Sindhudurg Politics : सावंतवाडी ते मालवण पंचायत समिती सभापती आरक्षण जाहीर, पुरुषांचा पत्ता कट!

Panchayat Samiti President reservation In local body elections : नुकताच राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षणाची सोडत झाली. यामुळे अनेक इच्छुक पुरूष उमेदवारांना धक्का बसला.
local body elections
local body electionsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष आरक्षणानंतर जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांच्या पहिल्या टप्प्यातील सभापतिपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली.

  2. जिल्ह्यातील चार पंचायत समित्यांवर महिलाराज येणार असून तीन पंचायची समित्या (खुल्या) सर्वसाधारण राहिली आहेत.

  3. पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या अडीच वर्षांतील सभापतिपदांचे आरक्षणाचीही सोडतही निघालीय

Sindudurg News : नुकताच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज्यातील जिल्हा परिषदांच्या सभापती पदाचे आरक्षण निघाले होते. त्या पाठोपाठ दोन दिवसापूर्वीच नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षणाची घोषणा झाली. आणि आता पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या अडीच वर्षांतील सभापतिपदांचे आरक्षणाचीही सोडतही निघाली. त्या प्रमाणे जिल्ह्यातील चार पंचायत समित्यांवर महिलाराज येणार असून तीन पंचायची समित्या (खुल्या) सर्वसाधारण राहिली आहेत. यामुळे आता निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात होणार आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष आरक्षणानंतर जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांच्या पहिल्या टप्प्यातील सभापतिपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. त्याप्रमाणे सावंतवाडी सभापती अनुसूचित जाती महिला, कणकवली नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि वेंगुर्ले नागरिकांचा मागास प्रवर्ग असे राखीव झाले आहे. तर मालवण आणि दोडामार्ग सर्वसाधारण महिलेसाठी राखीव राहिले आहे. कुडाळ, देवगड, वैभववाडी सभापतिपदे सर्वसाधारण राहिली आहेत.

गट-गणांचे आरक्षण सोमवारी

जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पंचायत समिती मतदारसंघांचे आरक्षण सोमवारी (ता. 13) सोडत काढून जाहीर करण्यात येणार आहे. यातील जिल्हा परिषद मतदारसंघाचे आरक्षण जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर काढण्यात येणार आहे, तर पंचायत समिती मतदारसंघांचे आरक्षण तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुक्याच्या ठिकाणी काढण्यात येणार आहे.

local body elections
Local Body Elections : बंधू अन् सुनेसाठी दोन आमदारांची कसरत, काँग्रेसच्या गडावर शिवसेनेचा डोळा

निवडणुकांच्या हालचालींना वेग

मालवण पंचायत समिती सभापतीपदाचे सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे. सध्या पंचायत समितीवर प्रशासक कारभार करत आहेत. आरक्षण जाहीर झाल्याने निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आहे. सभापती आरक्षणानंतर सदस्यपदाचे आरक्षण पडणार आहे. मालवण तालुक्यात 12 पंचायत समिती मतदारसंघ आहेत. सदस्यांमधूनच सभापतीपदाची निवड होणार आहे. त्यामुळे तालुक्याचा कारभार व्यवस्थित हाताळणाऱ्या महिलांची राजकीय पक्षांना निवड करावी लागणार आहे. अनेक पुरुष तालुक्याचे नेतृत्व करण्यास इच्छुक होते.

नगराध्यक्षासह सभापतीही आता महिलाच

मालवण नगरपरिषद नगराध्यक्ष पदानंतर आता मालवण पंचायत समितीवरही महिलाराज आले आहे. सभापती पद सर्वसाधारण महिला आरक्षित झाले आहे. त्यामुळे पंचायत समितीतही पुरुषांचा पत्ता कट झाला असून महिलांना कारभार करण्याची संधी मिळणार आहे. सदस्यपदाच्या आरक्षणानंतर सभापतीपदाचा चेहरा समोर येणार आहे.

नगरसेवकपदाचे आरक्षण

मालवण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण महिला पडल्याने पुरूषांचा हिरमोड झाला आहे. शहरात 10 प्रभाग असून 20 नगरसेवक असणार आहेत. उद्या नगरसेवकपदाचे आरक्षण सोडत निघणार आहे. नगरसेवक होण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. सर्वच प्रभागात प्रत्येक राजकीय पक्षात इच्छुकांची संख्या मोठी आहे. युती-आघाडीत कोणाला संधी मिळते, कोणाचा पत्ता कट होणार, कोणाला प्रभाग बदलावे लागणार, हे आता उद्याच्या आरक्षणानंतर स्पष्ट होणार आहे.

local body elections
local body election : तळकोकणातील नगरपंचायत, नगरपरिषदा अन् नगरपालिकाचं चित्र क्लिअर : नगराध्यक्ष कोणाला राखीव?

FAQs :

प्र.1: सिंधुदुर्ग जिल्ह्यात किती पंचायत समित्यांची सभापती आरक्षण सोडत झाली?
👉 आठ पंचायत समित्यांच्या पहिल्या टप्प्यातील सभापती आरक्षण सोडत काढण्यात आली.

प्र.2: मालवण आणि दोडामार्ग सभापती पद कोणासाठी राखीव झाले आहे?
👉 दोन्ही ठिकाणची सभापती पदे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाली आहेत.

प्र.3: सावंतवाडी सभापती पद कोणासाठी राखीव झाले आहे?
👉 अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी.

प्र.4: या आरक्षणामुळे कोणत्या वर्गाला सर्वाधिक संधी मिळाली आहे?
👉 महिलांना या आरक्षणातून मोठ्या प्रमाणावर संधी मिळाली आहे.

प्र.5: या आरक्षणानंतर राजकीय चित्र कसे दिसते?
👉 महिलांचे नेतृत्व वाढत असून स्थानिक राजकारणात पुरुषांचे वर्चस्व कमी होताना दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com