
Sindhudurg News : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे ताजे असतानाच देवगडमध्येदेखील अशीच घटना समोर आली आहे. यात हुंड्यासाठी विवाहितेचा अतोनात छळ करण्यात आला असून तिला मारहाण करण्यात आली आहे. इतकेच काय तर जबरदस्तीने तिचा गर्भपातही करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून या प्रकरणातील सासरा वैष्णवी हगवणे प्रकरणाप्रमाणेच एका राजकीय पक्षाशी निगडीत असून तो माजी जि. प. सदस्यही होता. आता याप्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीसह सासू- सासऱ्यांना अटक केली असून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे राज्यात अनेक ठिकाणी मुलींचा हुंड्यासाठी छळ केला जात असल्याचे समोर आले आहे. तर अशा घटनांमध्ये राजकीय वरदहस्त असणाऱ्या लोकांचा हात असल्याचेही दिसत आहे. वैष्णवीचा छळ हुंड्यासाठी करण्यात आला. वैष्णवीला लग्नामध्ये माहेरकडून 51 तोळे सोनं, सात किलो चांदीची भांडी, फॉर्च्युनरसारखी आलिशान गाडी अशा अनेक गोष्टी हुंडा म्हणून देण्यात आला होता. पण तरिदेखील तिचा सासरा राजेंद्र हगवणे जो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेता असून याच्यासह पती, पती शशांक, सासू लता, नणंद करिश्मासह दीर सुशील यांनी छळ केला. या छळाला कंटाळून वैष्णवीने टोकाचे पाऊल उचलले होते. या घटनेमुळे राज्यात एकाचवेळी हळहळ आणि संताप व्यक्त केला जातोय. अशातच सिंधुदुर्गातही एका विवाहितेचा हुंड्यासाठी अतोनात छळ करण्यात आल्याचे समोर आल्याने संतापाची लाट उसळळी आहे.
याप्रकरणी देवगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहितेचा संशयित सागर अनभवणे याच्याशी पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. मात्र, याला सागरचे वडील माजी जि. प. सदस्य रामदास अनभवणे यांचा विरोध होता. पण सागरच्या हट्टापाई त्यांनी विवाह लावून दिला. मात्र लग्नानंतर सागरला दोन तोळ्याची सोन्याची चैनीची मागणी करत तिचा छळ सुरू केला. सोन्याची चैन मिळत नसल्याने पती सागर, सासरे रामदास, सासू रोहिणी यांनी देखील सुनेच्या आईकडे चार तोळे सोने आणि मोटरसायकलची मागणी केली होती. यामुळे साक्षीचा छळ आणखी वाढला होता.
माहेरची आर्थिक स्थिती मजबूत नसल्याने ते शक्य नाही. यातूनच पती, सासू आणि सासऱ्यांनी साक्षीला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच पीडिता दोन महिन्यांची गरोदर असताना तिच्या इच्छेविरुद्ध एका खासगी रुग्णालयात गर्भपात केल्याचेही आता समोर आले आहे.
हा प्रकार आता उघडकीस आल्यानंतर माजी लोकप्रतिनिधी असलेला पती सागर रामदास अनभवणे (वय 32), सासू रोहिणी रामदास अनभवणे (वय 62) व सासरे रामदास अनंत अनभवणे (वय 61, सर्व रा. देवगड- सातपायरी) या तिघांना देवगड पोलिसांत अटक केली आहे. तसेच हंड्यासाठी विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ करून तिच्या संमत्तीशिवाय गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांनी दिलीय. दरम्यान, या घटनेतील दोषींना न्यायालयात हजर केले असता रवानगी सावंतवाडी कारागृहात करण्यात आली आहे. संशयित रामदास अनभवणे हे माजी जि. प. सदस्य असून पुढील अधिक तपास सुप्रिया बंगडे करीत आहेत.
राज्यात पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने खळबळ उडवून दिली असून यात प्रकरणात ही छळ आणि हुंडा असे साम्य आहे. पण त्याही पेक्षा क्रूर म्हणजे विवाहितेचा छळ करून गर्भपात करण्यात आला. आता संशयीतांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून पती, सासू आणि सासऱ्याची कसून चौकशी केली होणार आहे. यामुळे आता गर्भपात करण्यात आलेल्या रूग्णालयाचाही आता पर्दाफार्श होणार आहे. तसेच या प्रकरणात तक्रारी प्रमाणे बळजबरीने गर्भपात झाला असल्यास डॉक्टरही दोषी ठरू शकतो.
जन्म ठेपेची शिक्षा या प्रकरणात प्रेमविवाह करून आणलेल्या सुनेचा छळ सासऱ्यासह सासूने केला असून यात पतीने देखील साथ दिल्याचे आता समोर आले आहे. तर विवाहितेच्या इच्छेविरोधात तिचा गर्भपात करण्यात आला आहे. आता याप्रकरणात गुन्हा सिद्ध झाल्यास हंडा बळी आणि बेकायदेशिर गर्भपात कायद्यातंर्गत दोषींवर कमीत कमी 10 जास्तीत जास्त जन्म ठेपेची शिक्षा होऊ शकते. तर या प्रकरणात डॉक्टर दोषी ठरल्यास त्यांची वैद्यकीय सनद कायमस्वरूपी रद्द होऊन कायदेशीर कारवाईही होऊ शकते.
- अॅड. शिवाजीराव राणे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.