Bharat Gogawale And NCP : पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला की काय? मंत्री गोगावले राष्ट्रवादीबरोबर जुळवून घेण्याच्या तयारीत!

DCM Eknath Shinde ShivSena Minister Bharat Gogawale Hints at Alliance with Ajit Pawar NCP in Raigad : शिवसेना मंत्री भरत गोगावले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर रायगडमध्ये जुळवून घेण्याचे संकेत दिले.
Bharat Gogawale And NCP
Bharat Gogawale And NCPSarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena and NCP in Raigad : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आज दिवसभर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे आणि त्यांची कन्या मंत्री आदिती तटकरेंवर जोरदार हल्ले चढवले. \

या दिवसभराच्या राजकीय गदारोळानंतर शिवसेना मंत्री भरत गोगावले यांनी शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीसोबत जुळवून घेण्याची आणि बरोबर बसण्याची तयारी दर्शवली. पण हा वाद ज्याच्यावरून सुरू आहे, म्हणजेच पालकमंत्रिपदाबाबत, आता राष्ट्रवादी काँग्रेसने यावर मोठं मन दाखवावं, असा सूचक सल्ला दिला. परंतु मंत्री गोगावले यांनी राष्ट्रवादीबरोबर जुळवून घेण्याचे संकेत देताच, पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला की काय? अशी चर्चा आता रंगली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सोबत बसणार का? या प्रश्नावर मंत्री भरत गोगावले यांनी म्हटले, "रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत पुन्हा बसण्याची तयारी आहे. वरिष्ठ पातळीवरून जो आदेश आम्हाला येईल, त्याचे पालन आम्ही रायगडमधील शिवसेनेचे आमदार पाळायला तयार आहोत".

मंत्री गोगावले (Bharat Gogawale) यांनी रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सुरू असलेल्या पालकमंत्रिपदाबाबत सूचक विधान केलं. 'स्थानिक'साठी ही जुळवाजवळ राष्ट्रवादीबरोबर कधी होईल, तर सध्या ज्याच्यावरून वाद सुरू आहे, त्या गोष्टीवर राष्ट्रवादीने त्यात मोठं मन दाखवावं, असं सूचक विधान केलं.

Bharat Gogawale And NCP
Sunil Tatkare Controversy : 'तटकरे भैयुजी महाराजांकडून आघोरी विद्याचे प्रकार करायचे'; शिंदेंचा आमदार अधिकृत कॅसेट बाहेर काढणार

पालकमंत्रिपदाच्या वादाबाबत तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला सूचक सल्ला देताना, भात शिजलाय, हे पाहाण्यासाठी शीत तपासले जाते. तसं सर्व काही झालं आहे. यावर मला जास्त उलगडून बोलायला लावू नका, असे सांगताच या वक्तव्याचा अर्थ लावण्याची जबाबदारी पत्रकारांची, असेही भरत गोगावले यांनी म्हटले.

Bharat Gogawale And NCP
Aditi Tatkare land scam : शिंदेच्या शिलेदारानं अजितदादाच्या मंत्र्याविरोधात 'फोडला बाॅम्ब'; तटकरे कुटुंबावर सरकारी जमीन लाटल्याचा गंभीर आरोप

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची अलिबाग इथं बैठक झाली. या बैठकीत शिवसेने राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलच डिवचलं. शिवसेनेने तटकरे कुटुंबाला चांगलच डिवचलं. शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरे परिवारानं सरकारी जमीन लाटल्याचा आरोप करत, मंत्री आदिती तटकरेंचा थेट राजीनामा मागितला. आमदार थोरवे यांच्यापाठोपाठ आमदार महेंद्र दळवी यांनी देखील राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंवर निशाणा साधला.

भरत गोगावले यांच्या आघोरी विद्येच्या व्हिडिओवरून राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार टीका केली होती. त्यावर आमदार महेंद्र दळवी यांनी निवडणुका आल्या किंवा मोठं पदासाठी तटकरेंनी भैयुजी महाराजांकडून अनेक आघोरी विद्येचे प्रकार केले असून, त्या कॅसेट बाहेर काढण्याचा इशारा दिला. शिवसेनेने आज दिवसभर राष्ट्रवादी आणि त्यांचे नेते तटकरे कुटुंबियांना टार्गेट केल्यानंतर मंत्री गोगावले यांनी शेवटी स्थानिकसाठी राष्ट्रवादीबरोबर बसण्याची तयारी असल्याचे सूचक संकेत दिल्याने पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला की काय? अशी आता चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com