नितेश राणेंना अटक करा ; अन्यथा आंदोलन, शिवसेनेचा इशारा

'हा हल्ला राजकीय असून तो नितेश राणे (Nitesh Rane) व त्यांचे सहकारी गोट्या सावंत यांनी घडवून आणल्याचा आरोप सतीश सावंत यांनी केला आहे.
Satish Sawant, Nitesh Rane

Satish Sawant, Nitesh Rane

sarkarnama

Published on
Updated on

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग येथे शिवसेनेच्या एका कार्यकर्त्यांवर नुकताच जीवघेणा हल्ला झाला. हा हल्ला भाजपचे नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केल्याचा आरोप शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडीचे जिल्हा बँकेच्या पॅनलचे प्रमुख सतीश सावंत यांनी केला आहे.

सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर कणकवलीत जीवघेणा हल्ला झाला. नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने परब यांच्या दुचाकीला मागून धडक देऊन गाडीतून दोन अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने परब यांच्यावर हल्ला केला. हल्ला करून मारेकऱ्यांनी कनेडीच्या दिशेने पलायन केले. '

'हा हल्ला राजकीय असून तो नितेश राणे व त्यांचे सहकारी गोट्या सावंत यांनी घडवून आणल्याचा आरोप सतीश सावंत यांनी केला आहे. आज संध्याकाळपर्यंत जर नितेश राणेंना अटक झाली नाही तर शिवसेना आंदोलन करणार,'' असा इशारा ही सावंत यांनी दिला आहे.

सतीश सावंत (Satish Sawant) यांचे निकटवर्ती असलेले करंजे (Karanje) गावचे माजी सरपंच शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर आज सकाळी अज्ञात दोन जणांनी चाकू हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. या हल्ल्यामागे सिंधुदुर्ग जिल्हा बँक (Sindhdudurg Bank)निवडणुकीत परब यांचा थेट सहभाग असल्याने त्यांच्यावर हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी केली असून, संशयित आरोपी हे कनेडी पर्यंत पसार झाल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे.

<div class="paragraphs"><p>Satish Sawant, Nitesh Rane</p></div>
जुगार क्लब चालविणारे माजी आमदार रविकांत पाटील यांना अटक

याबाबत माहिती अशी, संतोष परब हे कणकवली शहरातील कनक नगर येथे साक्षी अपार्टमेंटमध्ये राहतात. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास शहरातून मोटरसायकलने घराकडे जात असताना घरापासून काही अंतरावर नरडवे रस्त्यावर सिल्वर कलरच्या इनोव्हा गाडीतून अज्ञात आणि त्यांना त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ते खाली पडल्यानंतर गाडीतून उतरलेल्या दोघांनी त्यांच्या छातीत धारदार हत्याराने हल्ला केला. या घटनेनंतर जखमी परब यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी शिवसेना नेते सतीश सावंत यांच्यासह नगरसेवक कन्हैया पारकर सुशांत नाईक, राजू शेट्टी राजू राठोड भास्कर राणे, बेनी डिसोजा व अन्य शिवसेनेचे कार्यकर्ते दाखल झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com