Vaishnavi Hagawane Case : महिला आयोगाला खडबडून जाग; चाकणकर अडचणीत येताच सचिवांनी दिली महत्वाची माहिती...

Role of the Maharashtra Women's Commission : महिला आयागोच्या कारभारावर टीका होऊ लागल्यानंतर चाकणकर यांनी पत्रकार परिषद देऊन मयूरी हगवणे यांच्या तक्रारीबाबत स्पष्टीकरण दिले होते.
Rupali Chakankar, Vaishnavi Hagawane Case
Rupali Chakankar, Vaishnavi Hagawane CaseSarkarnama
Published on
Updated on

Pune News : वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधी पक्षातील नेत्यांनी आयोगाच्या अध्यक्षांवर टीकेची झोड उठवली आहे. वैष्णवीची मोठी जाऊ असणाऱ्या मयुरी हगवणे यांच्या तक्रारीची योग्य ती दखल आयोगाने घेतली असती तर वैष्णवी सोबत असं घडलं नसतं, असं बोललं जात आहे. त्यानंतर आता मयुरी यांच्या तक्रारप्रकरणी आयोगाकडून खुलासा करण्यात आला आहे.

आयागोच्या कारभारावर टीका होऊ लागल्यानंतर चाकणकर यांनी पत्रकार परिषद देऊन मयूरी यांच्या तक्रारीबाबत स्पष्टीकरण दिले होते. पण त्यानंतरही वाद शांत होत नसल्याचे पाहून आता राज्य महिला आयोगाकडूनच याबाबत अधिकृतपणे प्रसिध्दीपत्रक काढून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यामुळे त्यावरूनही आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

वैष्णवी यांची जाऊ मयुरी यांना कौटुंबिक छळास सामोरे जावे लागत असल्याची तक्रार मेघराज जगताप आणि लता जगताप यांनी 6 नोव्हेंबर 2024 रोजी ई-मेलद्वारे राज्य महिला आयोगाकडे दाखल केली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर 7 नोव्हेंबर 2024 रोजी या प्रकरणी राज्य महिला आयोगाकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पौड पोलिस स्टेशन यांना या प्रकरणात कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते, असे स्पष्टीकरण राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी दिले आहे.

Rupali Chakankar, Vaishnavi Hagawane Case
लालूंनी नातवाला दिले ‘या’ देवाचे नाव; कधी ऐकला नसेल हा शब्द...

पद्मश्री बैनाडे यांनी म्हटले आहे की, वैष्णवी हगवणे यांचा सासरच्यांकडून हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे आत्महत्या केल्याच्या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे दखल घेऊन 19 मे 2015 रोजी बावधन पोलिसांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बावधन पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे.

त्याचप्रमाणे मयुरी जगताप यांच्या कौटुंबिक छळाच्या प्रकरणातही पोलिसांना कार्यवाहीचे आदेश देण्यात आल्यानुसार त्यांनी तक्रार दाखल करुन पुढील तपास केला. पोलिस तपासाबाबत असमाधानी असल्याचे किंवा इतर कुठल्याही बाबींबाबत त्यानंतर तक्रारदार किंवा त्यांच्या कुटुंबियांनी आयोगाशी संपर्क साधलेला नाही. मयुरी जगताप यांच्या प्रकरणी 22 मे 2025 रोजी 102/2025 अन्वये मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट असल्याचे बैनाडे यांनी सांगितले आहे.

Rupali Chakankar, Vaishnavi Hagawane Case
Vaishnavi Hagawane : नवऱ्याकडून अश्लील VIDEO दाखवून अत्याचार, घरातच गांजा पार्टी अन् काळी जादू; पुण्यातील आणखी एका विवाहितेचा हुंड्यासाठी छळ

तक्रारदारांना याबाबतीत काही आक्षेप असल्यास आणि त्यांनी आयोगाकडे मदत मागितल्यास राज्य महिला आयोग न्यायोचित मदत करण्यास बांधील असून, अपुऱ्या माहितीच्या आधारे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाविरोधात जारी करण्यात येणाऱ्या वृत्ताचे महाराष्ट्र राज्य महिला आयोग खंडन करीत असल्याचेही डॉ. बैनाडे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com