

शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे कोकणातील विविध प्रश्नांवरून सरकारवर आक्रमक झाले आहेत.
धरणांच्या निकषांबाबत सरकारला जाब विचारत माती परीक्षण व सर्वेक्षणाच्या नावाखाली भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Nagpur News : राज्याच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांसह सत्तादारी आमदारही चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. तळकोकणातील शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी देखील आक्रमक पवित्रा घेत सरकारवर टीका करण्याची संधी सोडली नाही. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत राहिले. आजही त्यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवत कोकणातील धरणांच्या निकषावरून सरकारला खडेबोल सुनावले. तसेच मंत्री संजय राठोड यांच्यावर देखील ते चांगलेच संतापले. तर जर प्रश्न विचारायचेच नसतील तर सरकारला आपल्या शुभेच्छा फक्त कोकणावर अन्याय करू नका अशी टीका केली आहे.
निलेश राणे यांनी कुडाळ तालुक्यातील आंब्रड सारमळे येथील गेली 29 वर्षे प्रलंबित असलेल्या धरणाच्या प्रश्नावरून सरकारचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी या धरणाला सण 1996 साली प्रशासकीय मान्यता मिळाली, तेव्हा खर्च चार कोटी पाच लाख होता. मात्र आज याचा खर्च 34 कोटीच्या बाहेर गेला आहे. हे काम 80 टक्के झाले असून इतर कामे ही मार्गस्थ असल्याची खोटी माहिती पटलावर ठेवली जात असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच विभागाच्या उत्तरावरून आक्रमक होत त्यांनी, आम्ही प्रश्न विचारायचे की नाही असा सवाल केला आहे.
त्यांनी या कामात भूसंपादनात कधीच विरोध झाला असून जीएसटी आता लागू झाला आहे. त्यामुळे सरकार अशी चुकीची उत्तरे देवून दिशाभूल केली जातेय असा आरोप देखील त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी मतदारसंघातील एक देखील धरण पूर्ण झालेलं नसून माती टेस्टिंगच्या नावाखाली अधिकारी 20-20 लाख रुपये काढताय, जिओग्राफिकल सर्व्हेच्या नावाखाली लाखो रुपये काढले जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच आता ही लक्षवेधी लागणार असल्यानेच आता धरणाच्या ठिकाणी दगड टाकली जात असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
तसेच ज्या पद्धतीने विभागाकडून उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे आता सरकारला आपण प्रश्न काय विचारणार. फक्त शुभेच्छा देऊ शकतो आणि आमच्या कोकणावर असा अन्याय का करता? एवढाच फक्त प्रश्न विचारू शकतो असे म्हणत सरकारवर हल्लाबोल केला आहे.
यावरून मंत्री संजय राठोड यांनी निलेश राणे यांच्या जिल्ह्यातील धरणांची कामे ही काही ना काही कारणांनी थांबली आहेत. पण शासनाने या कामांसाठी आधीच सुप्रमा काढली असून ते मार्गी लावले जातील. जी कामे पूर्ण झालं नाहीत त्याची चौकशीही करू. काही अनियमितता असेल तर संबंधितावर कारवाई सुद्धा करू असे संकेत दिले आहे.
तसेच यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच जलसंधारण विभागाच्या रखडलेल्या कामाच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले. तर यात हा प्रकल्प येत असून तात्काळ चौकशी करू. त्याच्यात जर कोणी दोषी आढळले तर अनियमित्ता झाली असेल तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा करू असे म्हटलं आहे.
1. निलेश राणे सरकारवर का नाराज आहेत?
कोकणातील धरणांचे निकष आणि विकासकामांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
2. निलेश राणेंनी कोणते गंभीर आरोप केले?
माती परीक्षण आणि सर्वेक्षणाच्या नावाखाली 20-20 लाख रुपये घेतले जात असल्याचा आरोप.
3. हा आरोप कोणावर करण्यात आला आहे?
मंत्री संजय राठोड यांच्यावर निलेश राणेंनी टीका केली आहे.
4. हा मुद्दा कुठल्या भागाशी संबंधित आहे?
कोकण विभागातील धरणे आणि विकासकामांशी संबंधित आहे.
5. या आरोपांमुळे राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
सरकारवर दबाव वाढू शकतो आणि प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.