कणकवली : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे नितेश राणे आठवडाभरापासून गायब आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. त्यावर आज शिवसेनेचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी निशाणा साधला आहे.
नाईक म्हणाले, नितेश राणे यांना शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. मात्र, त्यांचे वडील नाराय राणे केंद्रीय मंत्री आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या घरी लपवून ठेवले असेल, अशी माझी शक्यता आहे. नारायण राणे म्हणत आहेत की मला नितेश राणे कुठे आहे हे माहित आहेत, असेही नाईक म्हणाले. नितेश राणे यांचे त्यांच्या घरच्यांशी दररोज बोलनेही होते, असेही नाईक म्हणाले.
दरम्यान, वैभव नाईक म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीआधी गायब असलेले प्रमोद वायंगणकर घरी आले याबद्दल परमेश्वराचे आभार मानतो. वायंगणकर नसल्याने आमचा पराभव झाला. ते कुणामुळे बेपत्ता झाले होते हे त्यांनी आधीच सांगितले आहे. त्यांच्या बेपत्ता होण्यामागे कोण होते हे सर्वांना माहीत आहे. ते बेपत्ता झाल्याने आमच्या हातून जिल्हाबँक गेली, असा आरोप नाईक यांनी केला.
वायंगणकर बेपत्ता होऊन घरी आले. त्यामुळे नितेश राणे यांनी आता तरी समोर यायला हवे, असेही वैभव नाईक म्हणाले. सतीश सावंत यांचा पराभव झाला आहे. वायंगणकर परत आलेत मग आता नितेश राणे यांनी समोर यायला हवे. नितेश राणे यांनी पोलिसांच्या कारवाईला समोरे जायला हवे, असे आवाहन नाईक यांनी केले.
या वेळी त्यांना राजन तेली यांनी दिलेल्या राजीनाम्या बद्दल विचारेल असता ते म्हणाले, राजन तेली हे पुन्हा राजकारणात येतील. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. कोणावर जबाबदारी द्यायची हे पक्ष नेतृत्व ठरवेल. सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही राणे यांनी ईश्वर चिठ्ठीतून जिंकली आहे, असा टोला नाईक यांनी लगावला. बँक त्यांच्या हातात होती. मात्र, आम्ही चांगल्या जागा मिळवल्या. निवडणुकीत पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. येणाऱ्या काळात आम्ही निवडणूक जिंकू, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.