Konkan politics : कणकवलीतील पराभवावर नितेश राणेंची पहिल्यांच प्रतिक्रिया; म्हणाले...

Nitesh Rane clarifies Kankavli election result in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि मालवण नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागून आता पंधरा दिवस होत असून दोन्ही ठिकाणी बसलेल्या पराभवाच्या धक्क्यावर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Konkan politics, Kankavli election result; Nitesh Rane Vs Nilesh Rane
Konkan politics, Kankavli election result; Nitesh Rane Vs Nilesh Ranesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. कणकवली नगरपालिकेच्या निकालामागे मटका जुगार अड्ड्यांवरील धाडीचा संबंध नसल्याचे नितेश राणेंनी स्पष्ट केले.

  2. तरुण पिढी वाचवण्यासाठी अवैध दारूधंदे व जुगाराविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला.

  3. या लढाईत जिल्ह्यातील पत्रकारांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि मालवण नगरपरिषदांच्या निवडणुकांच्या अंतिम निकालात भाजपला पराभवाचा धक्का बसला. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनाच होमपिचवर त्यांच्या विरोधात विधानसभा लढलेल्या उमेदवारानेच पराभवाचा धक्का दिल्याने याची जोरदार चर्चा राज्यभर झाली. तर कणकवली नगरपालिकेच्या अटीतटीच्या लढतीत शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांना निलेश राणेंनी बुस्टर डोस दिला होता. ज्यामुळे हा विजय सुकर झाल्याचे येथे बोलले जात आहे. पण या मागे दुसरेच कारण असल्याचे स्पष्टीकरण आता मंत्री नितेश राणे यांनी दिले आहे.

कणकवली नगरपालिकेच्या निवडणुकीत आघाडी व्हावी अशी अनेकदा मागणी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी केली होती. मात्र भाजपने ते मनावर घेतले नाही. यामुळे निलेश राणेंनी आपली ताकद उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संदेश पारकर यांच्या शहर विकास आघाडीच्या मागे उभी केली. फक्त ताकदच लावली नाही. तर पारकर यांना नगराध्यक्ष पदावर बसवलेही. सोबतच मालवणचा गड कायम राखत आपली ताकद सिद्ध केली. यामुळे निलेश राणेंचे नावही शिंदेंच्या विश्वासूंच्या यादीत गेले असून त्यांची मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक म्हणून घोषणाही झाली आहे.

दरम्यान आता कणकवलीत झालेल्या पराभवावर नितेश राणे यांनी पहिल्यांद प्रतिक्रिया दिली आहे. मंगळवारी (ता. ६) सिंधुदुर्गनगरी येथे पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी, कणकवली नगरपालिकेचा निकाल जो लागला त्यामागे मी मटका जुगार अड्ड्यावर टाकलेली धाड कारणीभूत आहे, असे मी मानत नाही. त्याची मला चिंता नाही.

Konkan politics, Kankavli election result; Nitesh Rane Vs Nilesh Rane
Konkan politics : नितेश राणेंविरोधात विधानसभा लढलेल्या उमेदवाराला निलेश राणेंचा बुस्टर डोस : 2029 ची डोकेदुखी वाढली

जिल्ह्यातील तरुण पिढी बरबाद होण्यापासून वाचविण्यासाठी आपण मागे हटणार नाही. त्यासाठी कोणतीही किमत मोजायला तयार आहे. यामुळे यापुढेही अवैध दारूधंद्यांविरोधात कठोर कारवाई करणार असून आपण पालकमंत्री असेपर्यंत जिल्ह्यातील पत्रकारांनी मला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केलं आहे. तसेच जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात आपली लढाई सुरूच राहील, असाही इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे उपस्थित होते.

यावेळी नितेश राणेंनी खा.नारायण राणे यांनी दिलेला कानमंत्र सांगताना, आपण पालकमंत्री झालो तेव्हा खा.नारायण राणे यांनी बोलावून घेतले. त्यांनी गोवा आपल्या बाजूला असल्यामुळे तेथून येथे येणाऱ्या चुकीच्या गोष्टी थांबायला हव्यात जिल्ह्यातील अवैध धंदे बंद व्हायला हवेत, त्यावर लक्ष द्या अशा सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे पोलिस खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. ज्यात आधी आपल्याकडे अवैध धंदे नसल्याचे सांगितले.

पण ज्यावेळी माझी यंत्रणा कामाला लावली त्यावेळी काही अधिकाऱ्यांनी अवैध धंद्यावाल्यांना संपर्क केला. हप्त्याची रक्कम डबल कराला सांगितले. यातूनच जिल्ह्यातील तरूण पिढी बरबाद होत आहे. मटका, जुगारासाठी खिशातील पैसे जात आहेत. तरूण पिढी बरबाद होत असून घरातील कर्ती व्यसनाधीन होत आहेत. यामुळे आता मी या विरोधात घेतली आहे. तसे केले नसते तर पालकमंत्री मधील पालक या शब्दालाच काहीच अर्थ राहिला नसता.

त्यावेळी कणकवलीची नगरपालिकेची निवडणूक तोंडावर होती. त्यामुळे मी कारवाईची भूमिका घेवू नये. उलट मोठी ऑफर घ्यावी अशी विनंती अनेकांनी घेतली. मला सल्ले देणारे शंभर लोक तयार झाले. पण कणकवलीमध्ये जुगारावर धाड टाकली. ज्यानंतर माझ्याविरोधात सगळे मटकेवाले एकत्र झाले. निवडणुकीमध्ये माझ्याविरोधात पैसे लावले गेले. पण मी मागे हटलो नाही. आताही तसे नेटवर्क उभे केले जावू शकते. पण मी पालकमंत्री असेपर्यंत कुणालाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंदे करू देणार नाही. लावा काय ताकद लावायची ती, आम्ही तयार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.

तसेच जे ऑफर घेवून यायचे त्यांनाही आपण पुन्हा अशी ऑफर घेवून आलात तर दोन पायाने परत जाणार नाही, असाही इशारा दिला आहे. तर आपलं नाव हे नितेश नारायण राणे आहे, अशा ऑफर आम्हाला चालत नाही. आम्ही आमच्या भुमिकेवर ठाम राहणारे असून तडजोड करत नसल्याचेही सुनावल्याचे नितेश राणेंनी सांगितले आहे.

Konkan politics, Kankavli election result; Nitesh Rane Vs Nilesh Rane
Konkan Politics : रवींद्र चव्हाणांवर तुटून पडणाऱ्या निलेश राणेंचा महाबॉम्ब! भाजपची ऑफर होती म्हणत भाऊ नितेशलाही चांगलंच सुनावलं!

FAQs :

Q1. नितेश राणेंनी कोणत्या विषयावर वक्तव्य केले?
➡️ अवैध दारूधंदे, मटका जुगार आणि कणकवली नगरपालिकेच्या निकालावर त्यांनी वक्तव्य केले.

Q2. मटका धाडीचा निवडणूक निकालाशी संबंध असल्याचे त्यांनी मान्य केले का?
➡️ नाही, असा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Q3. पुढे कोणती कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले?
➡️ अवैध दारूधंदे आणि जुगार अड्ड्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील.

Q4. राजकीय विरोधाची भीती असल्याचे त्यांनी सांगितले का?
➡️ नाही, कोणतीही राजकीय किंमत मोजायला तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Q5. पत्रकारांना त्यांनी काय आवाहन केले?
➡️ अवैध धंद्यांविरोधातील लढ्यात पत्रकारांनी साथ द्यावी, असे आवाहन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com