

Raigad News : कोकणातील विधानपरिषद निवडणुकीच्या बिनविरोधानंतर शिंदेंच्या शिवसेनेतील संतापाचा आता उद्रेक होताना दिसत आहे. तर पालकमंत्री पदावरून देखील पुन्हा एकदा धुसफूस सुरू झाल्याचे रायगडमध्ये चित्र आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी, तटकरे यांच्यावर हल्लाबोल करत कोकण विधानपरिषदेची जागा गनिमी काव्याने जिंकली असे म्हणत रायगडचे पालकमंत्री पदही तटकरे यांनीच अडवून ठेवल्याचा आरोप केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकीत कोकणच्या एका जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच कमालीची रस्सी खेच झाली. पण ही जागा शेवटी राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली. यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपली ताकद पूर्ण पणाला लावली. तर सर्वाधिक मतदार असणाऱ्या शिवसेनेला माघार घ्यावी लागली.
तसेच जे आमदार महेंद्र थोरवे तटकरेंवर आरोपाची राळ उठवायचे तेच तटकरेंचा मुलगा अनिकेत तटकरे यांचा अर्ज भरताना पुढे होते. यामुळे शिवसेनेत प्रचंड संताप उसळला. एकाच वेळी पक्षातील तब्बल ३८ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले. यामुळे जिल्ह्यात पक्षाला गळती लागल्याचे आता दिसत आहे.
याच दरम्यान कन्या जुईली दळवी यांना अनिकेत तटकरेंच्या विरोधातील उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागल्यावरूनही आमदार दळवी यांनी रोष व्यक्त केला. त्यांनी, तटकरेंनी आपल्याला चार वेळा फसवल्याचा दावा केला. तसेच जर जागा मिळाली असती तर शेकापप्रमाणेच राष्ट्रवादीचाही राजकीय अंत केला असता, अशी प्रतिक्रिया दिली होती.
तसेच विधान परिषद निवडणुकीत पालकमंत्रीपदासाठी तडजोड झाली का? असा थेट प्रश्न मंत्री भरत गोगावलेंना देखील विचारला होता. यामुळे शिवसेवेसह महायुतीत सगळं अलबेल असल्याचे चित्र खरे नसल्याचे समोर आले होते. यानंतर गोगावलेंसह तटकरेंनी पालकमंत्री पदाबाबत स्पष्टीकरण दिले होते.
यानंतर आता दळवी यांनी तटकरे यांच्यावर पुन्हा हल्लाबोल करत टीका केली आहे. तटकरे यांनी कोकण विधानपरिषदेची जागा गनिमी काव्याने जिंकली असून कोकणातील जागा लढवली गेली पाहिजे होती. तसे झाले असता आम्ही ताकदीने लढलो असतो आणि जिंकलोही असतो असा विश्वास दळवी यांनी व्यक्त केला आहे.
तर रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना, याबाबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ बोलून चर्चा करू असे सूचक वक्तव्य केले होते. यावरून रायगडात पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला होता. यावरून देखील दळवी यांनी तटकरेंवर निशाना साधला आहे.
तटकरे यांनीच रायगडचे पालकमंत्री पद अडवून ठेवल्याचा आरोप दळवी यांनी केला. तसेच याचा निषेध करत येणाऱ्या काळात तटकरेंना जनता उत्तर देईल. मात्र आमचे नेते देखील तटकरेंच्या आश्वासनांना भाळले अस वक्तव्य करत नाराजी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.