Vaibhav Naik : वैभव नाईकांनी भर मेळाव्यात मागितली राऊतांची माफी; नेमकं कारण काय?

Narayan Rane Vs Vinayak Raut : कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे वैभव नाईक आमदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांना चांगलं लीड मिळेल असा अंदाज वर्तवला जात होता.
Vinayak Raut And Vaibhav Naik
Vinayak Raut And Vaibhav NaikSarkarnama

Vinayak Raut And Vaibhav Naik : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचे नारायण राणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यात चुरशीची लढत झाली. दोन्ही उमेदवारांनी ही लढत प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे विजयी झाले.

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे वैभव नाईक (Vaibhav Naik) आमदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांना मोठं मताधिक्य मिळेल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र या मतदारसंघातून राणेंना राऊतांपेक्षा जास्त मताधिक्य मिलालं. अशातच आता राऊत यांना आपल्या मतदारसंघातून लीड न दिल्यामुळे आमदार नाईक यांनी जाहीर माफी मागितली आहे.

मालवणमध्ये लोकसभा निवडणुकीतील विनायक राऊत ( Vinayak Raut) यांच्या पराभवानंतर महाविकास आघाडीची चिंतन बैठक पार पडली. यासाठी अनेक पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीला पराभूत उमेदवार विनायक राऊतही उपस्थित होते. या सर्वांसमोर आमदार वैभव नाईक यांनी राऊत यांना कमी मताधिक्य दिल्याची खंत व्यक्त करत जाहीर माफी मागितली.

Vinayak Raut And Vaibhav Naik
Amol Mitkari On T Raja Singh : टी. राजा यांच्या 'हिंदू राष्ट्रा'च्या वक्तव्यावर मिटकरींचा पलटवार; म्हणाले, 500 पार गेला तरी...

दरम्यान, या बैठकीत बोलताना राऊत यांनी कार्यकर्त्यांना पराभवाच्या नैराश्येमध्ये न अडकता फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊया, असं आवाहन केलं. तसंच केवळ धनशक्तीमुळे पराभव झाला अशी कारणमिमांसा कोणीही करू नका. जर पैसाच जिंकला असता तर सहा लाख मतदारांना सरासरी 2 रुपयांप्रमाणे 120 कोटी हिशोब होतो. तेवढी मते मिळणे आवश्यक होते मात्र विरोधकांना केवळ 48 हजारांचे मताधिक्य मिळाल्याचं राऊत म्हणाले.

Vinayak Raut And Vaibhav Naik
Video Vijay vadettivar News : नाराज असलेल्या भुजबळांना भाजपसोबत जायचे नव्हते; वडेट्टीवारांनी केला गौप्यस्फोट

निष्ठावंताचा कोकण

तर कोकण (Kokan) हा विचारवंत आणि निष्ठावंताचा आहे. काही वेळा एक पाऊल मागे घ्यावे लागते. मात्र, एक पाऊल मागे घेतल्यानंतर पुढची गरुडझेप घेण्याची ताकद तुमच्याकडे असली पाहिजे आणि हीच ताकद तुमच्या मनामध्ये निर्माण करण्याच्या भावनेने मी तुम्हाला भेटायला आलो असल्याचं राऊत कार्यकर्त्यांना म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com