Velas Beach Accident : दोन मुलं समुद्रात बुडाली, भाचाही वाचला नाही; शेकापच्या नेत्यावर दुख:चा डोंगर

Santosh Patil Muyresh Awadhoot Raigad Velas Beach Accident: संतोष पाटील कुटुंबाने दोनच दिवसांपूर्वी नवी गाडी घेतली होती. त्यासाठी संपूर्ण कुटुंब आनंदाने शोरुमला गेले होते. मात्र, अवघ्या दोन दिवसात पाटील कुटुंबाच्या आनंदावर विरजन पडले.
Muyresh Patil Awadhoot Patil
Muyresh Patil Awadhoot Patil sarkarnama
Published on
Updated on

Velas Beach Accident : शेतकरी कामगार पक्षाचे म्हसळा तालुक्याचे सरचिटणीस संतोष पाटील यांच्या दुखःचा डोंगर कोसळला आहे. समुद्रात पोहोण्यासाठी गेलेले त्यांची दोन मुलं आणि भाचा यांचा बुडून मृत्यू झाला. श्रीवर्धन तालुक्यातील वेळासबीच जवळ ही घटना घडली. संतोष पाटील हे शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष पाटील यांच्या बहिणीचा मुलगा हिमांशु पाटील (वय 21) हा शाळेला सुट्टी लागल्याने गावी आला होता. त्याला सोबत घेऊन संतोष पाटील यांची दोन मुले मुयरेश आणि अवधूत हे श्रीवर्धन तालुक्यातील वेळासबीचला फिरण्यासाठी गेले होते. ते पोहोण्यासाठी ते खोल समुद्रात उतरले.मात्र समुद्रांच्या लाटांमुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला.

Muyresh Patil Awadhoot Patil
MNS Shivsena UBT alliance : मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांवरून सदावर्तेंनी ठाकरे बंधूंची खिल्ली उडवली; म्हणाले, "दोघांचे पक्ष गल्लीतून..."

संतोष पाटील कुटुंबाने दोनच दिवसांपूर्वी नवी गाडी घेतली होती. त्यासाठी संपूर्ण कुटुंब आनंदाने शोरुमला गेले होते. मात्र, अवघ्या दोन दिवसात पाटील कुटुंबाच्या आनंदावर विरजन पडले. संतोष पाटील यांची दोनही मुलांचा बुडून मृत्यू झाला. तर, सुट्टीसाठी आलेला भाचा देखील बुडाला.

समुद्रात पोहोण्याच्यासाठी गेलेले मुयरेश, अवधूत, हिमांशु यांचा समुद्रात बुडल्याची माहिती मिळताच त्यांचा मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. स्थानिक बोटचालकांच्या मदतीने मृतदेह समुद्राबाहेर काढण्यात आले.

Muyresh Patil Awadhoot Patil
Eknath Shinde Angry : राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदें संतापले; म्हणाले, 'अरे काही तरी...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com