"तुमच्यात टॅलेंट आहे, सक्षम आहात..." : भाजप उमेदवाराने सभेत ऐकवली निलेश राणेंची कॉल रेकॉर्डिंग

Shilpa Khot Vs MLA Nilesh Rane : तळकोकणात सध्या भाजप आणि शिवसेना आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला रंगला आहे. ज्याची आता जोरदार चर्चा रंगली आहे.
city ​​council electorate, Shilpa Khot And MLA Nilesh Rane
city ​​council electorate, Shilpa Khot And MLA Nilesh Ranesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. सिंधुदुर्ग नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष तीव्र झाला असून शिल्पा खोत यांनी निलेश राणेंवर जुनी ऑफर दिल्याचा आरोप करून प्रश्न उपस्थित केला.

  2. भाजप उमेदवाराने प्रचार सभेत ऑडिओ क्लिप वाजवून दिशाभूल केल्याचा पलटवार निलेश राणेंनी केला.

  3. या आरोप-प्रत्यारोपांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून निवडणूक आणखी चुरशीची झाली आहे.

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला गेला आहे. शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी आरोपांची राळ उडवून दिली असून भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारालाच घेरण्याची पूर्ण रणनीती आखली आहे. पण त्याच उमेदवाराने निलेश राणेंची भर प्रचारसभेत एक ऑडिओ क्लिप वाजवून खळबळ उडवून दिली आहे.

जिल्ह्यात नगरपालिकांसह नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत वाद सुरू झाला होता. जागावाटप आणि नगराध्यक्ष पदाच्या मुद्द्यावरून येथे एकमत झाले नाही आणि भाजप-शिवसेनेत वाद सुरू झाला. हा वाद आता विकोपाला गेला असून स्थानिकच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना आमने सामने आली आहे. मालवण नगरपरिषद निवडणुकीमध्ये देखील मोठी चुरस पाहायला मिळत असून येथे ठाकरेंच्या शिवसेनेला आता शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्याकडून बुस्ट मिळत आहे.

निलेश राणे यांनी भाजप नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. याचे काही पुरावेही त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केले होते. त्यांनी याबाबत आरोप करताना, शिल्पा खोत यांच्या पतीने हे सर्व कांड केला असल्याचं म्हटले होते. तसेच आपल्याला भाजपच्या कोणत्याही नेत्यावर किंवा पदाधिकाऱ्यावर टीका करायची नाही असे म्हणत या प्रकरणी शिल्पा खोत यांनी जनतेची दिशाभूल थांबवावी आणि त्यांनी माफी मागावी असे निलेश राणे म्हटले होते.

city ​​council electorate, Shilpa Khot And MLA Nilesh Rane
Nilesh Rane : तळकोकणात युती तुटण्यामागे नेमकं कोण? भावाला सेफ करत नीलेश राणेंनी खापर फोडलं भाजपच्या बड्या नेत्यावर

यानंतर आता शिल्पा खोत यांनी निलेश राणे यांनी पूर्वी नगराध्यक्षपदाची ऑफरच आपल्याला दिली होती, मग आताच आपण अपात्र कसे ठरलो? असा प्रश्न करत प्रचार सभेत एक ऑडिओ क्लिप वाजवून दाखवली. ज्यात निलेश राणे यांनी त्यांना थेट ऑफर दिल्याचे समोर येत आहे. या ऑडिओ क्लिपने आता सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष अधिक तीव्र केला आहे.

तर यावर निलेश राणे यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, त्यांनी 1 नोव्हेंबरपूर्वी शिल्पा खोत यांच्यांशी संपर्क साधला होता. त्यावेळी त्यांना खोत यांच्याकडे ओबीसीचे वैध प्रमाणपत्र आहे की नाही. ते सत्य आहे की नाही याची माहिती नव्हती. पण त्यांना जेव्हा याबाबत माहिती मिळाली त्यानंतर आपण त्यांना कोणताही फोन केला नसल्याचेही निलेश राणे यांनी स्पष्ट केले. तसेच शिल्पा खोत यांनीच भाजपची दिशाभूल करून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळविली असल्याचे म्हंटले.

खोत यांच्याकडे 7 नोव्हेंबरपर्यंत मराठा उल्लेख असलेले जात प्रमाणपत्र होते. त्यानंतर त्या कुणबी झाल्या. या खोडसाळपणामध्ये त्यांना त्यांचे पती यतीन खोत यांनी मदत केली. खोत दांपत्याने मराठा समाजालाही फसविले आणि आता कुणबी समाजालाही फसवत आहेत. बनावट जात प्रमाणपत्र सादर करून शिल्पा खोत यांनी मालवण नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्या मालवणच्या जनतेला फसवित आहेत. त्या निवडून येणार नाहीत. तरीही त्या एक मताने जरी निवडून आल्या तरी त्यांचा उमेदवारी अर्ज कोर्टात टिकणार नाही. भविष्यात मालवणवासियांना पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याचा दावाही निलेश राणेंना यावेळी केला आहे.

यावर खोत म्हणाल्या, आमदार निलेश राणे यांनी केलेले आरोप खोटे आहेत. मी संघर्षातून उभी राहिलेली सर्वसामान्य स्त्री आहे. या आरोपांमुळे मी डगमगणार नाही. मी कुणब्याचीच पोर आहे. आम्ही आमचा इतिहास शोधून काढला म्हणून तो मिळाला. तो खोटा आहे हे सांगणारे आमदार राणे कोण? त्यासाठी न्याय देवता, प्रशासन आहे. जुन्या काळातील कर्तबगार महिलांचा इतिहास पाहता महिलांची उपेक्षा झाली आहे. त्याची पुनरावृत्ती आता एकविसाव्या शतकातही होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

एक महिला जर स्वार्थासाठी नव्हे, तर समाजकारणासाठी पुढे जात असेल; तर तिचे खच्चीकरण करण्याचे काम सत्ता मिळविण्यासाठी केले जात आहे. खेळीमेळीने न लढता, राजकारण हे गलिच्छ आहे, हे त्यांनी दाखवून दिले आहे. 4 दिवसांपूर्वी शिल्पा ही आमदारांसाठी ताई होती. तुम्ही सक्षम आहात, तुमच्यात टॅलेंट आहे, असे सांगत होते. भाजपने मला उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्या मनात माझ्याबद्दलची प्रतिमा अचानक कशी काय बदलली? असाही सवाल खोत यांनी केला.

या आरोप प्रत्यारोपाने मालवण नगरपरिषदेची निवडणूक चांगलीच रंगतदार बनली असून येथे आमदार निलेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर त्यांच्याच समोर त्यांचे बंधू आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनीच आव्हान निर्माण केले आहे. आता या लढाईत कोण जिंकत हेच पाहावे लागणार आहे.

city ​​council electorate, Shilpa Khot And MLA Nilesh Rane
Nilesh Rane : कणकवलीत राणे बंधूंमध्ये सत्तासंघर्ष टोकाला! नारायण राणेंच्या 'त्या' वक्तव्यावर निलेश राणेंचा युटर्न; म्हणाले, कोठून आणलात हे शब्द?

FAQs :

1. शिल्पा खोत यांनी नेमका काय आरोप केला?
त्यांनी आरोप केला की निलेश राणेंनी पूर्वी नगराध्यक्ष पदाची ऑफर दिली होती, मग आता त्यांना अयोग्य कसे ठरवले?

2. निलेश राणे यांनी काय प्रतिक्रिया दिली?
त्यांनी पलटवार करत सांगितले की भाजप उमेदवाराने प्रचार सभेत ऑडिओ क्लिप वाजवून लोकांची दिशाभूल केली.

3. वाद कशामुळे वाढला?
ऑडिओ क्लिप, जुनी ऑफर आणि दोन्ही बाजूंच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे तणाव वाढला.

4. हा संघर्ष कोणत्या पक्षांमध्ये आहे?
शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष आहे.

5. या वादाचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
राजकीय वातावरण आणखी तापेल, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com