Kokan Politics : ठाकरेंचा शिलेदार भाजपच्या संपर्कात? उदय सामंतांचा गौप्यस्फोट; माजी आमदाराचाही प्रतिटोला

Uday Samant Claims Shivsena UBT Leader Join BJP : कोकणात महायुतीतील वाद वाढत असतानाच आता शिवसेना विरूद्ध शिवसेना असा वादही आता समोर आला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी नवा गौप्यस्फोट केल्याने नवा वाद सुरू झाला आहे.
Uday Samant
Uday SamantSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. पालकमंत्री उदय सामंत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट केला.

  2. हे आरोप संबंधित आमदाराने फेटाळून लावले असून आपण उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी असल्याचे सांगितले.

  3. या आरोप-प्रत्यारोपामुळे कोकण आणि रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे.

Ratnagiri News : कोकणात महायुतीतील वाद सुरू असताना शिवसेना नेते व पालकमंत्री उदय सामंत यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर टीका करत एका माजी आमदाराबाबत गंभीर आरोप केले. सामंतांनी पक्षाचा एक माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचा मोठा गौप्यस्फोट केला. या गौप्यस्फोटावरून चांगलीच खळबळ उडाली असता, त्या नेत्याने हे आरोप फेटाळून लावले आहेत व आपण उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता कोकणात आणि विशेषतः रत्नागिरीत चर्चा सुरु झाली आहे की उद्धव ठाकरे यांच्या सोबतची साथ सोडणारा तो नेता कोण आहे.

नुकतेच उदय सामंत यांनी महायुतीतील भाजप–राष्ट्रवादी या मित्रपक्षांवरही जोरदार टीका केली होती. त्यांनी ‘खुमखुमी काढण्याची’ अशी अभिव्यक्तीही केली होती. त्यानंतर महायुतीत फुट पडल्याची चर्चा रंगली होती. पुढे पत्रकार परिषदेत सामंतांनी हे स्पष्ट करत म्हणाले की, “आम्हाला महायुती म्हणूनच आगामी स्थानिक निवडणुका लढवायच्या आहेत,” असे त्यांनी सांगितले. याच वेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला टोमणा मारत टीका केली आणि पक्षाचे माजी आमदार बाळ माने पुन्हा एकदा ‘स्वगृही’ म्हणजेच भाजपच्या वाटेवर असल्याचा आरोप केला.

सामंत म्हणाले की, “उबाठाच्या काही लोकांनी माझ्याविरोधात पत्रकार परिषद घेऊन टीका केली. बाळ माने अनेकदा माझ्यासमोर उभे होते. आता ते मला विचारतात की तुम्हाला भूमिपूजन करायला शिंदेंना का आणावे लागले? पण आता मला त्यांना विचारायचंय की तुम्हाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे पीए अनिकेत पटवर्धन का लागतात? त्यांच्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या गोष्टी का कराव्या लागतात? काही लोकांना पाठवून आपण भाजपमध्ये जाऊ पण घ्यायला सांगा अशी विनंती का करावी लागते?” असे सामंतांनी प्रश्न उपस्थित केले होते.

Uday Samant
Kokan Politics : तळकोकणात ठाकरेंना धक्का, आठ गावातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

सामंतांनी पुढे बाळ माने यांना सल्ला देत म्हटले की, “राजकारणात ते शिवसेने (UBT) मध्ये काम करत आहेत. त्यांनी उद्धवजींचे नेतृत्व स्वीकारले आहे आणि आम्ही एकनाथ शिंदे यांचे. त्यामुळे तुम्ही त्यांचे काम करावे. इकडे–तिकडे खड्डे पडले म्हणून ओरडू नका — तो मी मिटवू शकतो. रत्नागिरीकरांना तुम्ही काय आहात ते तुम्ही दाखवून दिलं आहे,” असेही सामंतांनी म्हणाले.

या आरोपांनंतर बाळ माने यांनी ताबडतोब प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी सामंतांचे आरोप फेटाळून लावले आणि तेही ठामपणे सांगितले की ते उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. माने यांनी सामंतांवर टोला मारत म्हटले की, “सामंत आता भाजपचे प्रवक्ते असल्या सारखे वागत आहेत ?”

बाळ माने पुढे म्हणाले की, “माझे स्वतःचे चाळीस वर्षांचे आणि माझ्या वडिलांचे वीस वर्षांचे भाजपमध्ये काम आहे. परंतु आता भाजपवर शिंदेसेनेचं आक्रमण झाल्याने आमच्यावर अन्याय झाला आणि त्यामुळेच आम्ही भाजप सोडून उद्धव ठाकरे यांच्या सोबत आलो आहोत. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा दहा वर्षे आमदार होऊन आयत्यावेळी शिवसेनेचा फार्म भरणारा मी नाही. आदित्य ठाकरे यांच्याबरोबर खाऊन पिऊन गुवाहाटी येथे जाऊन गद्दारी करणारा मी नाही. पण रस्त्यांच्या खड्ड्यांवर उत्तर न देता सामंत नवी पुडी सोडत असल्याचा प्रतिटोला बाळा माने यांनी उदय सामंत यांना लगावला आहे.

Uday Samant
BJP Politics in Kokan : कोकणात राजकीय भूकंप! राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंनाही मोठा धक्का?, शिवसेनेचा युवा नेता महायुतीच्या वाटेवर

FAQs :

1. उदय सामंत यांनी काय दावा केला?
उदय सामंत यांनी बाळ माने भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला होता.

2. बाळ माने यांनी या आरोपावर काय प्रतिक्रिया दिली?
बाळ माने यांनी आरोप फेटाळले आणि आपण उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले.

3. या घटनेचा राजकीय परिणाम काय झाला?
रत्नागिरी आणि कोकणात राजकीय तापमान वाढले असून शिवसेनेत चर्चेची लाट आहे.

4. उदय सामंत आणि बाळ माने यांच्यातील मतभेदाचे कारण काय आहे?
स्थानिक विकास, भूमिपूजन आणि पक्षनिष्ठा यावरून मतभेद झाले.

5. बाळ माने सध्या कोणत्या पक्षात आहेत?
बाळ माने सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com