Ramdas Kadam : सुनील तटकरेंच्या मुलाच्या आमदारकी मागे ‘जादूटोणा?’; शिंदेंच्या शिलेदाराने नव्या वादाची वात पेटवली!

Ramdas Kadam Targets Sunil Tatkare Over MLC Seat And Guardian Minister Post : रायगडचे पालकमंत्रीपद भरत गोगावले यांच्याकडे आपल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वादाला पूर्णविराम लागल्याची चर्चा आहे.
Sunil Tatkare, Aditi Tatkare, Aniket Tatkare and Bharat Gogawale
Sunil Tatkare, Aditi Tatkare, Aniket Tatkare and Bharat Gogawalesarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या रायगडच्या पालकमंत्रिपदावर अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निर्णय घेतला. शिवसेना नेते तथा मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्री करण्यात आले. यानंतर आता जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वादाला पूर्णविराम लागल्याची चर्चा आहे.

अशातच रत्नागिरीतून पुन्हा एकदा नव्या वादाची वात काढण्यात आली असून थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाच लक्ष्य करण्यात आले आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी, विधान परिषदेत शिवसेनेकडे अधिक संख्याबळ असतानाही तटकरेंच्या मुलाला आमदारकी मिळाल्याचा खोचक टोला लगावला आहे. तसेच तटकरे यांच्याकडे नेमका कोणता जादूटोणा आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या प्रश्नामुळे आता रायगडच्या राजकारणात पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या दोन-एक वर्षांपासून रिक्त असलेल्या रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा नुकताच सुटला. राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना आधी जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यात आले होते. यावरून मोठा गदारोळ झाला होता. त्यांच्या नियुक्तीला शिवसेनेनं विरोध केला होता. तसेच तीन आमदार आमचे असताना, शिवसेनेचे संख्याबळ अधिक असताना पालकमंत्री राष्ट्रवादीला का, असा सवाल केला होता. यावेळी शिवसेनेच्या संतापाचा उद्रेक होऊन रस्त्यावर टायरीदेखील जाळण्यात आली होती. ज्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिती तटकरेंची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय घेतला.

Sunil Tatkare, Aditi Tatkare, Aniket Tatkare and Bharat Gogawale
Ramdas Kadam : बाळासाहेबांच्या आदेशाने सभा घेतली, झंझावाती भाषणानंतर गुन्हा दाखल; रामदास कदमांची २० वर्षानंतर मुक्तता, शिवसेना नेत्यालाही दिलासा

यानंतर रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच सुरू झाली होती. दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळाली आणि मोठ्या राजकीय नाट्यानंतर ते बिनविरोध निवडून आले. मात्र, या बिनविरोधात शिवसेनेचा मोठा वाटा असून, शिवसेनेच्या सहकार्याबद्दल पालकमंत्रिपदाची डील झाल्याची चर्चा रंगली. आता ही डील प्रत्यक्षात खरी ठरली असून, शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांच्या गळ्यात पालकमंत्रिपदाची माळ पडली आहे. यानंतर सर्वच स्तरातून त्यांचे स्वागत होत आहे.

पण झालेल्या या विलंबावरून आता सतत समोर येणाऱ्या आदिती तटकरे यांच्या नावावरून रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच त्यांनी गोगावले यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. कदम यांनी, गोगावले हे ज्येष्ठ आहेत. ते आमदार म्हणून तीन वेळा निवडून आले असून, ते गटनेतेही राहिले आहेत. असे असतानाही त्यांना बाजूला करत कालपर्यंत तटकरेंच्या मुलीला पालकमंत्री केलं. कालपर्यंत तटकरेंचेच सगळे लाड पूर्ण होत होते.

ते म्हणतील ते, तटकरे स्वतः खासदार, त्यांच्या कन्या मंत्री आणि आता कन्येकडे पालकमंत्रिपद, ज्येष्ठ गोगावले बाजूला. मुलीने झेंडावंदन करायचं, गोगावले यांना फक्त झेंडावंदनावेळी बाजूला उभे राहावे लागणे हे प्रोटोकॉलमध्ये बसणारे नव्हते, असे मत मांडले आहे. पण आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतला, गोगावलेंच्या ज्येष्ठतेचा योग्य सन्मान झाला. ज्येष्ठ नेत्याला पालकमंत्रीपद देण्यात आलं, असे म्हणत कदमांनी आपली भावना व्यक्त केली आहे.

शिवसेनेकडे मेजॉरिटी

तसेच यावेळी त्यांनी, रायगडमध्ये शिवसेनेचे तीन आमदार, मग पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला का? असा सवाल करत मेजॉरिटीच्या आधारावर पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळायला हवे होते, अशी खंत व्यक्त केली आहे. तर नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीवरूनदेखील तटकरेंवर निशाणा साधला आहे.

कोणती जादू तटकरेंकडे

एकीकडे शिवसेनेची ४५० मतं आणि ६५ मतं तटकरेंची असताना, तिकीट मात्र तटकरेंच्या पोरालाच देण्यात आलं. ‘नेमकी कोणती जादू तटकरेंकडे’ आहे, हेच कळत नसल्याचा टोला देखील लगावला आहे. तसेच यावेळी त्यांनी खरात प्रकरणावरून तटकरेंना लक्ष्य करत करंगळीचा मुद्दा उपस्थित करत हा त्यातला काही प्रकार आहे का, असा संशय व्यक्त केला आहे.

Sunil Tatkare, Aditi Tatkare, Aniket Tatkare and Bharat Gogawale
Ramdas Kadam : रामदास कदमांवर अब्रुनुकसानीची टांगती तलवार; ठाकरेंच्या शिलेदारानं सगळंच काढलं

जादूटोणा, लिंबू-शिंबू

तसेच असा कोणता जादूटोणा असल्याशिवाय असे होऊच शकत नाही, असा दावा करताना ज्या शिवसेनेकडे ४५० मते आहेत. आमदार, पंचायत समिती, जिल्हा परिषद आमच्याकडे असतानाही विधान परिषदेची आमदारकी तटकरेंच्या मुलाकडे जाते. हे असेच होत नाही, काही तरी जादूटोणा, लिंबू-शिंबू असल्याशिवाय होत नाही, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com