Meghalaya Coal Mine Blast: मेघालयमध्ये कोळसा खाणीत भीषण स्फोट! 18 कामगारांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं? जाणून घ्या

Meghalaya Coal Mine Blast: यातील मृतांना केंद्र सरकारकडून प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
Meghalaya Coal Mine Blast
Meghalaya Coal Mine Blast
Published on
Updated on

Meghalaya Coal Mine Blast: ईशान्य भारतातील मेघालय या राज्यातील एका कोळसा खाणीमध्ये भीषण स्फोट होऊन त्यात १८ कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पूर्व जयंतीया हिल्स या जिल्ह्यातील मिसिंगेट-थांग्स्को भागात ही दुर्घटना घडली आहे. यातील मृतांना केंद्र सरकारकडून प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Meghalaya Coal Mine Blast
Imran Pratapgadi: "नेहरुंचं नाव आईन्स्टाईनसोबत घेतलं जायचं, तुमचं नाव एपस्टिनसोबत घेतलं जातंय"; इम्रान प्रतापगडी यांचा PM मोदींवर हल्लाबोल

पोलिसांच्या माहितीनुसार, अत्यंत दुर्गम भागात अवैधरित्या ही खाण सुरु होती. कोळसा काढण्यासाठी लावलेल्या डायनामाइटचा स्फोट झाल्यानं इथं काम करणाऱ्या काही कामगारांपैकी १८ जणांचा जागीच मृत्यू झाला. यांपैकी ४ मृतदेह या खाणीतून बाहेर काढण्यात यश आलं आहे. तसंच एका गंभीररित्या भाजलेल्या व्यक्तीला उपचारांसाठी शिलाँगला पाठवण्यात आलं. या दुर्घटनेची माहिती कळताच राज्य आपत्ती व्यवस्थापन दल आणि अग्निशमन दलाच्या तसेच आपत्कालिन सेवांच्या टीम घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विकास कुमार यांनी दिली.

Meghalaya Coal Mine Blast
Anurag Thakur: भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या BCCI प्रकरणात मोठी अपडेट! सुप्रीम कोर्टानं ९ वर्षांपूर्वी केलेल्या हाकालपट्टीनंतर आता...

दरम्यान, ज्या डोंगरात अवैध खनन सुरु होतं तिथं स्फोटानंतर डोंगराचा मोठा भाग खचला आहे. त्यामुळं यात आणखी काही कामगार अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी सांगितलं की, मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. दरम्यान, मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना ३ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

Meghalaya Coal Mine Blast
Vidip Jadhav: अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधव यांचा विमा मंजूर; कुटुंबियांना मिळणार कोट्यवधींचा आधार

PM मोदी घटनेवर काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोळसा खाणीत झालेल्या स्फोटवर दुःख व्यक्त केलं आहे. तसंच मृतांच्या कुटुंबियांना पीएम केअर फंडातून प्रत्येकी २ लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com