Shinde Vs Thackeray : शिंदे अन् ठाकरेंचे दोन दिग्गज नेते एकत्र; यातच सामंतांचं राजकीय बॉम्ब टाकणारं वक्तव्य

Uday Samant - Vinayak Raut : उदय सामंत आणि विनायक राऊत यांच्या भेटीची मोठी चर्चा रंगली.
CM Shinde Vs Thackeray
CM Shinde Vs Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि शिंदे शिवसेनेचे नेते व उद्योगमंत्री उदय सामंत हे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र, हे दोन्ही नेते रत्नागिरीत शनिवारी एकत्र आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील पक्षाचे खासदार विनायक राऊत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते, मंत्री उदय सामंत यांची भेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. दोघांची भेट नेमकी कोणत्या कारणावरून झाली, याची चर्चा दबक्या आवाजात सुरू असतानाच सामंतांनी राजकीय बॉम्ब टाकणारं वक्तव्य केलं. "आम्ही विकासाच्या कामांसाठी एकत्र असतो," असं सामंत म्हणाले. यानंतर मात्र राज्याच्या राजकारणात वेगळीच कुजबुज रंगली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

CM Shinde Vs Thackeray
Uddhav Thackeray : खासदार शिंदेंच्या मतदारसंघातून ठाकरेंची तोफ धडाडली; म्हणाले, 'कल्याण-डोंबिवली कुणाच्या बापाची...'

खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, आपण दरवर्षी महसूल खात्याच्या क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन द्यायला, त्याचं कौतुक करायला येतो. यावर्षी त्यांच्या रत्नागिरीत होत असल्या क्रीडा स्पर्धेचे निमंत्रण आपल्याला आलं होतं. यासाठी आपण येथे आल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं.

'विकासकामांमध्ये आम्ही सगळे एकसंधपणे काम करीत आहोत. आमचे विचार वेगवेगळे असू शकतात. पण जिल्ह्याचा आणि कोकणच्या विकासासाठी आम्ही एकत्र आहोत, आज महसूल कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रमाचा प्रसार करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत,' असं उदय सामंत (Uday Samant) यांनी स्पष्ट केलं.

(Edited By- Ganesh Thombare)

R...

CM Shinde Vs Thackeray
Anil Parab : ठाकरे गटाला 'सुप्रीम' न्यायाचा विश्वास; अनिल परबांनी दिले थेट पुरावेच

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com