
शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) पनवेल मतदारसंघातील नव्या मतदारयादीत दुबार नावे असल्याचा दावा केला आहे.
या खुलाशामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून मतदारयादीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
निवडणुकीपूर्वी झालेला हा उघडकीस आलेला प्रकार प्रशासन आणि निवडणूक आयोगासाठी मोठे आव्हान ठरू शकतो.
Raigad News : राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला आहे. राजकीय पक्ष मोर्चे बांधणीला लागले असून विरोधकांनी मतदार याद्या, दुबार मतदार आणि बोगस मतदारावरून निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच जोपर्यंत मतदार याद्यांतील घोळ मिटत नाही तोपर्यंत स्थानिकच्या निवडणूका घेवू नये अशी मागणी केली आहे. यासाठी विरोध पक्षाच्या नेत्यांनी नुकसाच राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. यामुळे सध्या हा विषय चर्चेत आहे. यादरम्यान रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाने दुबार मतदारांच्या नावावरून बॉम्ब फोडला आहे. ज्यामुळे आता खळबळ उडाली आहे.
शेकापने पनवेल मतदारसंघातील दुबार मतदारांची नावेच उडघ करत बॉम्ब फोडला आहे. स्थानिकसाठी तयार केलेल्या नव्या यादीतच पुन्हा 2800 मतदारांची दुबार नावे सापडल्याचा धक्कादायक खुलासा शेकापने केला आहे. यामुळे आता निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
पनवेल महापालिकेची निवडणूकही यंदा नव्या मतदार याद्यानुसार होणार आहे. दरम्यान शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी विधानसभा निवडणुकीनंतर 25,855 मदार हे दुबार असल्याचा आरोप केला होता. त्या आरोपामुळे मतदार संघासह राज्यात खळबळ उडाली होती. पण या आरोपानंतरही आयोगाने यात कोणतीच सुधारणा केली नाही किंवा कारवाई केलेली नाही.
तोच आता नव्या यादीतही 2800 मतदारांची नावे दुबार आढळली आहेत. ज्याची लेखी तक्रार आयोगाकडे करण्यात आली आहे. आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांना या प्रकरणी निवेदन देण्यात आले आहे.
त्यावेळी पाटील यांनी नाराजीही व्यक्त केली होती. तसेच विधानसभेवेळी मतदारसंघातील पनवेल मतदारसंघात 6 लाख 52 हजार मतदारांची नोंद होती. तर नव्याने 23 हजार मतदारांची वाढ झाली. ज्यात 2800 मतदारांची नावे दुबार शेकापच्या शोध मोहिमेतआढळली आहेत.
शेकापने फक्त पनवेलमधीलच नाही तर उरण, एरोली आणि बेलापूर या मतदारसंघाच्या मतदार यादीत देखील दुबार मतदारांची नावे असल्याचा दावा केला आहे. ज्यात उरण-27,275, एरोलीत 16, 096 आणि बेलापूर मतदारसंघात 15,397 मतदारांची नावे दूबार असल्याचे समोर आले होते. तर पनवेल मतदारसंघात 588 मतदारांची नोंद ही संशयास्पद पत्त्यावर झाल्याचा दावाही शेकापने केलाय.
1. शेकापने नेमका कोणता खुलासा केला आहे?
पनवेल मतदारसंघातील नव्या मतदारयादीत 2800 दुबार नावे असल्याचा दावा शेकापने केला आहे.
2. ही दुबार नावे कोणत्या यादीत आढळली?
स्थानिक निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेल्या नव्या मतदारयादीत ही नावे सापडली आहेत.
3. शेकापने ही माहिती कशी मिळवली?
शेकापने स्थानिक मतदारयादींची तपासणी करून ही माहिती सार्वजनिक केली आहे.
4. निवडणूक आयोगाने या प्रकरणावर काही प्रतिक्रिया दिली आहे का?
सध्या आयोगाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तपासाची मागणी वाढत आहे.
5. या वादाचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
या खुलाशामुळे मतदारयादीची विश्वसनीयता प्रश्नात येऊ शकते आणि निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.