Kokan Politics: 'बाळ मानेंना सिरीयस घेऊ नका,निवडणूक आली की,तो...'; नारायण राणे ठाकरेंच्या फुटलेल्या उमेदवाराविषयी धक्कादायकच बोलले

Narayan Rane on Bal Mane : माजी मंत्री व भाजपचे जेष्ठ नेते नारायण राणे यांनी थेट उद्धव ठाकरेंची शिवसेना व महाविकास आघाडीतून फुटलेले उमेदवार बाळ मानेंवरच कठोर शब्दांत टीका केल्यानं महायुतीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यावेळी राणेंनी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांवरही निशाणा साधला.
Narayan Rane On Bal Mane  .jpg
Narayan Rane On Bal Mane .jpgSarkarnama
Published on
Updated on

Kokan News : विधानपरिषदेच्या कोकण मतदारसंघातील निवडणुकीत शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार बाळ उर्फ सुरेंद्र माने यांनी गुरुवारी (ता.4) ऐनवेळी अर्ज मागे घेत पलटी मारल्यानं उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीची मोठी नाचक्की झाली होती. आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या याच फुटलेल्या उमेदवाराबाबत भाजप खासदार नारायण राणे यांनी धक्कादायक विधान केलं आहे.

राज्यात विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका होत आहे. या निवडणुकीत महायुतीचं पारडं महाविकास आघाडीपेक्षा जड असल्याचं दिसून येत आहे. विधानपरिषदेच्या स्थानिकची ही निवडणूक प्रचंड गाजते आहे. कारण महायुतीच्या 17 पैकी 6 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. यामुळे मविआवर मोठी नामुष्की ओढावली आहे. यात कोकणची विधान परिषद निवडणुकीत ऐनवेळी मोठा ट्विस्ट आला होता.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने विश्वासानं उमेदवारी दिलेल्या सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. हा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात भाजप मंत्री नितेश राणेंनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. मानेंनी ऐनवेळी माघार घेतल्यानंच महायुतीचे उमेदवार आणि राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. या 'दगाबाजी'नंतर बाळ मानेंची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यानंतर आता नारायण राणेंनी मानेंबाबत गंभीर विधान करत भाजपसह महायुतीलाही इशारा दिला आहे.

भाजप खासदार नारायण राणे म्हणाले,चोराच्या उलट्या बोंबा आहेत.बाळ माने हा भाजपचा ओरिजनल आहे. निवडणूक आली की, माने हे तळ्यात-मळ्यात करतात. बाळ मानेंना सिरीयस घेऊ नका. निवडणू क आली की, बाळ माने 5 वर्षांसाठी तडजोड करतो. त्याच्यावर विश्वास टाकायची गरज नसल्याचं परखड मत राणेंनी यावेळी व्यक्त केलं.

Narayan Rane On Bal Mane  .jpg
Solapur Politics: सोलापूर विधानपरिषद बिनविरोध करण्यासाठीचा भाजपचा अखेरचा डावही फसला; उज्ज्वल निकमांमार्फत थेट उमेदवारावरच टाकलं जाळं..?

माजी मंत्री व भाजपचे जेष्ठ नेते नारायण राणे यांनी थेट उद्धव ठाकरेंची शिवसेना व महाविकास आघाडीतून फुटलेले उमेदवार बाळ मानेंवरच कठोर शब्दांत टीका केल्यानं महायुतीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यावेळी राणेंनी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांवरही निशाणा साधला.

राणे म्हणाले,कोणी पैसे घेतले हे मला माहिती नाही,पण संजय राऊतांना ते माहिती असेल की, कोणी आणि किती पैसे घेतले. कारण माघार कोणी असंच घेत नसल्याचा खोचक टोलाही त्यांनी यावेळी राऊतांना लगावला.

Narayan Rane On Bal Mane  .jpg
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचे यश; आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख मंजूर

तसेच त्यांनी माजी खासदार विनायक राऊत हे काय शब्द पाळणारे नेते आहेत का? विनायक राऊतांचे बाकी धंदे बंद झाले आहेत का अशी टीकात्मक विचारणाही त्यांनी खासदार राणेंनी केली.

कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे विरुद्ध महाविकास आघाडीचे (उद्धव ठाकरे गट) बाळ माने अशी लढत रंगणार होती. मात्र,बाळ मानेंनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला अर्ज मागे घेतला.

Narayan Rane On Bal Mane  .jpg
Solapur Politics: सोलापूर विधानपरिषद बिनविरोध करण्यासाठीचा भाजपचा अखेरचा डावही फसला; उज्ज्वल निकमांमार्फत थेट उमेदवारावरच टाकलं जाळं..?

बाळ माने हे मूळचे रत्नागिरीचे असून ते भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार होते.बाळ माने सुरुवातीला भाजपमध्ये आणि रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघातून आमदार म्हणून कार्यरत होते. पण 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये जागा न मिळाल्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.यानंतर झालेल्या लढतीत उदय सामंत यांनी बाळ मानेंचा पराभव केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com