Bhaskar Jadhav : 'महायुतीनं आधी लोकांना गाजर दाखवलं, मतंही विकत घेतली अन् आता कर्जाच्या खाईत लोटलं'; भास्कर जाधवांचा हल्लाबोल

MLA Bhaskar Jadhav slams Mahayuti : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असून अवघ्या 90 दिवसांत महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा वाढला आहे. राज्यावर 24 हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज झाले आहे.
MLA Bhaskar Jadhav
MLA Bhaskar Jadhavsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. महायुती सरकारने एप्रिल महिन्यात 21 हजार 956 कोटी रुपयांचे कर्ज फेड होते

  2. पण पुन्हा एकदा 24 हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज झाले आहे. जे 90 दिवसांत झाले आहे

  3. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सरकारवर टीका केली आहे

Ratnagiri News : राज्यात महायुतीचे सरकार आले असून नऊ महिन्यांचा कालावधी आता लोटणार आहे. यादरम्यान एप्रिल महिन्यात 21 हजार 956 कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यात आले असतानाच पुन्हा एकदा 24 हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज झाले आहे. हे फक्त गेल्या 90 दिवसांत झाल्याने सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकडून टीका होताना दिसत आहे. आता याच मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तळ कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव यांनी जोरदार टीका केली आहे. जाधव यांनी महायुतीनं आधी लोकांना गाजर दाखवलं अशी टीका केली आहे.

ठाकरे यांच्या शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामनामधून महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला होता. सामनातून आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांतच सरकारने 24 हजार कोटींचे कर्ज घेतले असून वर्षअखेर कर्जाचा आकडा 9 लाख 32 हजार 242 कोटींवर पोहोचण्याचा अंदाज वित्त विभागाकडून वर्तविल्याचे म्हटले आहे. महायुती सरकारने या आर्थिक वर्षात एकूण 34 हजार 589 कोटी 35 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे.

या मुद्द्यावरून आमदार जाधव यांनी, महाराष्ट्राची आर्थिक घडी विस्कटलेली असून याआधी देखील आम्ही सरकारला ही बाब निदर्शनास आणून दिली होती. ही गोष्ट यापूर्वीच अधोरेखित केली होती. राज्यात आर्थिक स्थिती बेशिस्त झाल्याचेही सांगितले होते. निवडणुकीपूर्वी लोकांना दाखवलेली गाजर आणि सरकारी पैशातून लोकांची विकत घेतलेली मत त्यामुळे या सरकारने राज्याला कर्जाच्या खाईत लोटल्याचा टोला देखील जाधव यांनी यावेळी लगावला.

MLA Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav : भास्कर जाधव पुन्हा नाराज, शाखाप्रमुखांवर थेट संताप व्यक्त करत म्हणाले, 'राखणदारच जागरूक नाही'

जाधव यांनी राज्यभर चर्चेत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देवा भाऊ बॅनर्सवरून देखील निशाना साधला. त्यांनी निवडणुकीपूर्वी तिघे भाऊ लाडका भाऊ म्हणून मिरवत होते. पण आता केवळ फडणवीस यांची एकट्याची जाहिरात का झालीय? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच सध्या फडणवीस हे कर्जाची जबाबदारी मंत्री मंडळाची आणि श्रेय फक्त माझं हे दाखवून देत आहेत. चांगल्याच श्रेय घ्यायचं आणि वाईटाची जबाबदारी घ्यायची नाही ही त्यांची दानत असल्याचा टोला देखील फडणवीस यांना जाधव यांनी लगावला आहे,

दरम्यान आगामी स्थानिकच्या पार्श्वभूमिवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी कशी करणार? या प्रश्नावर त्यांनी, पक्ष बांधणी करण्यासाठी लागणारे खरे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आमच्या बरोबर आहेत. आमचे लोक सैरावैरा झालेले नाहीत. आमचे लोक निवडणुकीची वाट पाहत असून निकालात सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील असेही म्हटलं आहे.

आरक्षण आणि जातीयवाद

जातीला पोट जात असते पोटाला जातं नसते, त्यामुळे जात बघून कोणाला आरक्षण देऊ नका. तर ज्याला भूक आहे त्याला द्या असं तेव्हा बाळासाहेब ठाकरे सांगायचे. तेव्हा काही लोकांना हे शब्द कठोर वाटले होते. पण आज सरकार जे करतयं ते पाहता त्यांच्या शब्दांची जनतेला आठवण होत असेल. जातं बघून सरकारने निर्णय करू नये हा शिवसेनाप्रमुखांचा दृष्टेपणा होता.

MLA Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav : मनसे-शिवसेना एकत्र! भाजप हादरली? ठाकरे ब्रँडवरून टीका करणाऱ्या प्रसाद लाडांवर भास्कर जाधवांचाही पलटवार

FAQs :

प्र.1: महाराष्ट्रावर किती कर्ज वाढले आहे?
उ.1: महायुती सरकारच्या 90 दिवसांत 24 हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज झाले आहे.

प्र.2: या कर्जावर टीका कोणी केली आहे?
उ.2: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी तीव्र टीका केली.

प्र.3: भास्कर जाधव यांनी महायुतीवर काय आरोप केला?
उ.3: त्यांनी लोकांना गाजर दाखवून फसवले असा आरोप केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com