्षातील कोणाचेही काम असेल तर कोल्हापूर किंवा मुंबई येथील निवासस्थानी या. तुमची जास्तीत जास्त कामे करण्याचा प्रयत्न करेन. तुमच्या सोबत अन्य मंत्र्यांच्या केबिनमध्ये येईन; परंतु याची नोंद माझ्याजवळ असणार आहे. ज्याचे काम करणार त्याचे पक्षासाठी किती योगदान आहे, हे मी पाहणार. योगदान दिसले नाहीतर पुढचे काम उशिराने होईल. मी दहा पावले तुमच्यासाठी चाललो, तर तुम्ही पक्षासाठी १०० पावले चाला.

SatejPatil
पवारांना कडवी टक्कर देणाऱ्या सतीश काकडेंचा यंदा पॅनेल नाही

जिल्हा बँकेसाठी उमेदवारी देताना व्होट बँकेचा निकष लावणार

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक आघाडी करून लढविण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. त्यामुळे निवडणूक काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार नाही; परंतु जागावाटपात जास्तीत जास्त जागा पक्षाच्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न संपर्कमंत्री म्हणून माझा असणार आहे. मात्र, यासाठी उमेदवार निवडताना कोणाजवळ व्होट बँक आहे, हा निकष लावला जाईल. ज्याच्याजवळ व्होट बँक व निवडून येण्याची क्षमता आहे, त्यांनाच उमेदवारी दिली जाणार आहे. त्यात काही नवीन चेहरेही दिले जातील. या वेळी मी नाही म्हणून आघाडीच्या उमेदवाराला मतदान नाही, असे करू नका, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले.

आम्हाला विश्वासात घेतले जात नाही

महाविकास आघाडी समन्वयक दादा परब यांनी राज्यस्तरावर महाविकास आघाडीचा धर्म पाळला जातो; परंतु सिंधुदुर्गात पाळला जात नाही. समन्वय समितीची बैठक घेतली जात नाही. विश्वासातच घेतले जात नाही. जिल्हाध्यक्षांना विचारले जात नाही. पालकमंत्री आम्हाला आघाडी म्हणून मानसन्मान देत नाहीत. त्यामुळे संपर्कमंत्री म्हणून पालकमंत्री यांच्याबरोबर आमची एकत्रित बैठक घ्यावी, अशी मागणी केली.

SatejPatil
संजय जगतापांना साध्या साध्या गोष्टींसाठीसुद्धा इतरांचे उंबरे झिजवावे लागतायेत

पुढच्या वेळी तुम्हाला बदल दिसेल

जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे यांनी, सिंधुदुर्गातील काँग्रेस पुन्हा बाळसे धरू लागली आहे. काँग्रेसचेच कार्यकर्ते असताना ते पहिले बाहेर पडत नव्हते. आता ते बिनधास्त बाहेर येत आहेत. पुढच्या वेळी तुम्ही याल, त्या वेळी मोठा बदल झालेला दिसेल. यासाठी तुमच्या सहकार्याची गरज आहे. दोन महिन्यांनी किमान एकवेळ जिल्ह्यात या, अशी विनंती संपर्कमंत्री पाटील यांना केली. या वेळी इरशाद शेख यांनी पदाधिकारी-कार्यकर्ते पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत; परंतु लोकांना सामोरे जाताना आम्ही त्यांचे काम करू शकत नाही. कोणाला निधी देऊ शकत नाही, अशी खंत व्यक्त केली.

पालकमंत्र्यांबरोबर लवकरच बैठक घेऊ

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी समन्वय नसल्याचा आरोप केल्यावर याबाबत मी संपर्कमंत्री या नात्याने, लवकरच पालकमंत्री उदय सामंत जिल्हा दौऱ्यावर असताना जिल्ह्यात येईन. त्या वेळी त्यांच्याशी समन्वय बैठक घेऊ, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com